Wednesday, September 18, 2013

Shripad Shrivallabh Charitra Parayan and Peethapur on Rakhee Pournima August 2013

 
माझ्या कुरवपुर भेटीच्या blog मध्ये मी माझ्या कुरवपूर च्या अनुभवांवर लिहिले होते. आत्ता पुढे ………… 

कुरवपुर वरून आल्यानन्तर मी ९ feb २०१३ ते १५ feb २०१३ या सप्ताह मध्ये श्रीपद श्रीवल्लभ चरित्राच्या ओवीबद्ध पोथीचे पारायण केले (हरिओम तीर्थ स्वामी लिखीत ).

नंतर पुन्हा एकदा गाणगापूर ला जाण्याचा योग आला . ६ मार्च २०१३ ते ८ मार्च २०१३ या तीन दिवसामध्ये पुन्हा एकदा श्रीपद श्रीवल्लभ चरित्राच्या ओवीबद्ध पोथीचे पारायण केले. दरम्यान श्री उन्मेश पाटील हे पिठापुराम , Andhrapradesh येथे जाऊन आले होते. पिठापुराम हे श्रीपादांचे जन्मस्थान (year १३२०, गणेश चतुर्थी ला त्यांचा जन्म झाला ), त्याचेवर्णन आणि महत्व पोथी मध्ये सविस्तर लिहिले आहे. पाठकगुरुजी हे तर आधीच पिठापुराम ला जाऊन आले होते. पिठापुराम या स्थानाचे महत्व कसे वाढणार आहे हे श्रीपादानी त्यांच्या चरित्रामध्ये त्यावेळी सांगितले आहे. श्रीपाद त्यांच्या ३० वर्षे आयुष्यातील १६ वर्षे पिठापूर आणि १४ वर्षे कुरवपुर इथे होते. यामुळे पिठापुरला जाण्याची उत्सुकता होतीच.( मुंबई हून कोणार्क express ने सामालकोट येथे उतरून मग पिठापुराम ला जाता येते. flight ने जायचे म्हटले तर Vishakhapattanam Airport वरून १३० kms किंवा Rajahmundry Airport वरून ७० kms आहे. airport वरून taxi available असतात. )

मी offcourse flight नेच जाणार हे तर सर्वांनाच माहित होते. फक्त कधी जाणार हा प्रश्न होता.

श्री पाठक गुरुजी गुरुचरित्राचे एको पारायण आमच्याकडून करून घेतात. म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाला आम्ही ७ जण किव्हा ७ च्या पटीमध्ये बसतो आणि ७ जणांमध्ये अध्याय संख्या वाटून दिली जाते. अशाप्रकारे साधारणपणे २ तासामध्ये एका गुरुचरित्राचे पारायण ७ जनाकडून होते. १४ जण २पारायण , २१ जण  असतील तर ३ पारायण होतात. अशी आम्ही असंख्य पारायणे केली आहेत.

आईची इच्छा होती कि आपल्या घरी असे पारायण करावे. साधारणपणे June २०१३ मध्ये श्री उन्मेष पाटील माझ्या घरी आले. तेव्हा बोलताना विषय निघाला होता. तेव्हा श्री उन्मेष म्हणाले कि आपण श्रीपादांचे एको पारायण करू कारण अजून आपण श्रीपादांचे एको पारायण केले नाहि. लगेचच श्री उन्मेषने कालनिर्णय calendar बघून रविवार १८ August २०१३ तारीख ठरवायची का असे आम्हाला विचारले. मग  गुरुजीना फोन करून त्यांची परवानगी घेतली. उन्मेषने सांगितले कि श्रीपादाचा सर्वात प्रिय दिवस म्हणजे राखी पोर्णिमा २० August २०१३  आहे त्याआधी पारायण करणे योग्य राहिल. लगेचच SMS करून लोकाना कळवले चालू केले. २१ जण पारायणासाठी  अशी इछा होती जेणेकरून प्रत्येकी ७ जणामागे १ असे एकूण ३ पारायणे होतिल. म्हणजे  माझ्या वास्तूमध्ये १८ August २०१३ ला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राची ३ पारायणे होतिल.

माझा  मित्र आणि स्वामीभक्त श्री मंदार रानडे  मी फोन करून विचारले कि तू माझ्याकडे पारायणासाठी येशील का ? तेव्हा मंदार म्हणाला कि "अरे मी १८ ऑगस्ट ला कोणार्क express ने पीठापुराम ला राखीपौर्णिमेसाठी चाललो आहे. त्यामुळे मला जमणार नाही. माझी ट्रेन १९ august ला संध्याकाळी पोहोचेल " मी म्हटले कि मग मी १९ ऑगस्ट ला विमानाने निघून संध्याकाळ पर्यंत पिठापुराम ला पोहोचू शकतो. मदर म्हणाला उत्तम आपण १९ ऑगस्ट ला संध्याकाळी पीठापुरामला ला भेटु. ताबडतोब गुरुजी न फोन करून सांगितले कि मी पीठापुरम ला १९ ऑगस्ट ला चाललो आहे. गुरुजीना खूपच आनंद झाला ते म्हणाले कि पारायण झाल्यावर दुसऱ्या दिवशी तुला ताबडतोब महाराजानी बोलावले हा खूप छान  संकेत आहे. श्री  उन्मेष म्हणाले कि पीठापुरामला धर्मशाळेमध्ये राहावे लगेल. राखीपौर्णिमेला खूप गर्दी असते त्यामुळे आधी पीठापुरामदेवस्थान ला  फोन करून खोली बुक कर म्हणजे गैरसोय नाही. पाठकगुरुजी म्हणाले कि पीठापुराम हि एक छोटी जागा आहे त्यामुळे तिथे हॉटेल्स वगैरे एवढे चांगले नहित. त्यामुळे तुझे लाड बाजूला ठेव आणि adjust कर. मी लगेचच मंदारला फोन केला आणि म्हटले कि आपल्या राहण्याची काय सोय आहे ? तो पण पहिल्यांदाच पीठापुरामला त्याच्या श्री पंडित नावाच्या मित्राबरोबर चालला होता म्हणजे तो देखील भगावानभारोसे होता. यात्रेदरम्यान तीर्थक्षेत्री कशी गर्दी असते हे मला चांगलेच ठावूक आहे. आणि मला तर असे अजिबात जमत नहि. Atleast  झोपायला रूम clean पाहिजें आणि bathroom एकदमच clean पाहिजे. एकंदरीत मला कळून चुकले कि आपण पूर्णपणे  भरोस्यावर जात आहोत. गुरुजीना परत फोने केला आणि सांगितले कि महाराजांना सांगा कि माझी व्यवस्था करा नाहीतर गर्दीमध्ये राहण्याची आणि इतर गैरसोय होइल. गुरुजी म्हणाले कि चिंता करू नकोस "महाराज सांभाळतील ". 


anyways back to एको पारायण …… 

१८ ऑगस्ट ला मला देण्यासाठी उन्मेषने पुणे वरून श्रीपादांची ६ इंच ची मूर्ती मागवली व मला दिली. १८ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजता गुरुजींचे माझ्या घरी आगमन झाले. आईने त्यांची पाद्यपूजा आणि आरती केली. पारायणासाठी श्री उन्मेष , श्री फडणीस,श्री योगेश कुलकर्णी , श्री विजय सरदेशपांडे , श्री जितु देशमुख , मी स्वतः , श्री विजय पाटील, श्री मस्तकार ,श्री गौतम कांबळे ,श्री नलावडे, श्री शैलुभाऊ जाधव , श्री तांबे ,श्री विकास भडसावळे ,श्री जोगळेकर , श्री संतोष गोरेकर, सौ फडणीस ,सौ नलिनी सावंत , सौ भूमी सावंत, सौ कृतिका संख्ये , सौ स्वाती विश्वासराव ,सौ साक्षी मुळे असे २१ जण होते. आल्यावर सर्वाना साबुदाणा खिचडी आणि चहा दिला. hall मध्ये सगळे जण बसले आणलेली चाफ्याची फुले श्रीपादांची मूर्ती , आजोबांची मूर्ती आणि शंकर महाराजांची मूर्ती यांना वाहिली. वाचण्यासाठी अध्यायसंख्या सर्वे २१ जणाना वाटून दिली. गुरुजीनि "दिगम्बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " असे नामस्मरण घेतले. त्यानंतर सकाळी १० वाजता आमचे श्रीपाद चरित्र पारायण चालू झाले. जवळपास दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वांचे वाचून झाले. घरातले वातावरण अतिशय मंगलमय होते. नंतर गुरुजी नि पुन्हा "दिगम्बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " आणि "ओम एम र्हिम क्लीं चामुंडाये विच्चे " हा जप करून घेतला.नंतर आईची आरती आणि देशासाठी पसायदान म्हटले. 

सर्वाना भेट वस्तू म्हणून सिन्नरकर महाराज लिखित श्रीपाद चरित्र पोथी , दत्तावधूत यांनी लिहिलेली स्वामी समर्थ सप्तशती आणि संक्षिप्त गुरुचरित्र दिले. तसेच tupperware चे भांडे दिले , दक्षिणा दिली  हे सर्वे आईवडिलांच्या हस्ते दिले. आयोजन करताना काही चूक झाली असल्यास सगळ्यांची माफी मागितली.  

जेवण वाढायाला सगळ्यांनीच मदत केलि. माझी ज्योतीवहिनी ("Mrs. Jyoti Aher) हिने सकाळीच येवून सगळ्यांसाठी पुरणपोळी बनवली होति. बाकी जेवण आचार्याने बनवले त्याला आईने मदत केली. खूपच आनंदमय वातावरण घरी होते. सगळेजण प्रसन्न होवून आमच्या कडून दुपारी  ३-४ वाजेपर्यंत गेले. 

अशाप्रकारे एक मोठा मंगलदायी श्रीपाद श्रीवल्लभ एको पारायणाचा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने आणि पाठक गुरुजींच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने माझ्या घरी संपन्न झाला. 
सगळे गेल्यावर मी आणि विजय पाटील आम्ही दोघांनी घर आवरून घेतले. आत्ता उद्या पीठापुरामला जाणार. 

















१९ August २०१३ सोमवार ,

सकाळी लवकरच उठलो. सकाळी १०-४० चे Indian Airlines चे Mumbai- Raipur- Vishakhapattanam असे Flight  होते.

पिठापुराम ला मंदिरात चाफा न्यावा अशी माझी इछा होति. सकाळीच दादर फुलबाजारात जाऊन ११०० चाफे  आणि 200 गुलाबाची फुले आणले.  ज्यात चाफ्याची कंठी तसेच सुटे चाफे होते. फुलवाल्याने व्यवस्थित packing करून दिले. कारण मी पिठापुराम ला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पोहोचणार होतो. तो पर्यंत चाफे नीट राहायला हवेत.

सकाळी ९ वाजता santacruze airport ला पोहोचलो. तिथे माझ्याबरोबर दादर मठामधील साठ्येगुरुजी आणि अमित नारुकर हे मंदार रानडे चे मित्र होते. गुरुजीना फोन केला आणि आशीर्वाद घेतले. flight typically १ तास उशिरा सुटले. रायपुर येथे ४५ मिनिटे थांबून विमान ३ वाजता विशाखापत्तनाम airport वर उतरले. बाहेर आल्यावर कळले कि तेलंगाना राज्य निर्मितीवरून आन्ध्रप्रदेश बंद आहे. म्हणजे government buses ,rickshaw , taxi total बंद , फक्त private गाड्या चालू आहेत. 



मग आम्ही ४००० रु देवून A C Indica बुक केली , त्याने जास्त पैसे घेतले पण आम्हालापण choice नव्हता. कारण आम्हाला लवकरात लवकर मंदिरामध्ये पोहोचायचे होते. विशाखापात्तानाम ते पिठापुराम अंदाजे १२०-१३० किलोमीटर अंतर होते. चाफा पण द्यायचा होता. रास्ता रिकामाच होत. गाड्यांची तुरळक गर्दी होति. काही ठिकाणी tyre जाळून टाकले होते. बंद्समर्थक कार्यकर्ते रोडवर दिसत होते. आमची गाडी कोणी अडविली नाहि. 

असेच गप्पा मारत मारत अंदाजे ६ वाजता पिठापुराम ला श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान ला पोहोचलो. पोहोचल्यावर पहिले तर तिथे तुफान गर्दी होति. धर्मशाळा फुल होति. तसेच तिकडच्या लोकांनी सांगितले कि गावात lodges full आहेत. खूपच insecurity वाटलि कि राहायचे कुठे आणि आत्ता करणार काय ? मंदार ची ट्रेन पोहोचायला अजून १ तास होता. आम्ही सामान कारमध्येच ठेवले आणि चाफा घेवून मंदिरात गेलो. तेथील पुजारयाना आणलेली चाफ्याची कंठी , चाफ्याची फुले आणि गुलाब दिले. पुजारी खुपच आनंदले त्यांनी सांगितले कि एवढा चाफा आणि गुलाब आणलात हे खूपच छान झाले. 



तेवढ्यात तिथे साठेगुरुजीना ओळखणारा माणूस भेटला तो म्हणाल कि धर्मशाळेच्या passage मध्ये लोक झोपत आहेत. तुम्ही माझ्या lodgeच्या खोलीत सामान ठेवा आणि मग गावात कुठे रूम मिळतो का ते बघा. मग आम्ही त्याच्याबरोबर पंचवटी lodge मध्ये गेलो. तिथल्या manager ला सांगितले कि आम्हाला काहीही करून रूम मिळेल का ? तो म्हणाला किती जन आहात तुम्ही ? मी म्हटले आत्ता ३ आहोत आणि बाकी २ ट्रेन ने येत आहेत. त्यावार तो म्हणाला कि आत्ताच २ रूम रिकामे झाले आहेत. १ ac  आणि १ non ac रूम आहेत. प्रत्येक रूम मध्ये ३ बेड अहेत. लगेचच दोनीही रूम मी घेतले. रूम ठीकठाक होते. महत्वाचे म्हणजे बाथरूम clean होते.

आम्ही मनोमन महाराजांचे आभार मानले. तो पर्यंत मंदार ट्रेन ने पोहोचला. आम्ही कपडे बदलले , सोवळे घालून मंदिरामध्ये गेलो. मंदिरात तुफ्फान गर्दी होति. पण मी आणलेले चाफे आणि गुलाबाची फुले महाराजांना मंदिरात आणि पालखीला वाहिले होते. पालखीमध्ये तर पूर्णपणे चाफा होता हे पाहून मला खूपच आनंद झाला. मंदार  रानडे ला पालखी बरोबर चालायची संधी मिळाली, आम्ही बाकी जन मात्र बाहेर लांब होतो. त्यानंतर सात्विक महाप्रसाद घेतल. श्र. पंडित हे देवास्थानामाध्येच रहिले. ते नेहेमी पिठापुराम ला येतात तसेच मुंबई मध्ये श्रीपाद चरित्र वाटतात. त्यामुळे त्यांची देवस्थानमध्ये चांगलीच ओळख होती. रात्री ११-३० ला आम्ही lodge वर झोपायला गेलो. सकाळी ५ वाजता मंदिरामध्ये यायचे असे ठरले. कारण श्रीपादा पादुकांचे दर्शन सकाळी ५ वाजता होते.  नंतर त्यावर  मुखवटा आणि फुले चढवली जातात.  सकाळी मंदिरात बसून  २ दिवसांचे श्रीपाद चरित्राचे पारायण करायचे असे ठरले. उद्या २० जुलै २०१३ ला राखी पौर्णिमा म्हणजे अजून जास्त गर्दि…… 







२० जुलै २०१३ राखी पोर्णिमा …………………… 

ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी ४ वाजताच उठलो आणि सोवळे घालून सकाळी ४-४५ ला मंदिरामध्ये पोहोचलो. ५ वाजता गाभारा दर्शनासाठी open झाला आणि आम्हाला श्रीपाद पादुकांचे दर्शन झाले. आम्ही श्रीपादांचे चरित्र आणले होते. मंदिरातच बसायला जागा मिळाली. त्यामुळे आज आणि उद्या पारायण करू असे ठरवून आम्ही बसलो. महाराजाना नमस्कार करून पारायण चालू केले. ५-३० वाजेपर्यंत मदिर खचाखच भरले. आज राखी पौर्णिमा असल्यामुळे तुफ्फान गर्दी होति. राखीपौर्णिमेला पिठापुराम ला आणि ते पण महाराजांच्या स्थानावर पारायण करणे हा एक विशेष योग होताच. मंदिरात गर्दी एवढी झाली कि आम्हाला उठायला किवा हलायला सुद्धा जागा नव्हति. त्यामुळे पारायण करणे हा एकाच option होता. आम्ही पारायण करत होतो. मन प्रसन्न होते. 

सकाळी ९ वाजता निठूरकर महाराजांच्या उपस्थितीत पादुकांवर
अभिषेक चालू झाला. हा अभिषेक बघणे अत्यंत आनंददायक असते. ज्यांनी अभिषेकासाठी नावेनोंदावली आहेत त्यांचा उल्लेख होतो. त्यामुळे आम्ही पारायण थांबवले आणि जागेवरच बसून राहिलो. संपूर्ण अभीषेक पाहिला. त्यानंतर ११. ३० ला रामास्वामी. त्यांनी महाराजांची आरती केली. मग लोक माहाप्रसादासाठी उठू लागले आणि आम्ही परत पारायण सुरु केले ते दुपारी २. २५ पर्यंत वाचन चालूच होते. continue  बसल्यामुळे पाय खूपच जाम झाले होते. तसेच महाप्रसाद घेण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी आम्ही उथलो. आणि सर्वेकाही आटोपून २-४० ला पुन्हा पारायणाला बसलो. meanwhile  मंदार रानडे ने मंदिरात वाटण्यासाठी राजगिर्याचे लाडू आणले होते त्याचे वाटप सेवेकरी करत होते. असो दुपारी ३. ४० पर्यंत माझे आणि मंदारचे पारायण झाले. दोन दिवसामध्ये जे करणार होतो ते आजच complete झाले. पायांनी बरीच साथ दिली जास्त दुखले नाहीत. उठून उभे राहिलो तोवर मंदार ने फर्मान काढले कि आपण मंदिराला १०८ प्रदक्षिणा घालायच्या. मंदार म्हणजे कट्टर स्वामी भक्त अहे. तो म्हटल्यावर आम्ही हळूहळू १०८ प्रदक्षिणा केल्या . त्याच्या म्हणण्या प्रमाणे राखी पौर्णिमेला जेवढी जमेल तेवढी जास्तीतजास्त सेवा करुया. . आत्ता मात्र मी म्हटले कि lodge वर जाऊन सोवळे काढून shirt pant घालून येतो आणि जरा आराम करतो. मंदार म्हणाला ३० minute  चा break  घेवु. लगेचच कपडे बदलून पुन्हा आपल्याला स्थानिक मंदिरे बघायसाठी जायचे आहे. आज सर्वेकाही complete  करून उद्या निघायचे.मग आम्ही ३० मि. मध्ये परत जमलो. एवढे hectic schedule असूनदेखील विशेष थकवा आला नव्हता. 



बापानार्यालू यांचे घर (श्रीपद यांचे आजोबा ) , श्री कुक्कुतेश्वर शिव मंदिर (येथे श्रीपाद यायचे ), त्याच आवारातील पुरुहत्तिका देवीचे मंदिर (हे शक्तीपीठ आहे ), १६० वर्षे वयाचे श्री गोपाल बाबा यांचे दर्शन घेतले , दत्त अनाघालाक्ष्मी मंदिर आणि कुन्तिमाधव मंदिर हे सर्वेकाही रिक्षा ने फिरलो. 

मला अनेकांनी पैसे दान करण्यासाठी दिले होते . त्याची reciept घेतली. तसेच तिथे श्रीपादांची एक सुबक अशी ५इंच ची मूर्ती होति. पाठक गुरुजी , वंदनीय dr. . सुनील काळे , माझे मित्र पंकज भाऊ आणि तुषार चौबळ यांना देण्यासाठी मूर्ती घेतलि. रात्री ८ वाजता पुन्हा पालखी आणि आरती झाली आत्ता उद्या सकाळी मुंबई ला जायला निघायचे असे ठरले. मंदार , साठेगुरुजी आणि अमित नारुकर अक्कलकोट ला जाऊन मग येतील असे ठरले.  मी सकाळी निघाण्यासाठी कार बुक केलि. आणि रात्री १२ वाजता आम्ही lodge वर झोपायला गेलो.

पीठापुरामचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे ऐश्वर्य आणि सुबत्ता जनवते. अजून एवढे प्रसिद्धीस नसल्यामुळे अजून एवढा व्यवहारीकपणा आलेला नाही. या रम्य आठवणीत झोप कधी लागली ते कळलेच नाहि. एवढ्या गर्दीत देखील सर्वेकाही एकाच दिवसामध्ये पूर्ण झाले हे विशेष. 

२१ जुलै २०१३………………………

 सकाळी ७-३० ला गाडी बोलावली होती आणि विशाखापात्तानाम airport वरून दुपारी २-४० चे मुंबई विमान होते. 


पुन्हा सकाळी ४ वाजता उथलो. ४-४५ ला मंदिरामध्ये गेलो गर्दी होतीच . ५ वाजता पादुकांचे दर्शन घेतले. अत्यंत समाधान वाटले. महाराजांचे आभार मानले , बाहेर असलेल्या औदुंबराच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घातल्या. मग बाजूलाच असलेल्या श्रीपादांच्या मूर्ती ला १०८ प्रदक्षिणा घातल्या. महाराजांना नमस्कार केला आणि पिथपुरम हून गाडी ने सकाळी ८ वाजता प्रयाण केले.  रस्त्यावर शासकीय बसेस , taxi पूर्णपणे बंद होति. खाजगी गाड्या मात्र चालू होत्या. कुठेतरी रस्त्यावर tyre जाळून टाकले होते. एकंदरीत तेलंगाना बंद चा प्रभाव जाणवत होता. 

लवकर जाऊन विशाखापात्तानाम airport पासून जवळ असलेले "सिंम्हाचलम " हे श्री नृसिंहाचे मदिर बघायचे ठरवले होते . "सिंम्हाचलम " हे मंदिर विशाखापात्तानाम airport पासून २५-३० kms वर आहे . (असे म्हणतात कि हिरण्याकश्यपूने प्रल्हादाला याच ठिकाणी दरीमध्ये टाकले होते  त्यावेळी विष्णूने इथेच प्रल्हादाला झेलले होते). मंदिरामध्ये पोहोचलो आणि sms आला कि flight  २.४० ला न जाता उशिरा म्हणजे संध्याकाळी ७ वाजता सुटेल. आत्ता मनात म्हटले कि एवढा वेळ काय करायचे ?

सकाळी ११ वाजता "सिंम्हाचलम " ला पोहोचलो. गर्दी नव्हति. १०० रु चे ticket  काढून vip दर्शन घेतले. मग अजून १०० रु चे ticket  काढून गाभार्यापर्यंत गेलो. आत गेलो आणि पुजाऱ्या ने  गाभारा बंद केला आम्ही ४-५ जन आतमध्येच होतो. मग आरती केलि. त्यामुळे गाभार्यात उभे राहून हि आरती बघण्याचा दुर्मिळ योग मला मिळाल. सकाळी ११. ३० ला मंदिरामधून बाहेर पडलो आणि विशाखापात्तानाम मध्ये हॉटेल मध्ये दही भात खाल्ला. घरी आईला फोन करून सांगितले कि flight late आहे आणि घरी येण्यासाठी रात्रीचे अंदाजे १० वाजतील असे वाटते.

इथे तिथे timepass करण्यापेक्षा airport ला थांबणे safe राहील असा विचार करून दुपारी १२.३० ला airport ला आलो. संध्याकाळी ७ ची flight म्हणजे अजून ६-७ तास थांबायचे होते. खूप वैतागलो पण काय करणार ? airport बाहेरच्या बोर्ड वर दिसत होते कि Indian Airlines flight rescheduled to 7 pm from 2.30 p.m 

Security ला ticket दाखवून आत शिरलो तेव्हा तो मला म्हणाला कि "जल्दी जावो तुम्हारा Bombay का Flight जा राहा है ". मी म्हटले कि हा माणूस वेडाच दिसतोय माझी मस्करी करतोय. आत गेलो तर Indian Airlines चे counter बंद होते तरी एका Staff ला भेटलो त्याला म्हटले कि शाम को ७ बजे flight  जानेवाला है  क्या ? तो म्हणाला "Sir , if you want to go to Bombay then a flight is leaving immediately , you go in that. As sincethe ounter is closed I will giveyou  handwritten boarding pass." मी म्हटले "But nothing is shown on your indicator" तो म्हणाला "A flight was halted at Raipur dueto technical snag now its repaired and it has just come to vishakhapattanam airport  from Raipur and now will go to Bombay" मला काहीच काळात नव्हते कि काय चालले आहे. त्याने मला हातानेच लिहून बोर्डिंग कार्ड दिले आणि security check करून मी १२. ५० ला विमानात बसलो. मला वाटले मी ऐवढी धावपळ करून मी S T पकडली. विमानात मोजकेच १०-१५ passengers होते. Seat number दिले नव्हते त्यामुळे कोणीही कुठेही बसले होते. दुपारी १ वाजता विमानाने takeoff केले आणि २-३० ला मुंबई मध्ये उतरलो. चमत्कारासारखे झाले. उतरल्यावर गुरुजीना फोने केला आणि सांगितले कि मी मुंबईमध्ये आलोय. ते म्हणाले अरे तू १२ वाजता विशाखापात्तानाम ला होतास मग इतक्यात कसा काय आलास ? मग त्यांना सगळे सांगितले . ते म्हणाले हे फक्त दत्तमहाराजच करू शकतात. त्यांनी तुला बोलावले आणि मुंबई ला परत आणले.

दुपारी ३. ३० ला घरी आलो तर आई ला surprise झाले.

एकंदरीत माझा हा powerpack दौरा १९ जुलै २०१३ ते २१ जुलै २०१३ मध्ये सम्पन्न झाला. यात महाराजांसाठी मुंबईहून ११०० चाफे घेवून गेलो. महाराजांनी राखी पौर्णिमेला मंदिरामध्ये बसून माझ्याकडून श्रीपाद चरित्राचे पारायण करून घेतले. १०८ प्रदक्षिणा करून घेतल्या. तसेच राहण्याची उत्तम सोय केलि. पिथापुराम मधील सर्वे मंदिरांना भेट देवून झलि. एवढी सेवा करून मला जवळपास special विमानाने मुंबई ला पाठवले. अर्थात हे सर्वेकाही पाठक गुरुजींच्या पुण्यायीमुळे शक्य झाले. तसेच श्री . मन्दार् रानाडे , श्री . पंडित , श्री . साठेगुरुजी, श्री . अमित नारुकर यांच्या साथीमुळे शक्य झाले.

यासाठी वंदनीय Dr. सुनील काळे - पुणे , श्री . प्रकाश प्रसादे -पुणे , श्री .हरिभाऊ क्षीरसागर -पुणे , पुष्पाताई सामंत - मुंबई यांचे आशीर्वाद लIभले.