![]() | |
|
गिरनार पर्वत हा दत्तभक्तांमध्ये फारच श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे. जुनागढ, गुजरात मध्ये असलेल्या या पर्वताला पौराणिक कथांमध्ये हिमालय इतकेच महत्वाचे आणि आदराचे स्थान आहे असे म्हणतात कि या पर्वतावर दत्तमहाराजांचे वास्तव्य आहे आणि तीच महाराजांची तपोभूमी आहे. याच पर्वतावर महाराजांनी तप केले होते व याच ठिकाणी महाराजांना त्यांच्या आईने म्हणजे अनुसायामातेने ध्यानातून उठवले होते. अशी माहिती आणि आणखी बरेच काही माहिती उपलब्ध आहे.
माझे सदगुरु दत्तभक्त श्री पाठक गुरुजी हे पोलिस खात्यामध्ये
नोकरीला होते. साधारणपणे १९८० साली ते गिरनार पर्वतावर दत्त महाराजांच्या
पादुकांचे दर्शन घेण्यासाठी १०,००० पायऱ्या चढून
गेले होते. त्या वाटेतच त्यांनी पोलीस खात्याचे Shoes काढून ठेवले आणि ते अनवाणीच गेले. महाराजांच्या Order प्रमाणे त्यानी त्यानंतर कधीच पायात काहीच घातले नाहि.
त्यांच्या पत्नी कै. माई यांनी देखील
पादत्राणे घालण्याचे सोडून दिले. गुरुजींच्या साहेबानि सांगितले कि department मध्ये shoes शिवाय येणे हा
शिस्तभंग आहे .तुमच्यावर कायदेशीर कारवाई
करावी लगेल. कदाचित नोकरी देखिल जाऊ शकते. असे असताना गुरुजी त्यांना म्हटले कि महाराजांचा आदेश supreme आहे. नोकरी सोडावी लागली तरी चालेल. हा
ठामपणा पाहून साहेबांनी माघार घेतली आणि गुरुजीना office duty दिलि. गुरुजींचे आज वय 77 आहे , अमेरिका, युरोप, दुबई तसेच भारतभर
ते फिरत असतात पण अनवाणी. हा काय विश्वास आहे आणि एवढे काय
त्या १०,००० पायऱ्या वर
असलेल्या दत्त पादुकामध्ये आहे हे कुतूहल माझ्या मनात नेहमीच होते आणि दर्शनाची इच्छा होति. गुरुजीना विचारले तेव्हा
त्यांनी सांगितले कि महाराज बोलावतील आणि मग सर्वे काही lineup होईल आणि मग तू जाशील पण त्यांच्या इच्छेनेच.
Office च्या कामानिमित्ताने जुनागढ ला जाण्याची संधी मला साधारणपणे २००६
मध्ये आलि. पहिल्यांदा गेलो तेव्हा आनंद हॉटेल मध्ये रहिलो. खिडकीमधून
गिरनार पर्वत दिसत होता त्याला नमस्कार केला. परंतु कामामुळे वर
जाता आले नाही. असे २-३ वेळा मी जुनागढ ला गेलो. एकदा जुनागढ municipal
corporation मध्यॆ Tender भरायाचे होते (मंगळवारी ) आणि Tender ओपेनिंग गुरुवारी दुपारी २ वाजता होते त्यामुळे बुधवार चा दिवस मोकळाच होता. म्हणून मंगळवारी
Tender submit करवे आणि बुधवारी पहाटे गिरनार पर्वताच्या १०,००० पायऱ्या चढून जायचे आणि मग
रात्रीपर्यंत खाली उतरलो कि मग आराम करून गुरुवारी tender ओपेनिंग attend करून मुंबई ला
यायचे असा प्लान केला. Onduty असल्यामुळे कोणाला काही
विचारायचा काही प्रश्नच नव्हता.
ठरल्याप्रमाणे सोमवारी संध्याकाळच्या विमानाने ने मुंबई हून राजकोट airportला आलो. आमचा लोकाल माणूस
मला जुनागढ ला गाडी ने घेवून गेला. साधारण २ तास लागले. आनंद हॉटेल मध्ये थांबलो . मग Tender संदर्भात meetings ,
office चे फोन चालूच होते. रात्री झोपताना साधारणपणे २ वाजले. माझी पत्नी हि
तेव्हा प्रथमच pregnant होती चौथा महिना
चालू होता त्यामुळे तिच्याशीही बरेचदा बोलणे होत होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळीच जुनागढ municipal corporation मध्ये tender submit केले. जेवून मग गिरनार च्या पायथ्यापाशी आलो. चौकशी केलि. हातामध्ये काठी घेवून १०,००० पायऱ्या उद्या
म्हणजे बुधवारी सकाळी ४ वाजता चढायच्या आणि पादुकांचे दर्शन घेवून
संध्याकाळ पर्यंत खाली उतरायचे म्हणजे आराम करून गुरुवारची मीटिंग
करता येईल असे ठरवले.
तिथल्या माणसांनी सांगितले कि
रात्री कोणालाही एकट्याला वरती सोडत नाहीत कारण हिंस्त्र प्राण्यांचा धोका असतो. पण जर मोठा group असेल तर सोडतात. गिरनार ची उंची छाती दडपणारी
तरीही मी खुप exited होतो. लंबे हनुमानाचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो तो बायकोचा फोन आला. तिने एका वाईट बातमी दिली त्यामुळे लगेचच मुंबई ला जावे लागणार होते आणि गुरुवारच्या विमानाने परत
येवून मीटिंग attend करावी लागणार होति. त्यावेळी मी गिरनारच्या पायथ्याशी होतो.
हॉटेलमधून checkout करणे , राजकोट airport साठी गाडी बुक करणे आणि महत्वाचे
म्हणजे राजकोट मुंबई विमानाचे ticket काढणे आणि वेळेवर airport ला पोहोचणे असे बरेच काही फार
थोड्या वेळात करायचे होते. सर्वप्रथम पाठकगुरुजी न फोन केला. ते म्हणाले काळजी करू नकोस. महाराजांना तिथूनच नमस्कार कर आणि १०० पायरया चढ त्या पायऱ्यांना नमस्कार कर कारण अनेक संत
महात्मे याच मार्गावरून गेले आहेत. मनात काहीही शंका ठेवू नकोस.
प्रचंड धावपळ करून मी Rajkot airport ला पोहोचलो. office ने ticket काढून ठेवले होते. त्यामुळे तो वेळ वाचला. Airport ला उशीरच पोहोचलो पण विमान late असल्या मुळे मला ते मिळाले आणि मी मुंबई ला रात्री पोहोचलो. गुरुवारी परत सकाळच्या विमानाने जुनागढ ला जायचे होते.
असे का झाले ? महाराजांचा कोप
झाला असेल का ? एवढ्या पवित्र ठिकाणी असताना अशी वाईट घटना का घडली ? माझे काही चुकले असेल का ? WHY ME ? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात येत होते. पण गुरुजी म्हणाले कि तुझी
अजून वेळ आली नहि. योग्य वेळी तू नक्कीच जाशिल.
त्यानंतर माझ्या मनात कायमच सल होती कि मी पर्वताच्या पायाथ्याशी जाऊन परत
आलो. लवकर बोलवा असे मी महाराजाना कायम सांगत असे. असो यानंतर कि किमान ५-६ वेळा जुनागढ ला ऑफिस च्या कामाने जाऊन आलो. दर वेळेला हॉटेल आनंदमध्ये राहायचो. व त्या खिडकीतून गिरनार पर्वताचे दर्शन व्हायचे. पण जाण्याचा योग्य मात्र कधीच आला नाही.
माझा मित्र शेखर मला बोलला होता कि कधीतरी आपण गिरनार ला जावु.
मार्च २०१३ मध्ये त्याने मला सांगितले कि नोव्हेंबर २०१३ च्या
त्रिपुरारी पौर्णिमेच्या सुमारास मी जाणार
अहे. तेव्हा तू चल. आपण गिरनार पर्वताची परिक्रमा करू (३८ km ) आणि मग वरती जावून दर्शन घेवु. मी म्हटले कि परिक्रमा आणि वरती जावून दर्शन घेणे
या दोन्ही गोष्टी कठीण आहेत. आणि येवढा stamina माझ्याकडे नाहि. मी फक्त वरती दर्शनाला जाईन. शेखर म्हटला कि अरे ते तू विसर "महाराज नेतील " आणि तुला तर पाठक्गुरुजींचा
आशीर्वाद आहे. त्यामुळे नो प्रोब्लेम. मी
म्हटले अरे. परीक्रमाचा रस्ता डोंगरामधून आहे. सधारणपणे ३८ kms जंगलातून सतत चालावे लागेल आणि त्यानंतर पुन्हा १०००० पायऱ्या चढायच्या म्हणजे कठीणच आहे.
पण तेव्हा म्हटले कि मी फक्त गिरनार पर्वतवर येईन बाकी काही नहि.
माझे मित्र मंदार रानडे, उन्मेष पाटील, विकास भडसावळे जे गिरनार ला जावून आले आहेत त्यांनी सांगितले कि सर्वेकाही जमेल. मी मग पाठक गुरुजीना भेटलो. सांगितले कि गिरनार ला जायची संधी आहे. मागच्यावेळी गडबड झाली होति, तेव्हा तुम्ही दत्त
महाराजांना प्रार्थना करा आणि मला परवानगी द्या मग मी Ticket काढतो. गुरुजी म्हणाले काळजी करू नकोस. तुला परवानगी दिलि.
महाराज नेतील आणि आणून सोडतील. तू पुढच्या तयारीला लाग. शेखर ला कळवले कि
परवानगी मिळाली आहे . तो म्हटला कि हे खुपच छान झाले. तो म्हणाला कि
आपण गिरनार , सोमनाथ, द्वारका ला जाणार
अहोत. सोमनाथ ला लघुरुद्र ठेवला आहे तेव्हा तू कमीतकमी सोमनाथ ला ये. मी म्हटले ठीक अहे. मी गिरनार आणि सोमनाथ करतो आणि द्वारका ला येत नाही. मुंबई हून राजकोट ला विमानाने येईन
आणि जाईन .
माझा कराड चा मित्र विजय पाटील ला फोन केला आणि सांगितले कि तू
माझ्याबरोबर गिरनार ला चल आणि मग सोमनाथ आणि द्वारका कर. तो लगेचच तयार
झाला. कार्तिकी एकादशी ते चतुर्दशी ला गिरनार परिक्रमा करतात हे ३८ km अंतर लोक ४ दिवसात करतात पण आम्ही
मात्र एका रात्रीमध्ये करणार होतो. वर्षातून फक्त ४ दिवस हा जंगलातील रस्ता / पायवाट वन खात्याचे अधिकारी खोलातात आणि भाविकांना चालायला देतात. या परीक्रमेसाठी अनेक संत् , साधू पण मोठ्या
संख्येने येतात. या चार दिवसांमध्ये स्वर्गातून ३३ कोटी देव या पर्वतावर दत्त महाराजना भेटण्यासाठी राहतात असे म्हटले जाते. त्यामुळे या प्रदक्षिणे ला अतिशय महत्व अहे.
प्रदक्षिणा झाली कि ३३ कोटी देवाना आणि दत्त महाराजना प्रदक्षिणा झाली
असे म्हटले जाते. हि परिक्रमा अतिशय दुर्गम रस्त्यातून आणि डोंगर दर्यामधून असते साधारण १० -१२ तास लागतत असे
कळाले.
यात्रेचे नियोजन
या संपूर्ण यात्रेचे नियोजन शेखर ने केले होते. यात ३५-४० जन आहेत त्यात स्त्री पुरुष , काही लहान मुले पण आहेत असे कलले. मला ओळखणारे फक्त ४-५ जन आहेत असे समजले. सगळे जन ट्रेन ने प्रवास्कारणार आणि मी मुंबई राजकोट मुंबई असा विमान प्रवास आणि मग सर्वांबरोबर पुढील प्रवास्कारणार असे ठरले म्हणजे मीच ठरवले.
14 Nov (गुरुवार : मुंबई हून ट्रेन ने प्रयाण (मी राजकोट ला विमानाने येणार )
15 Nov(शुक्रवार) : राजकोट स्टेशन वरून दुसरी ट्रेन पकडून
जुनागढ ला जाने , प्रेरानाधाम मध्ये जाने आणि संध्याकाळी ५ वाजता गिरनार
परिक्रमा चालू
16 Nov (शनिवार) : पहाटे ४ वाजता परिक्रमा पूर्ण.
संध्याकाळी काश्मिरी बापूंचे दर्शन घेणे आणि आराम
17 Nov (रविवार) : सकाळी आराम , संध्याकाळी पुनित् बाबांच्या आश्रमात
ध्यान करणे , नामस्मरण करणे रात्री ११ वाजता गिरनार पर्वतावर जाणे
18 Nov (सोमवार) : पाहते पादुकांचेदर्शन आणि कमंडलू
तीर्थावर धुनी चे दर्शन घेणे दुपारी १ वाजता गिरनार पर्वतावरून प्रेरानाधाम आश्रमामध्ये
येणे आणि मग आराम करणे
19 Nov (मंगळवार) : सकाळी प्रेरानाधाम् मध्ये नास्ता करून सोमनाथ ला बस ने जाने. सोमानाथ आणि
स्थानिक स्थानांचे दर्शन , तिथे लघु रुद्र पूजा करणे
20 Nov (बुधवार) : दुपारी जेवून द्वारका ला बस ने जाणे , रात्री द्वारका मुक्काम
21 Nov (गुरुवार) : सकाळी भेट द्वारका , नागेश्वर ज्योतिर्लिंग , गोपी तलाव , रुक्मिणी मंदिर चे दर्शन घेणे
22 Nov (शुक्रवार) : दुपारी मुंबई साठी ट्रेन पकडणे (मी सकाळची
ट्रेन पकडून राजकोट आणि तिथून विमानाने मुंबई )
मी श्री विजय पाटील , कराड याला फोन करून सागितले कि तारखा fix झाल्या आहेत त्याप्रमाणे तू ये.त्यप्रमाणे मी विमानाची आणि शेखर ने ट्रेन ची ticket काढली. या ठिकाणी जास्तीत जास्त जप आणि उपासना करावी असे मी ठरवले. आत्ता महाराज काय काय करून घेतात त्याची उत्सुकता होती.
तयारी
गिरनार यात्रा फार कठीण आहे आणि त्यात stamina वाढवणे महत्वाचे आहे, म्हणून मी Carter Road , बांद्रा जे माझ्या घराजवळ आहे तिथे रोज सव्वा तास fast walking करायचे ठरवले. माझा गिरगाव चा मित्र उज्वल जाधव याने सांगितले कि मी तुम्हाला Sports sandal आणि pocket torch स्वस्तामध्ये आणि चांगली घेवून देतो.त्याप्रमाणे मी गिरगाव ला जावून Pocket torch आणि Sports sandal विकत घेतलि.
September मध्ये मी Carter Road , बांद्रा वर रोज संध्याकाळी fast walking चालू केले , पण या वेळी पाऊस लांबल्यामुळे मला अनेकदा walking करता येत नसे. मग श्री पंकज यांनी सांगितले कि रोज ९ मजल्याची इमारत किमान एकदा तरी चढून जावी त्यामुळे stamina वाढेल. ते पण केले पण रोज बांद्रा ला जाणे जमत नव्हते. त्यामुळे ते देखील Irregular झले. मग माझ्या राहत्या घरी तीन मजल्याची इमारत रोज १० वेळा तरी पायी चढून जावी आणि उतरावी असे काही दिवस् केले पण मध्येच इमारत दुरुस्तीचे काम चालू झाल्यामुळे ते देखिल करता आले नाही. एकंदरीत जास्त practice करता आली नहि. विजय पाटील हे कराड वरून येताना ankelete , knee cap ,कानटोपी , चालून पाय दुखतील म्हणून muscle relaxant , homeopathy ची औषधे घेवून येणार होते. विशेष म्हणजे गिरनार ला जायचे ठरल्याबरोबर गिरनार बद्दल माहिती automatically मिळायला लागलि. गिरनार ला जावून आलेले लोक संपर्कात येवू लागले. त्यांच्याशी चर्चा होवू लागलि. Dr . सुनील काळे , गिरनारवर १४ वर्षे राहिलेले महादेव बाबा , १०८ पेक्षा जास्तवेळा गिरनार वारी केलेले श्री प्रमोद केने यांच्या भेटी झाल्या. एकंदरीत वातावरण गिरनारमय़ झाले होते.
परंतु गेल्या वेळी मला गिरनार वर जाता आले नाही ती आठवण कायमच मनात होति. शिवाय मागच्या वर्षभरात माझे वजन १० किलो ने वाढले होते हा देखील चिंतेचा विषय होत. म्हणजे extra १० किलो घेवून मी चालणार होतो.
मला गिरनार वर जायचे आहे हा सुप्त अहंकार मनात होता हे माझ्या मनात येणाऱ्या विचारांवरून मला जाणवत होते. आणि हा अहंकार धोकादायक होता. शेवटी निघायच्या ७-८ दिवस आधी पाठक गुरुजींची भेट झाली आणि पूर्णपणे शरण आलो. गुरुजीना म्हटले कि माझा stamina बघून मला असे वाटत नाही कि माझ्याच्याने गिरनार परिक्रमा आणि पर्वतावर जाऊन पादुकांचे दर्शन घेणे होईल. आत्ता मला महाराजांनीच न्यावे आणि पुन्हा आणून सोडावे. त्यामुळे tension बरेच हलके झाले.
विजय पाटील हे ठरल्या प्रमाणे १३ नोव्हेंबर ला मुंबई मध्ये आले. माझ्या वस्तू त्यांनी मला दिल्या. माझे अहमेदाबाद चे मित्र हेतलभाई यांनी १४ नोव्हेंबर रात्री मुक्कामासाठी मला राजकोट ला हॉटेल Platinum मध्ये एक रूम ४० % सवलती मध्ये बुक करून दिला.
घरी फोन करून सांगितले कि मी राजकोट ला पोहोचलो आणि उद्या गिरनार ला जाईन. रात्री झोपत झोपत ११ वाजले. आत्ता tension नव्हते आणि tension घेवून फायदाही नव्हता.
सगळे लक्ष माझे पाय मला कशी साथ देतात त्यावर होते. मला दोन पाय आहेत आणि आजपर्यंत ते विनातक्रार माझे वजन घेवून मला सगळीकडे जातात आणि पाय हे खूप महत्वचे अहेत तसेच बरेच जबाब दारीचे काम ते करतात याबद्दल माझ्या मनात automatic आदरभाव आला.
विजय याने फर्मान काढलेकी तू आमच्याबरोबर द्वारका ला यायचे सोमनाथ हून परत यायचे नहि. मग माझे सोमनाथ ते राजकोट असे परतीचे ट्रेन टीकेत आम्ही रद्द केले. वर्षातील हि मोठी यात्रा असल्यामुळे जुनागढ स्टेशन ला गर्दी होति. त्यात आम्ही ६-७ रिक्शा करून गिरनारच्या पायथ्यापाशी पोहोचलो.
रस्त्यामध्ये माणसांचे थवे होते. त्यातली बहुतेक जन परत येत होति. पोलिसांनी आमची रिक्षा १. ५ kms आधीच थम्बवलि. आणि आम्हला पुढे चालात जायला सांगितले कारण गर्दी खूप होति. मग आम्ही ३५ जन समान घेवून चालत निघालो.चालत चालत प्रेरणा धाम आश्रमम्ध्ये आलो. गिरनार पर्वाताच्या पायथ्याशी वसलेला हा खूप मोठा आश्रम अहे. यातून आपल्याला गिरनार दर्शन होते. प्रत्येक रूम मध्ये ५-६ जन असे आम्ही ७ रूम घेतल्या. माझ्या रूम मध्ये अम्हि ५जण होतो. सर्वांनी स्नान केले आणि जेवण घेतले.
आम्ही चालत होतो वाटेत गर्दी नव्हती. ६ वाजताच अंधार पडला आणि कच्चा रस्ता चालू झाला. सुकलेला ओढा कसा असतो तशी दगड धोंड्यातली पायवाट होति. त्यातून आम्ही छोटे छोटे डोंगर चढत आणि उतरत होतो. कधी कधी घसरायला व्हयचे. त्यात फक्त आमच्या torch चा light आणि चंद्रप्रकाश होता. पायवाट चुकू नये म्हणून जागोजागी दगडांवर पांढरा रंग लावला होता त्याच्याच आधारावर आम्ही चालत होतो. नामस्मरण चालू होते. दम लागला कि थांबायचे आणि सर्वांनी एकत्र चालायचे असे चालत होतो. अडचणीचा रस्ता , शुभ्र चंद्रप्रकाश , निरव शांतता आणि सोबतीला आमचे नामस्मरण आणि आमचा आवाज होता.
पुढच्या forest chowki ला अजून ७-८ जन भेटले . ते एकटे किव्हा २-३च्या ग्रुप ने आले होते म्हणून Forest च्या अधिकार्यांनी त्यांना थांबवले होते. मग आम्ही आल्यावर त्यांना आमच्याबरोबर सोडले. आणि एकत्र चालण्याची सक्त ताकीद दिलि. कारण पुढे कुठेतरी सिंह दिसले होते. एवढी चढ उताराची पायवाट चालून आम्हाला थंडीत देखील घामाच्या धारा वाहत होत्या. पाणी पिणे आणि खडीसाखर खाणे चालू होते. मी . विजय आणि शेखर सर्वांच्या पुढे होतो.
साधारणपणे रात्री ८-१५ ला आम्ही चीनाबाबा मढीला पोहोचलो . तिथे आम्ही १० मिनिटे थांबलो. दम तर लागलाच होत. पाय भरले होते. पण उत्साह कायम होता. (परिक्रमा करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे, आपल्या आयुष्यातले सर्वे प्रोब्लेम , बाहेरचे विश्व यांच्याशी आपण total cutoff असतो. फक्त दत्तमहाराजांचे ध्यान , ध्यास आणि स्मरण यात संपूर्ण वेळ जातो.परिक्रम म्हणजे आपली शारीरिक , मानसिक आणि अध्यात्मिक परीक्षा असते हे मात्र नक्कि. यात्काही कठीण चढण आहेत याला घोडी म्हणतात. जवळपास ७० degree अंशामध्ये पायवाटेवरून चालावे लगते. घसरण्याचा धोका असतो. शिवाय खूपच दम लगतो. गमंत म्हणजे तुम्ही दमलात किंव्हा कंटाळा आला तरी काहीही पर्याय नहि. ग्रुप बरोबर चालणे आणि परिक्रमा पूर्ण करणे हाच एक पर्याय आहे .)
पुन्हा आम्ही परिक्रमा चालू केली , बहुतेक चढण होती पण रात्र असल्यामुळे आपण कित्ती चाललो आणि किती उंचीवर आहोत ते कळत नव्हते. बाजूला लांबच लांब आणि उंच गिरनार पर्वताच्या वरची lighting दिसत होति. अनुभवी लोक आम्हाला अम्बाजीमाता पर्वत , गोरक्षनाथ पर्वत आणि दत्तमहाराज पर्वत दाखवत होते. या पायार्यावरची light खालून खूपच सुंदर दिसत होति. आणि आम्ही परिक्रमा करत असल्यामुळे आम्हाला सर्वे बाजूने गिरनार पर्वत बघायला मिळाला. परंतु गिरनार पर्वताची उंची बघून छाती दडपली. थोडे tension नक्कीच आले.
परिक्रमा चालूच होति. नामस्मरण चालू होते. दमलो कि बसायचो, एकमेकासाठी थांबायचो आणि दमालेल्याना हुरूप द्यायचा हे चालूच होते.
रात्री ११-२० ला आम्ही कालीमाता मदिर / शांतीनाथ महादेव मंदिरापाशी अलो. येथे १५ मिनिटे थांबलो. पाणी बाटल्यामध्ये भरले आणि पुन्हा परिक्रमा चालू केलि. आत्ता शेवटची व खूप कठीण चढण होति. घामाच्या धारा लागल्या होत्या. थकायला झाले होते , पाय भरले होते पण उत्साह कायम होत. हि चढण खूपच परीक्षा बघणारी ठरलि. पण सर्वांनी तासाभरात हि चढण पूर्ण केलि. आम्ही पहिले कि आम्ही एका डोंगराच्या Top वर अहोत. आणि समोर गिरनार पर्वत तर दिसताच होत. वारा खूप सुटला होता. थंडी पण होती.
आता उतरण चालू झलि. उतरतानाही खूपच सांभाळून उतरावे लागत होते. साधारणपणे रात्री १-३० ला आम्ही परिक्रमेच्या मार्गात असलेल्या जलाराम बाप्पाच्या गुरुंच्या आश्रमा मध्येपोहोचलो. तिथे अम्हाला अमृत तुल्य चहा मिळाला. सर्वांनी २-३ कप चहा पिला.पुन्हा परिक्रमा चालू.
रात्री १-५० ला आम्ही बोरदेवी फाटा ला पोहोचलो.तिथून सरळ रस्ता होत. अंदाजे १०-१२km अंतर बाकी होते. हळूहळू चालत आम्ही पाहते ३-४० ला परिक्रमा पूर्ण केलि. ३-५० ला पुन्हा भवनाथ मंदिरात बाहेरूनच नमस्कार केला. महाराजांचे आभार मानले आणि सकाळी ४-१० ला प्रेरणा धाम मध्ये येवून झोपलो. पाय दुखतच होते पण खूप आनंद आणि प्रसन्नता होति. त्यात झोप कधी लागली ते कळलेच नहि. झोपेतदेखील आपण अजून परीक्रमे मध्ये चालतच आहोत असा भास होत होत.
अशा प्रकारे गिरनार पर्वत परिक्रमा ३८ km संध्याकाळी ५ ते सकाळी ४-१० या वेळेत महाराजांनी पूर्ण करून घेतली. देवाची कृपा असेल तर आपण किती चालू शकतो हे कलले. आमच्या ग्रुप मधील लट्ठ माणसांनी , बायका आणि लहान मुलीनी देखील परिक्रमा पूर्ण केलि. त्यांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला सलाम.
सकाळी उठून नसता केला. बाजारात सहजच जावून round मारला. ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. आज रात्री ११ वाजता आम्ही गिरनार पर्वत चढणार होतो. दुपारी जेवलो आणि आराम केला. पुन्हा एकदा पायाला मोलीश करून घेतली.
सकाळी सूर्योदयाबरोबर थंडी पळून गेली होति. छानच वाटत होते. सकाळी ६. ४५ ला आम्ही गुरुगोराक्षानाथ पर्वतावर पोहोचलो. तिथले साधू शेखरच्या ओळखीचे होते त्यामुळे त्यांनी मंदिर उघडून दिले. धुनिचेदर्शन घेतले आणि आमच्या ग्रुप ला तिकडचे भस्म दिले. गोराक्षनाथाना सलाम करून आम्ही निघालो.
सकाळी ७ वाजता अंबाजी माता मंदिरात आलो. काल रात्री वादळामध्ये आम्ही इथेच तासभर थांबलो होतो. आत्ता मात्र उजेडात मंदिर छान दिसत होते. आमच्यासमोरच पुजाऱ्याने मंदिर उघडले आणि आम्ही देवीच्या आरतीला उभे राहिलो. मग दर्शन घेवून देवीपुढे नतमस्तक होवून निघलो. हळूहळू पायऱ्या उतरत आम्ही गौमुखी गंगा मंदिरापाशी आलो. तिथून शेखरने आम्हाला एका वेगळ्याच वाटेने आनंद गुफेमध्ये घेवून गेला. हि एक अरुंद अशी छोटी गुफा आहे. ध्यानधारणा आणि उपासनेसाठी उत्तम. त्यात आम्ही वाकून सरपटत गेलो. मी तिथे बसून थोडा जप केला. तिथल्या साधूने मन आम्हाला चहा बनवला.
मग तिथून जवळच असलेल्या महाकाली गुफेत गेलो. हि गुफा मोठी होती , म्हणजे साधारणपणे २०-२५ मनसे बसतील एवढी मोठी. त्या साधूने देखील आम्हाला प्रेमाने चहा दिला. दोनीही ठिकाणच्या चहामध्ये काहीतरी स्थानिक वनस्पती होति.
September मध्ये मी Carter Road , बांद्रा वर रोज संध्याकाळी fast walking चालू केले , पण या वेळी पाऊस लांबल्यामुळे मला अनेकदा walking करता येत नसे. मग श्री पंकज यांनी सांगितले कि रोज ९ मजल्याची इमारत किमान एकदा तरी चढून जावी त्यामुळे stamina वाढेल. ते पण केले पण रोज बांद्रा ला जाणे जमत नव्हते. त्यामुळे ते देखील Irregular झले. मग माझ्या राहत्या घरी तीन मजल्याची इमारत रोज १० वेळा तरी पायी चढून जावी आणि उतरावी असे काही दिवस् केले पण मध्येच इमारत दुरुस्तीचे काम चालू झाल्यामुळे ते देखिल करता आले नाही. एकंदरीत जास्त practice करता आली नहि. विजय पाटील हे कराड वरून येताना ankelete , knee cap ,कानटोपी , चालून पाय दुखतील म्हणून muscle relaxant , homeopathy ची औषधे घेवून येणार होते. विशेष म्हणजे गिरनार ला जायचे ठरल्याबरोबर गिरनार बद्दल माहिती automatically मिळायला लागलि. गिरनार ला जावून आलेले लोक संपर्कात येवू लागले. त्यांच्याशी चर्चा होवू लागलि. Dr . सुनील काळे , गिरनारवर १४ वर्षे राहिलेले महादेव बाबा , १०८ पेक्षा जास्तवेळा गिरनार वारी केलेले श्री प्रमोद केने यांच्या भेटी झाल्या. एकंदरीत वातावरण गिरनारमय़ झाले होते.
परंतु गेल्या वेळी मला गिरनार वर जाता आले नाही ती आठवण कायमच मनात होति. शिवाय मागच्या वर्षभरात माझे वजन १० किलो ने वाढले होते हा देखील चिंतेचा विषय होत. म्हणजे extra १० किलो घेवून मी चालणार होतो.
मला गिरनार वर जायचे आहे हा सुप्त अहंकार मनात होता हे माझ्या मनात येणाऱ्या विचारांवरून मला जाणवत होते. आणि हा अहंकार धोकादायक होता. शेवटी निघायच्या ७-८ दिवस आधी पाठक गुरुजींची भेट झाली आणि पूर्णपणे शरण आलो. गुरुजीना म्हटले कि माझा stamina बघून मला असे वाटत नाही कि माझ्याच्याने गिरनार परिक्रमा आणि पर्वतावर जाऊन पादुकांचे दर्शन घेणे होईल. आत्ता मला महाराजांनीच न्यावे आणि पुन्हा आणून सोडावे. त्यामुळे tension बरेच हलके झाले.
विजय पाटील हे ठरल्या प्रमाणे १३ नोव्हेंबर ला मुंबई मध्ये आले. माझ्या वस्तू त्यांनी मला दिल्या. माझे अहमेदाबाद चे मित्र हेतलभाई यांनी १४ नोव्हेंबर रात्री मुक्कामासाठी मला राजकोट ला हॉटेल Platinum मध्ये एक रूम ४० % सवलती मध्ये बुक करून दिला.
मुंबईहून प्रयाण
१४ नोव्हेंबर ला आईचा वाढदिवस होता त्यामुळे दुपारी जेवल्यावर आम्ही केक कापला . माझे संध्याकाळी ६-५० चे मुबई राजकोट असे विमान होते. त्यामुळे मी अंदाजे ५ वाजता airport ला पोहोचलो. तिथे माझे मित्र श्री महेश हिरवे शुभेछा देण्यासाठी विमानतळावर आले. Dr. काळे यांची गाणी म्हणणारे आणि स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पंडित रघुनंदनदादा पणशीकर यांची विमानतळावर अचानक भेट झाली , त्यामुळे डॉ. सुनिल काळे यांचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटले.
ट्रेनने एकंदरीत ३५ जन बांद्रा Terminus हून संध्याकाळी ५ वाजता निघाले. श्री शेखर आणि विजय यांच्या मी संपर्कात होतो. माझे मुंबईहून विमान साधारणपणे संध्याकाळी ७ वाजता निघाले आणि रात्री ८-१५ ला राजकोट विमानतळावर पोहोचलो. हॉटेल ची कार ने विमानतळाहून हॉटेल ला गेलो. उद्या सकाळी ७ वाजता बाकी जन राजकोट स्टेशन ला येणार होते. त्यानंतर आम्ही सगळे जन एकत्र जाणार होतो.
![]() |
| पंडित रघुनान्दान् दादा पणशीकर |
घरी फोन करून सांगितले कि मी राजकोट ला पोहोचलो आणि उद्या गिरनार ला जाईन. रात्री झोपत झोपत ११ वाजले. आत्ता tension नव्हते आणि tension घेवून फायदाही नव्हता.
![]() |
| राजकोट विमानतळावर पोहोचलो |
१५ नोव्हेंबर २०१३ गिरनार परिक्रमा
ठरल्याप्रमाणे सकाळी ७-१५ ला ट्रेन ने सर्वेजन राजकोट स्टेशन ला पोहोचले. मी देखील रिक्षा ने स्टेशन ला अलो. सर्वाना भेटून खूप आनंद झाला. ताबडतोब आम्ही बाजूच्या platform उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये जाऊन बसलो. आमच्यापैकी ३-४ लोकांनी आमची टिकेट काढली. प्रवास सुरु झाला. अनेक वर्षांनी मी स्लीपर क्लास ने प्रवास केल. पण ग्रुप असल्यामुळे खूप मज्जा आलि. नामस्मरण करत आणि गप्पा मारत दुपारी १२ वाजता आम्ही जुनागढ स्टेशन ला पोहोचलो.
![]() |
| राजकोट ते जुनागढ ट्रेन |
![]() |
| रीच्क्षामध्ये, जुनागढ |
![]() |
| इथून गिरनार परिक्रमा सुरु होते |
संध्याकाळी ५ वाजता आम्ही २७ जन परिक्रमेला निघलो. काही जन रूम मध्येच थांबले. ५-२० ला आम्ही भवनाथ मंदिरात अलो. (येथून गिरनार परिक्रमा / यात्रा सुरु करतात ). भवानाथ ,शंकराचे प्राचीन मन्दिर आहे.
त्याला नमस्कार केला. कमरेला pouch होता ज्यात torch , पैसे , कॅमेरा , काही औषधे होति. sweater आणि कानटोपी बरोबर होति. थंडीचे दिवस असल्यामुळे व जंगल असल्यामुळे साहजिकच बोचरी थंडी होति.महाराजांना नमस्कर केला . total surrender तर आधीच झालो होतो. ग्रुप मधील सर्वांचा आत्मविश्वास बघून हुरूप आला होत. forest ची चौकी असणार याची पूर्वकल्पना होति. आणि संपूर्ण परिक्रमा रात्री अंधारात जंगलातून करायची आहे हे देखील माहित होते. सुरुवातीचा १ km चा रस्ता चांगला होता. त्यामुळे चालायला काहीच अडचण आली नहि. पहिल्याच चौकी ला forest च्या अधिकार्यांनी अडवले. महटले कि "अरे भाई , परिक्रमा खतम हो गयी है. " पण आमचा २७ जणांचा ग्रुप बघून आणि दृढ निश्चय बघून त्याने परवानगी दिली. "जंगल मे जनावर हे और आप सब लोग एकसाथ चलिये और जोर जोर से बाते करते हुवे चलिये कालतक साढेचार लाख लोगोने परिक्रमा पुरी कि है. लेकिन आज कोई नहि." असे आम्हला सांगितले.आम्ही चालत होतो वाटेत गर्दी नव्हती. ६ वाजताच अंधार पडला आणि कच्चा रस्ता चालू झाला. सुकलेला ओढा कसा असतो तशी दगड धोंड्यातली पायवाट होति. त्यातून आम्ही छोटे छोटे डोंगर चढत आणि उतरत होतो. कधी कधी घसरायला व्हयचे. त्यात फक्त आमच्या torch चा light आणि चंद्रप्रकाश होता. पायवाट चुकू नये म्हणून जागोजागी दगडांवर पांढरा रंग लावला होता त्याच्याच आधारावर आम्ही चालत होतो. नामस्मरण चालू होते. दम लागला कि थांबायचे आणि सर्वांनी एकत्र चालायचे असे चालत होतो. अडचणीचा रस्ता , शुभ्र चंद्रप्रकाश , निरव शांतता आणि सोबतीला आमचे नामस्मरण आणि आमचा आवाज होता.
पुढच्या forest chowki ला अजून ७-८ जन भेटले . ते एकटे किव्हा २-३च्या ग्रुप ने आले होते म्हणून Forest च्या अधिकार्यांनी त्यांना थांबवले होते. मग आम्ही आल्यावर त्यांना आमच्याबरोबर सोडले. आणि एकत्र चालण्याची सक्त ताकीद दिलि. कारण पुढे कुठेतरी सिंह दिसले होते. एवढी चढ उताराची पायवाट चालून आम्हाला थंडीत देखील घामाच्या धारा वाहत होत्या. पाणी पिणे आणि खडीसाखर खाणे चालू होते. मी . विजय आणि शेखर सर्वांच्या पुढे होतो.
साधारणपणे रात्री ८-१५ ला आम्ही चीनाबाबा मढीला पोहोचलो . तिथे आम्ही १० मिनिटे थांबलो. दम तर लागलाच होत. पाय भरले होते. पण उत्साह कायम होता. (परिक्रमा करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे, आपल्या आयुष्यातले सर्वे प्रोब्लेम , बाहेरचे विश्व यांच्याशी आपण total cutoff असतो. फक्त दत्तमहाराजांचे ध्यान , ध्यास आणि स्मरण यात संपूर्ण वेळ जातो.परिक्रम म्हणजे आपली शारीरिक , मानसिक आणि अध्यात्मिक परीक्षा असते हे मात्र नक्कि. यात्काही कठीण चढण आहेत याला घोडी म्हणतात. जवळपास ७० degree अंशामध्ये पायवाटेवरून चालावे लगते. घसरण्याचा धोका असतो. शिवाय खूपच दम लगतो. गमंत म्हणजे तुम्ही दमलात किंव्हा कंटाळा आला तरी काहीही पर्याय नहि. ग्रुप बरोबर चालणे आणि परिक्रमा पूर्ण करणे हाच एक पर्याय आहे .)
![]() |
| चीनाबबा ची मढी |
परिक्रमा चालूच होति. नामस्मरण चालू होते. दमलो कि बसायचो, एकमेकासाठी थांबायचो आणि दमालेल्याना हुरूप द्यायचा हे चालूच होते.
रात्री ११-२० ला आम्ही कालीमाता मदिर / शांतीनाथ महादेव मंदिरापाशी अलो. येथे १५ मिनिटे थांबलो. पाणी बाटल्यामध्ये भरले आणि पुन्हा परिक्रमा चालू केलि. आत्ता शेवटची व खूप कठीण चढण होति. घामाच्या धारा लागल्या होत्या. थकायला झाले होते , पाय भरले होते पण उत्साह कायम होत. हि चढण खूपच परीक्षा बघणारी ठरलि. पण सर्वांनी तासाभरात हि चढण पूर्ण केलि. आम्ही पहिले कि आम्ही एका डोंगराच्या Top वर अहोत. आणि समोर गिरनार पर्वत तर दिसताच होत. वारा खूप सुटला होता. थंडी पण होती.
![]() |
| जलाराम बाप्पांचे गुरु |
![]() |
| श्रावण बाळाने याच ठिकाण कावड ठेवली होती |
![]() |
| tea break रात्री १-३० ला मी , शेखर |
रात्री १-५० ला आम्ही बोरदेवी फाटा ला पोहोचलो.तिथून सरळ रस्ता होत. अंदाजे १०-१२km अंतर बाकी होते. हळूहळू चालत आम्ही पाहते ३-४० ला परिक्रमा पूर्ण केलि. ३-५० ला पुन्हा भवनाथ मंदिरात बाहेरूनच नमस्कार केला. महाराजांचे आभार मानले आणि सकाळी ४-१० ला प्रेरणा धाम मध्ये येवून झोपलो. पाय दुखतच होते पण खूप आनंद आणि प्रसन्नता होति. त्यात झोप कधी लागली ते कळलेच नहि. झोपेतदेखील आपण अजून परीक्रमे मध्ये चालतच आहोत असा भास होत होत.
अशा प्रकारे गिरनार पर्वत परिक्रमा ३८ km संध्याकाळी ५ ते सकाळी ४-१० या वेळेत महाराजांनी पूर्ण करून घेतली. देवाची कृपा असेल तर आपण किती चालू शकतो हे कलले. आमच्या ग्रुप मधील लट्ठ माणसांनी , बायका आणि लहान मुलीनी देखील परिक्रमा पूर्ण केलि. त्यांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला सलाम.
16 Nov 2013 - RESTDAY (Saturday)
शनिवारी पाहते ४-१५ ला अंथरुणावर पडलो पाय दुखत होते पण मनात खूप आनंद होता. सकाळी ७ वाजता जाग आलि. कोणीतरी गरम पाण्याचा बंब पेटवला होता. बादलीतून मग गरम पाणी आणून आमच्या अंघोळी चालू झाल्या.
![]() |
| गरम पाणी घेताना |
आश्चर्य कारक रित्या आम्ही सगळे जन फ्रेश होतो. उद्या रात्री गिरनार पर्वत चढून जायचा होता. सोमवारी सकाळी गुरुशिखारावरील म्हणजे १०,००० पायरया वरील दत्तपादुकांचे दर्शन घ्यायचे होते. नंतर तिथेच जवळच असलेल्या कमंडलू तीर्थावरील अखंड धुनीची लाकडे सोमवारी सकाळी बदलतात त्याचे दर्शन घ्यायचे होते. आज पौर्णिमा संध्याकाळी ७ ते उद्या रविरारी ८-३० pm पर्यंत होति.
सकाळी ९ वाजेपर्यंत सगळ्यांच्या अंघोळी झाल्या मग आम्ही नास्ता केला. मी एका मोलीश वाल्याला रूम वर बोलावून पायाला मोलीश करून घेतलि. त्याने ५० रुपयात कापुर मिश्रीत राई च्या तेलाने पायाला मोलीश केलि. इतर काही जननी देखील मोलीश केलि. आज तसा आरामाच होता. दुपारी झोपलो. अजून काही जन मुंबईहून अले. असे आत्ता आम्ही ४२ जन झालो होतो.
दुपारी ३ वाजता पुन्हा काश्मिरीबापू या महात्म्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये ४ किलोमीटर चालत गेलो. त्यांच्या आश्रमामध्ये बरीच गर्दी होति. त्यांचे दर्शन घेतले मग प्रसाद् घेवून पुन्हा चालत चालत प्रेरणा धाम मध्ये आलो. पाय विशेष दुखले नाहीत. संध्याकाळी तासभर नामस्मरण केले आणि मग गप्पा मारत मारत झोपलो.

| काश्मिरी बापू च्या आश्रमा बाहेर विजय पाटील,मी , शेखर |
![]() |
| विकास भडसावळे , अक्षय , शेखर , मी, नंदू |
१७ नोव्हेंबर २०१३ गिरनार पर्वत १०००० पायऱ्या
![]() |
| गिरनार पर्वत |
![]() |
| आमचा ग्रुप |
सकाळी उठून नसता केला. बाजारात सहजच जावून round मारला. ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. आज रात्री ११ वाजता आम्ही गिरनार पर्वत चढणार होतो. दुपारी जेवलो आणि आराम केला. पुन्हा एकदा पायाला मोलीश करून घेतली.
संध्याकाळी प्रेरानाधामच्या शेजारी पुनीत बाबाचा आश्रम आहे. जे फक्त पौर्णिमेलाच दर्शन देतात. त्यांच्याकडे गेलो. तासभर त्यांनी प्रवचन केले. २० मिनिटे आमच्याकडून ध्यान करून घेतले. तसेच त्यांनी "हरी ओम तत्सत जय गुरुदत्त " या मंत्राचा जप करून घेतला. मग प्रसाद् भोजन झाले. तिथे शंकर महाराज मठ , धनकवडी , पुणे येथे मिळणारी खिचडी प्रसाद म्हणून मिललि. खूप आनंद झाला. शंकर महाराजांचा आशीर्वाद मिळाला असे वाटले.
![]() |
| पुनित् बाबा |
८ वाजेपर्यंत आम्ही परत प्रेरणा धाम मध्ये आलो. mobile , कॅमेरा , rechargeable torch पुर्नापाने charge करून घेतले. कानटोपी, sweater , Pouch ,पाण्याची बाटली, औषधाच्या गोळ्या घेतल्या , खडीसाखर घेतलि. महाराजाना मनोमन प्रार्थना केली कि व्यवस्थित घेवून जा आणि घेवून या. रात्री १०-४५ ला आम्ही "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त " च्या जय्घोशामध्ये प्रेरणा धाम मधून निघलो. भवनाथ मंदिरात येवून प्रार्थना केलि. हातात धरण्यासाठी काठी घेतली. लंबे हनुमान मंदिरात नमस्कार केला. अंदाजे रात्री ११ वाजता गिरनारच्या पहिल्या पायरी वर पोहोचलो. तिथे पाया पडलो. संपूर्ण शरणागती .
![]() |
| भाव् नाथ मंदिर - starting point |
पाठक गुरुजीना फोन केला त्यांचे आशीर्वाद घेतले. अंगावर रोमांच होता आणि समोर उंचच उंच गिरनार आणि त्या पायरया दिसत होत्या. "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त " म्हणून आम्ही नतमस्तक आणि शरणागत भावनेने गिरनारच्या पायरया चढू लागलो. पायऱ्या खूपच steep असल्यामुळे बराच दम लागत होता. जरा दम लागला कि आम्ही बसायचो. १-२ मिनीट बसून पुन्हा चालायला लगयचो. कुठलीही शर्यत नव्हती त्यामुळे पायाची काळजी घेत , न थकता चढने हे महत्वाचे होते. खाली उतरणारे काही लोक भेटत होते.
विशेष थंडी वाजत नव्हति. कारण चालताना शरीरामध्ये उष्णता निर्माण होत होति. विजय पाटील हा मला पाण्यामध्ये ग्लुकॉन D टाकून दयायचा त्यामुळे तरतरी यायचि. येताना आणि जाताना लोक "जय गिरनारी " असा जयघोष करायचे आम्हीही तसेच म्हणायचो त्यामुळे उत्साह यायचा.एका बाजूला खोल दरी आणि दुसर्या बाजूला डोंगरकडा आणि मध्ये असलेल्या पायऱ्या वरून आम्ही चालत होतो.
२५०० पायरया वर असलेल्या राजा भर्तुहरि गुफेमध्ये आम्ही पोचलो तिथे १० मिनिटे आराम करून १२. ४० am ला निघलो.
मनात नामस्मरण आणि महाराजांच्या पादुकास्थानापर्यंत म्हणजे १०००० पायरया वर पोहोचण्याचा ध्यास हेच मनात होते.
खाली उतरताना काळजीपूर्वक उतरावे नाहीतर पायात गोळे येतात असे आम्हाला कळले म्हणून आम्ही सगळे जन हळूहळू उतरत होतो.
साधारणपणे ११-५० ला आम्ही १३५० पायरया वर पोहोचलो. १२-२० am ला २१५० पायऱ्या झाल्या. तो पर्यंत मन आणि शरीर त्या चढण ला adjust झाले होते. खरे म्हणजे पहिल्या १००० मध्येच आपली body adjust होते.
२५०० पायरया वर असलेल्या राजा भर्तुहरि गुफेमध्ये आम्ही पोचलो तिथे १० मिनिटे आराम करून १२. ४० am ला निघलो.
![]() |
| भार्तारीनाथ गुफा |
मनात नामस्मरण आणि महाराजांच्या पादुकास्थानापर्यंत म्हणजे १०००० पायरया वर पोहोचण्याचा ध्यास हेच मनात होते.
![]() |
| कालीमाता मंदिर, गिरनार पायरयावर , जैन मंदिरानंतर |
![]() |
| विजय पाटील |
![]() |
| पायरया चढताना मी |
साधारणपणे १.४० am ला आम्ही जैनमंदिर म्हणजे नेमीनाथ मंदिर पाशी आलो. अतिशय सुरेख आणि स्वच्च असे हे मंदिर आहे. अर्थात रात्री ते बंद होते. पुन्हा प्रवस् सुरु. पहाटे १. ला आम्ही गौ मुखी गंगा मंदिरापाशी अलो.
![]() |
| गौ मुख गंगा मंदिर |
वारा जोरात वाहत होत. थंडी वाजायला चालू झलि. त्यामुळे आम्ही sweater आणि कानटोपी घातलि. हातात असलेल्या काठीचा फायदा झाला.
सकाळी २-२० am ला आम्ही अंबाजी माता मंदिरापाशी पोहोचलो. (५००० steps ) तिथून गोरक्षनाथ मंदिर दिसत होते पण वादळ सुरु झाले आणि खूपच थंडी वाजू लागली. निसर्गा पुढे आपण किती लहान आहोत हे जाणवले. एवढ्या वाऱ्यामध्ये पुढे जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे आम्हा सर्वाना येथे थांबावे लगले. मंत्रालयाचा एक अधिकारी वर्गाचा ग्रुप भेटला तो उघड्यावरच चादार् घेवून झोपला होता. काही म्हातारी माणसे , स्त्रिया , लहान मुले देखील भेटली ती देखील थांबली होति. आम्ही मात्र आडोसा घेवून उभे रहिलो. आणि वादळ शांत होण्याची वाट बघत होतो.
![]() |
| Ambaji mata mandir at 5000 steps |
![]() |
| Ambaji mata mandir at 5000 steps |
साधारणपणे एका तासात वादळवारा शांत झाला. मग आम्ही पुढे निघलो. अम्बाजीमाता मंदिर पासून रास्ता बराच सोपा आहे (comparatively ). कारण ७००० स्टेप्स वरील गोरक्षनाथ मंदिर समोरच दिसते. थोडा उतार आणि थोडी चढण असे करून अंदाजे ३.४० am ला आम्ही गोरक्षनाथ मंदिरामध्ये पोहोचलो.
![]() |
| गोरक्षनाथ मंदिर ७००० पायऱ्या वर |
गुरुगोराक्षानाथ मंदिरापासून दत्तपादुका शिखर दिसते त्यामुळे खूपच हुरूप येतो परंतु ३००० स्टेप्स अजून बाकी आहेत आणि त्यात खूपच कठीण चढण आणि उतरण अहे. परंतु आनंद येवढा होतो कि ते अंतर काहीच वाटत नहि.
![]() |
| गोराक्क्षानाथ मंदिराचा ध्वज |
![]() |
| पाप पुण्याची गुफा , यातून आम्ही गेलो (optional ) |
![]() |
| पाप पुण्य च्या गुफेतून सरपटत बाहेर पडताना विजय पाटील |
![]() | |
| गोरक्षनाथ मंदिरासमोर |
गुरुगोराक्षानाथ पादुकांसमोर मी आणि विजय बसलो आणि "ओम चैतन्य गोराक्षनाथाय नमः " असा जप १०८ वेळा केला.
![]() |
तिथेच पाप पुण्याच्या गुहेतून सरपटत गेलो. व लागलीच गुरुपादुकांकडे प्रयाण केले. हा कठीण मार्ग पटकन पूर्ण झाला. साधारण पाने ९५०० स्टेप्स वर एक रस्ता गुरुपादुका शिकारावर जातो आणि एक रस्ता ५०० स्टेप्स खाली कमंडलू तीर्थावर जातो. जिथे अखंड धुनी असते.
आम्ही साधारणपणे ५ वाजता गुरुशिकारावर पोहोचलो. अजून अंधारच होत. गिरनार पर्वतावरील दत्तापादुकांचे दर्शन घेण्याची बरेच वर्षांची इच्छा आज पूर्ण होणार या विचाराने मन भरून आले होते. साधारणपणे १५ फुट x १५ फुट एवढीच हि जागा आहे.
| Gurushikhar 10000 steps |
| Gurushikhar 10000 steps |
आतमध्ये असलेल्या पादुकांवर डोके टेकले आणि नतमस्तक झालो. डोळे नकळत भरून आले होते. exactly मनात काय चालले आहे ते कळतच नव्हते. totally blank. आम्ही ४2 जन तिथे गेलामुळे बरीच गर्दी झाली होति. पण मला बसून ११ वेळा "दत्त महामाला मंत्राचा" जप करायला मिळाले. प्रसन्न वाटले. मग मात्र आम्ही तिथून निघलो. महाराजांना प्रार्थना केली कि महाराज असेच तुम्ही आम्हा सगळ्यांना सेवेत ठेवा . आणि खाली कमंडलू तीर्थाकडे आम्ही निघलो. म्हणजे ५०० स्टेप्स चढायचे आणि ५०० स्टेप्स उतरयचे. म्हणजे अजून १००० स्तेप्स.
![]() |
| datta paduka at 10000 steps |
तिथे अखंड धुनीचे आम्ही दर्शन घेतले , थोडा प्रसाद घेतला , मी १६ जणांचे donation केले त्याच्या मला १६ प्रसादाच्या पिशव्या मिळाल्या आणि विजयने १२ जणांच्या प्रसादाच्या पिशव्या घेतल्या आणि पुन्हा परतीच्या वाटेवर निघलो. मन आणि पाय परत यायला तयार नव्हते. आम्ही टोटल ११००० स्टेप्स चढून आलो होतो तरी फ्रेश होतो. आत्ता एका हातात काठी आणि एका हातात प्रसादाच्या पिशव्या होत्या. असे आम्ही सगळेजण हळूहळू उतरायला लागलो.
एव्हाना सकाळ होत होती . गिरनार पर्वतावरून सूर्योदय पाहणे म्हणजे एक अचंबित करणारा अनुभव आणि दृश्य होते. बरेच जन आत्ता वरती येत होते आणि आम्ही खाली उतरत होतो.
![]() |
| सूर्योदय |
![]() |
| गोरक्षनाथ कडे जाताना |
![]() | ||
| गुरुशिखर सूर्योदय |
सकाळी ७ वाजता अंबाजी माता मंदिरात आलो. काल रात्री वादळामध्ये आम्ही इथेच तासभर थांबलो होतो. आत्ता मात्र उजेडात मंदिर छान दिसत होते. आमच्यासमोरच पुजाऱ्याने मंदिर उघडले आणि आम्ही देवीच्या आरतीला उभे राहिलो. मग दर्शन घेवून देवीपुढे नतमस्तक होवून निघलो. हळूहळू पायऱ्या उतरत आम्ही गौमुखी गंगा मंदिरापाशी आलो. तिथून शेखरने आम्हाला एका वेगळ्याच वाटेने आनंद गुफेमध्ये घेवून गेला. हि एक अरुंद अशी छोटी गुफा आहे. ध्यानधारणा आणि उपासनेसाठी उत्तम. त्यात आम्ही वाकून सरपटत गेलो. मी तिथे बसून थोडा जप केला. तिथल्या साधूने मन आम्हाला चहा बनवला.
![]() |
| आनंद गुफा |
![]() |
| आनंद गुफेतील साधू |
![]() |
| महाकाली गुफा |
तिथून आम्ही चालत चालत सकाळी ९. ३० ला नेमीनाथ मंदिरापाशी पोहोचलो
![]() |
| नेमीनाथ जैन मंदिर |
तिथून १०. १५ ला भार्तारीनाथ गुहेपाशी पोहोचलो. वर जाणारे अनेक भाविक जण ज्यात पुणे , सातारा , ठाणे असे विविध ग्रुप भेटत होते. आणि अजून किती वरती आहे असे विचारात होते आणि " जय गिरनारी " चा जय घोष करत जात होते. अनेक वृद्ध भाविक अत्यंत भक्तिभावाने ,श्रद्धेने आणि दत्त महाराजांवरील विश्वासाने हळू हळू पायऱ्या चढत होते. त्यांच्या भाक्तीभावापुढे आपण कुठेच नाही याची जाणीव होत होति. सर्वाना भेटून आनंद होत होता. असेच रम्य आठवणी मध्ये आम्ही सकाळी ११. ला गिरनार पर्वत उतरलो.
दुपारी बारा वाजता भव नाथ मंदिरात जावून दर्शन घेतले आणि हळूहळू चालत प्रेरानाधामध्ये आलो. अंघोळ केली आणि प्रसाद भोजन घेतले. अंधारुणावर पडलो. आमच्या खोलीतून गिरनार पर्वत दिसत होता. त्याला नमस्कार केला. आपाल्या पायांच्या पाया पडलो. रात्रभर जागरण आणि एवढे चालून देखील झोप लागली नहि.
मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन चे जिने चढून दामाणारा मी या ११००० पायऱ्या सहजच चढून गेलो त्याचे आश्चर्य वाटते. दत्त महाराजांच्या पादुका आणि सर्वेकाही डोळ्यासमोर अजून उभेच होते…
DO AND DONT (थंडीमध्ये )
१) पहिल्या पायरीवर महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी लंबे हनुमान चे दर्शन आणि आशीर्वाद घ्यवा.
२) चालण्यासाठी चांगली चप्पल घ्यावी (sports sandal उत्तम )आणि त्यावर चालण्याची practice करावी.
३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नहि.
४) पहाटे किव्हा रात्री उशिरा चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नहि. अंदाजे ५ तास लागतात .
५) कपडे सुटसुटीत असावे / tight नसावे.
६) स्वेटर आणि कानटोपी घ्यावी .
७) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते . (३०रुपये रेंट त्यातील २० रुपये परत मिलतात )
८) पाण्याची बाटली घ्यावी , रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते.
९) खिशामध्ये खडीसाखर , गोड गोळ्या (eclair ) घ्यवेत.
१०) कमरेला pouch असेल तर उत्तम
११) start तो end कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे.
१२) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेववि.
१३) रात्री किव्हा अंधारात चलने उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नहि. (शक्यतो ग्रुपमध्ये जावे )
१४) pocket torch बरोबर घ्यावी.
१५) आपल्यापेक्षा बरेच physically unfit लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावि.
१६) हि शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे . त्याने Stamina वाढतो , तसेच सुरुवातीच्या ५००-१००० पायऱ्या चढेपर्यंत त्रास होतो, नंतर मात्र काही विशेष त्रास होत नाही.
१७)उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात.
१८) जमले तर पायाला मालिश करून घ्यावी त्यामुळे थोडा आराम मिळतो
१९) त्रिपुरारी पोर्णिमा (साधारणपणे नोव्हेंबर ) च्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता खोलतो. तेव्हा किमान एकदा तरी हि परिक्रमा करावी . याला खूप पौराणिक महत्व आहे.
दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात थेवावे.
शुभेच्छा
ps : हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत .