पाठकगुरुजी - काही गंमतीशीर आठवणी
पाठक गुरुजी विषयी प्रचंड आदर बाळगून त्यांच्यासोबत झालेल्या काही आठवणी येथे उल्लेखित करतो. "जगन्मित्र" या त्यांच्यावरील पुस्तकात काही आठवणी आल्या आहेत, पण सगळ्यांनीच ते पुस्तक वाचले असेल असे नाही. या त्या त्या वेळी झालेल्या घटना/ संवाद असून, त्यातून कोणाचा अपमान करण्याचा/ होण्याचा किंवा माझ्या उध्दटपणाचा हेतू नाही.
गुरुजींचा जन्म नवसाने झाला. लहानपणी ते राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या सान्निध्यात वाढले. महाराज त्यावेळी खूपच प्रसिद्ध संत होते. पाचलेगावकर महाराज याना सर्प सिद्धी होती.
त्यांच्याकडे अनेक प्रकारचे विषारी/ बिन विषारी सर्प होते. आणि विशेष म्हणजे ते सर्प महाराजांच्या आज्ञेत असायचे. गुरुजींना लहानपणी "बटु" या टोपण नावाने बोलावत असत. आणि निश्चितच गुरुजी लहानपणी खूपच मस्तीखोर होते. "वासुकी" नावाचा एक विषारी साप महाराजांकडे नवीनच दिला होता व अजून तो महाराजांना वश नव्हता , म्हणून त्याला एका टोपलीत ठेवले होते. आणि पाचलेगावकर महाराजांनी स्पष्ट ताकीद दिली होती की वासुकी ला कोणीही स्पर्श करू नये. हात लावायचा नाही, असे म्हटल्यावर गुरुजींची उत्सुकता वाढली. महाराज असताना भीती कसली आणि मला काय होणार? असा विचार करून बटुने वासुकी असलेल्या टोपलीत हात घालून त्याला काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वासुकीने naturally गुरुजींना दंश केला. विष चढायला लागल्यावर बटुच्या अंगाची आग आग व्हायला लागली त्यामुळे गुरुजी तडफडू लागले. मग सगळे जण घाबरले. सर्वानी पाचलेगावकर महाराजांकडे धाव घेतली व त्यांना घडलेला प्रकार सांगितला. महाराजही भडकले , मी नाही म्हटलो होतो मग बटु ने का हुशारी केली? आत्ता त्याला थोडा वेळ तडफडू दे. मग थोड्या वेळाने महाराजांनी ते विष उतरवले.
त्यावेळी महाराजांकडे खूप साप असायचे आणि त्याची सर्वानाच सवय होती त्यामुळे कदाचित गुरुजींनी न घाबरता ते धाडस केले असावे. शिवाय गुरुजी हे महाराजांचे लाडके होते हे निश्चितच. देशाच्या प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी या एकदा पाचलेगावकर महाराजांना भेटायला आल्या होत्या त्यावेळी महाराजांनी त्यांच्याही हातात सर्प दिला होता व गुरुजी त्यावेळी तिथे हजर होते. हि गोष्ट मला गुरुजींनीच सांगितली आहे.
काही जण गुरुजींकडून उपासना घेत, पण ती करत नसत. गुरुजींनी विचारले असता, मग शाळेतल्या मुलांसारखे कारण सांगत. Busy असतो, कामावरून उशिरा घरी येतो, वेळ मिळत नाही, घर छोटे आहे वगैरे. मग गुरुजी वैतागत आणि म्हणत वेळ नसताना आणि छोटे घर असताना पण मुले झालीच ना? त्याला कसा वेळ मिळाला? मग सांगितलेली उपासना का नाही करत? सर्व जण निरुत्तर व्हायचे.
एकदा माझ्या स्वप्नात गुरुजी ४-५ वेळा सलग आले. मग मी त्यांना भेटायला माहीम मुक्तिधामच्या घरी गेलो. म्हणालो अहो, माझ्यासारख्या तरुणाच्या स्वप्नात तुम्ही यायला पाहिजे का कोणीतरी सुंदर मुलगी यायला पाहिजे? तुम्ही मला स्वप्नात येऊन कशाला त्रास देता? आपण रोज सकाळी १० वाजता बोलतो , अनेकदा भेटतो ना? मग ते खूप हसले, आम्ही दोघेही हसलो. विशेष म्हणजे नंतर ते कधी विशेष माझ्या स्वप्नात आले नाही. बहुधा मी केलेली गम्मत त्यांनी खूप गंभीरपणे घेतली असावी.
एकदा काय झाले, त्यांचा एक जुहूचा भक्त होता, खूप श्रीमंत. तो त्यांना प्लाझा, दादर येथे हिंदी चित्रपट बघायला घेऊन गेला. का ते कारण माहित नाही. चित्रपटाचे नाव "सत्या". आम्हाला कळल्यावर आम्ही हैराण झालो की "सत्या" हा मारधाड असलेला चित्रपट बघायला गुरुजी का गेले? म्हणजे नेणाऱ्याची पण कमालच आहे. दुसऱ्या दिवशी भेटलो आणि त्याना विचारले, चित्रपट कसा वाटला? ते बोलले की मला काही कळले नाही. छान एअर कंडिशन चालू झाला आणि मी गाढ झोपून गेलो.
धुळे येथे नोकरीत असताना कोणीतरी त्यांना गम्मत म्हणून बिअरची बाटली दिली आणि ह्याने सर्दी जाते असे सांगितले. ते तीन चार दिवस सकाळ संध्याकाळ एक बूच भर बिअर औषधासारखे प्यायचे. नंतर खूपच वास येऊ लागला म्हणून त्यांनी ती बाटली फेकली.
गुरुजींनी स्थापित केलेल्या जय गुरुदेव आश्रम ट्रस्ट , गाणगापूर मध्ये त्यांनी माझी आधी विश्वस्त आणि मग विश्वस्त -खजिनदार पदावर नेमणूक केली. मी त्यांना गमतीने म्हणालो कि बघा, अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रस्ट चा कारभार केलात, आत्ता मात्र मी त्याची चौकशी करणार आणि काही गडबड आढळली तर शोधून काढणार. खरे म्हणजे गुरुजींचा कारभार अत्यंत स्वच्छ, त्यामुळे असा काही विषय नव्हता , पण मी गम्मत केली. त्यांनी लगेचच उत्तर दिले कि बघ, आश्रमाची इमारत बांधून झाली, ट्रस्ट च्या नावाने पुरेश्या फिक्स डिपॉजिट बँकमध्ये आहेत, त्या व्याजावर आश्रमाचा सर्व खर्च निघेल, सर्व कामकाज चालेल अशी व्यवस्था मी करून ठेवलीय. तुम्हाला नवीन काही करायचे नाही. तुम्हाला फक्त आश्रम मेंटेन करायचा आहे. पैशाची चिंता आपल्याला नाही. तुम्हाला कारभार सोपवून मी जाईन. आगे तुम आश्रम सम्भालो और दत्त महाराज सम्भालेंगे.
त्यांच्या सर्व अपत्यांची लग्न झाल्यावर सर्वानी आपआपला संसार थाटला. मग माहीमला फक्त गुरुजी आणि त्यांच्या पत्नी माई असायच्या. दोघांचा संसार आणि संवाद उत्तम. अगदी made for each इतर. कधीतरी गुरुजी माईला डिवचयाचे असेल तर मला डोळा मारायचे, आणि म्हणायचे आता बघ. मग काहीतरी कारण काढून ते माईची खोड काढायचे आणि थोडासा वाद झाला कि बोलायचे कि सखाराम पंतांनी (माईच्या वडिलांचे नाव सखाराम दीक्षित होते) हे काय माझ्या गळ्यात बांधले. मग माई खूप भडकायची आणि aggressive व्हायची. व बोलायची, माझ्या वडिलांना काहीच बोलायचे नाही. मग मात्र गुरुजी बॅकफूट वर जायचे आणि compromise करायचे. मी त्यांना म्हणायचो की, का हो तुम्ही उगाच खोड्या काढता. ते म्हणायचे, बघ आम्ही दोघे इथे एकटेच असतो . दुपारी काय टाइम पास म्हणून तिला थोडे भडकावतो. त्यात आमचा अर्धा तास जातो. मग पुन्हा शांत झाल्यावर नेहमीच रुटीन चालू. गुरुजी कधीच TV बघत नसत.
गुरुजी दर गुरुवारी सकाळी १० नंतर माटुंगा येथील पणशीकर मध्ये पेढे आणायला जायचे आणि संध्याकाळी येणाऱ्या लोकांना वाटायचे. मग तिथून काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचे आणि भाजी वगैरे काही किरकोळ खरेदी करून परत यायचे. मला ती वेळ नक्की माहित असायची. ते बाजारात गेले कि मी सकाळी ११ वाजता माईला फोन करायचो आणि विचारायचो, गुरुजी आहेत का? ती म्हणायची कि अरे ते आत्ताच बाहेर गेलेत. मग मी म्हणायचो, हो मी त्याना आत्ताच माटुंग्याला गजरा खरेदी करताना पाहिले, बहुधा तुमच्यासाठीच घेतले असतील. गुरुजी परत आल्यावर माई त्यांना विचारायची, अहो गजरा कुठे आहे. ते म्हणायचे, मी कुठे गजरा घेतला आणि तुला कोण बोलले. मग माझे नाव सांगितल्यावर ते मला फोन करायचे आणि खोटे खोटे ओरडायचे, अरे का माझ्या म्हातारीला छळतोस. आत्ता तिला सांग खरे काय ते आणि मला फोन द्यायचे. मी माईला परत सांगायचो, बघा जे मी पहिले ते मी तुम्हाला सांगितले. नंतर तुम्ही बोलू नका की मुलांनी तुम्हाला सावध केले नाही म्हणून. मग गुरुजी म्हणायचे की काशीसाठी गजरा घेतला (काशी विश्वेश्वरासाठी ). अश्या अनेक गमती व्हायच्या.
बैल पोळा हा सण गुरुजी आणि माई घरी साजरा करायचे. झाले असे की एकदा माईनी आम्हाला विचारले कि उदया बैल पोळा आहे. जर तुम्ही उदया आलात तर तुमची मी बैल समजून पूजा करिन आणि मग तुम्हाला जेवायला देईन. त्यातला "जेवायला देईन" हा अतिशय महत्वाचा catchword आम्ही ऐकला आणि माईच्या हाताचे जेवण खायची संधी कोण सोडणार असा विचार करत दुसऱ्या दिवशी आम्ही (म्हणजे मी , पंकजभाऊ, संजय, सुभाष) आम्ही माहीम मुक्तिधामच्या घरी संध्याकाळी पोहोचलो. अंदाजे ७.३० ला आमच्या चौघांचे माईने खरचं औक्षण केले. आमच्या कपाळावर गंध लावला आणि खरेच बैलाची पूजा करून मान सन्मान देतात त्याप्रकारे आमचा मान सन्मान झाला. नंतर पोटभर जेवलो. खूप मज्जा आली. हा बैल पोळा नंतर आमचा वार्षिक कार्यक्रम ठरलेलाच असायचा. माई पुढच्या प्रवासाला जाई पर्यंत हा बैल पोळा आम्ही दरवर्षी साजरा करायचो. मला माहित नाही की इतर ठिकाणीपण असाच बैलपोळा साजरा करतात का पण हि एक ठळक गमतीशीर आठवण आयुष्यभर पुरेल. आणि हो कोणत्याही बैलांपेक्षा आम्ही नक्कीच देखणे होतो.
गुरुजींना काही भक्त मंडळींनी अमेरिकेला बोलावले. तिथे त्यांनी अनेकांच्या घरी पूजा सांगितल्या आणि मिळालेली सर्व दक्षिणा त्यांनी आश्रमाच्या ट्रस्ट ला दिली आणि त्याने गाणगापूर आश्रमाच्या बांधकामाला खूप गती आली हे मात्र खरे. गुरुजी जवळपास दोन तीन महिने अमेरिकेला होते.
![]() |
अमेरिकेत पूजा सांगताना
गुरुजी
|
एरवी पण ती आम्हाला खूप खायला दयायची , लाड करायची. ती गुरुजी परत आल्यावर तिने गुरुजींना हा प्रकार सांगितला. गुरुजींनी आम्हाला सगळ्यांना बोलावले आणि माईला सांगितले, मी कोणाच्याच स्वप्नात गेलो नव्हतो. पोरांनी तुला फसविले. काय रे पोरांनो... मग माई त्यांनाच ओरडली आहो, ती माझी मुले आहेत तुम्ही त्यांना काही बोलू नका.
त्याच दरम्यान गुरुजी ज्या दिवशी अमेरिकेतून येणार होते त्या रात्री आम्ही माईना घेऊन विमानतळावर गेलो. कोणाच्यातरी ओळखीने आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो होतो. तसेच श्री. कोकणे, गुरुजींचे भक्त, तेव्हा एअरपोर्ट मॅनेजर होते त्यामुळे ते सोबत होते. मी माईना म्हटले कि मला असे कळले आहे की गुरुजीनी अमेरिकेत दुसरे लग्न केले आणि ते आत्ता त्या बाईना सोबत घेऊन येत आहेत. ती बोलली मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही मला काही सांगू नका. आम्ही म्हटले, आमचाही गुरुजींवर पूर्ण विश्वास आहे पण त्या गोऱ्या बायकांवर नाही. जो पर्यंत गुरुजींना तिने एकटे येताना बघितले नाही, तो पर्यंत ती खूप टेन्शन मध्ये होती. नंतर घरी आल्यावर आम्ही गुरुजींना सांगितले तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. गुरुजी बोलले, तुम्ही माझ्या म्हातारीला खूप गुंडाळून ठेवले आहे.
![]() |
| पाठकगुरुजी आणि माई |
गुरुजींचे लग्न त्यांच्याच गावातील आणि त्यांच्या घराजवळ ५ मिनिटावर राहणाऱ्या प्रतिभा दीक्षित (आता प्रतिभा पाठक / माई ) यांच्याशी झाले. त्यावेळी दीक्षित हे सरकारी नोकरीत होते व त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. पाठक कुटुंब मात्र गरिबीत होते. दीक्षितांकडे नोकर चाकर, गाई वगैरे खूप काही होते. लग्न व्हायच्या आधीपर्यंत माई फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खायच्या. लग्नाआधी चहा तर कधीच घेतला नव्हता. लग्न झाल्यावर मात्र त्यांच्याकडे फक्त दोन साड्या आणि त्यापण आलटून पालटून घालायच्या आणि पैशाची कमतरता अश्या वाईट परिस्थितीत त्यांनी संसार सुरु केला. मग एवढ्या श्रीमंत घराच्या मुलीने एका गरीब मुलाशी का लग्न केले असावे हा प्रश्न मी दोघांनाही वेगवेगळा आणि एकत्र विचारला. कारण दोघांमधील synergy आणि प्रेम बघून दोघेही destined to be married होते हे मात्र निश्चित. झाले असे की गुरुजींचे वडील आणि माईचे वडील हे एकाच गुरूंचे शिष्य (निजामपूरचे नित्यानंद सरस्वती महाराज). त्या गुरूंनीच सांगितले, या दोघांचे लग्न लावा. माई खूप श्रीमंत घरच्या होत्या, त्यामुळे गुरुजींनी ३ वेळा माई ना नकार दिला. पण त्यांच्या वडिलांनी खूपच हट्ट धरला मग गुरुजींनी माईना स्वतःची आर्थिक परिस्थिती सांगितली आणि मगच त्यांनी लग्न केले.
पण तरी पण " कुछ तो गडबड है ". मला वाटते कि हा प्रेम विवाहचं असावा. पण आत्ता आणि तेव्हाही मला काही पुरावा सापडला नाही.
गुरुजींना भेटायला येणारी माणसे रात्री उशिरापर्यंत चालू असायची त्यामुळे आम्हाला बोलायला privacy मिळायची नाही. मग आम्ही रात्री पंकजभाऊच्या गाडीने बांद्रा , बॅण्डस्टॅण्डला समुद्र किनारी जायचो आणि juice प्यायचो, समुद्रकिनारे फिरायचो. रात्री उशिरा शांततेत समुद्राचा आवाज, आमच्या गप्पा आणि समुद्र किनारी walk हे खूपच आनंदि वातावरण असायचे.
त्याचे असे झाले कि आम्ही गुरुजींना म्हटले कि आज रात्री आम्ही १०. ३० ला तुमच्याकडे येतो मग आपण बॅण्डस्टॅण्ड ला जाऊया, तिथे चालूया, juice पिऊ आणि मग आम्ही तुम्हाला १२ वाजेपर्यंत पुन्हा घरी सोडतो. त्यावेळी पंकजभाऊ कडे land-cruiser गाडी होती. ठरल्या वेळेला आम्ही चौघे मित्र त्यांना घ्यायला पोहोचलो. बघतो तर काय, गुरुजी शर्ट-पॅन्ट घालून तय्यार होते. एरवी ते कायम धोतर आणि सदरा घालायचे. आम्हाला आश्चर्य वाटले. ते म्हणाले अरे वा तुमच्या तरुण पोरांबरोबर रात्री आणि ते पण बॅण्डस्टॅण्डला मी म्हातारा वाटू नये म्हणून असे कपडे घातले. आम्ही सगळेच खूप हसलो. अनेकदा असे आम्ही रात्री गेलोय. खूप मज्जा यायची. गोल्डन दिवस होते ते.
मला तर ते "Tallest are the foolest and you are not exeption to that" असे ते नेहमी म्हणायचे. हा त्यांचा माझ्या बाबतीत आवडता जोक/ dialogue होता. तसे त्यांच्याकडे काही मागितले आणि त्यांनी दिले नाही असे कधीच झाले नाही , पण देताना ते म्हणायचे कि "तुमच्या पोरांच्या बापाचे आम्ही देणे लागतो त्यामुळे तुमचा हट्ट पुरवणे मला भागच आहे."
आयुष्याच्या शेवटी मात्र ते आयकॉन या डोंबिवली मधील हॉस्पिटलच्या ICU मध्ये २/३ वेळा ऍडमिट झाले. खरे म्हणजे गुरुजींना आजारी बघायची आम्हाला सवयच नव्हती. त्यामुळे exactly काय चाललेय काय कळायचेच नाही. तेव्हा माहित नव्हते की ते त्यांचा इथला प्रवास आत्ता संपवत आहेत. शिवाय गुरुजी कधीतरी आपल्यातून जातील असे आम्हाला कधीच वाटायचे नाही आणि असा विचारपण यायचा नाही. मी त्यांना गमतीने म्हणायचो, काय हो तुम्ही सारखे सारखे इथे ऍडमिट होताय? काय भानगड आहे. तुम्हाला इथली कोणी नर्स आवडली आहे का? तर सांगा मला. ते खूप हसायचे,म्हणायचे, अरे तरुणपणात चुकलो नाही आत्ता काय करणार? यात काही अपमान किंवा उद्धटपणा नसायचा. आमचे रिलेशन उत्तम असल्यामुळे असे बोलायला काही वावगे नव्हते आणि दोन मित्रांमध्ये थट्टा मस्करी चालतेच.
गुरुजींना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही म्हणता कि दत्त महाराज वाचवतील/ सांभाळतील. अहो पण ते वेळेवर येतील ना ? उशीर झाला तर काय फायदा ? ते खूप हसायचे आणि म्हणायचे, जो विश्वाचा संसार चालवतो तो वेळ कसा चुकवेल. कधीतरी ते कोणाला तरी सांगायचे अरे वर्षाला एक तरी श्री गुरुचरित्र पारायण करून महाराजांवर मेहेरबानी करा.
आठवणी असंख्य आहेत , त्यातल्या थोड्या आज लिहिलेल्या . बाकीच्या नंतर कधीतरी सांगतो.
विशाल फुलपगार
आयुष्याच्या शेवटी मात्र ते आयकॉन या डोंबिवली मधील हॉस्पिटलच्या ICU मध्ये २/३ वेळा ऍडमिट झाले. खरे म्हणजे गुरुजींना आजारी बघायची आम्हाला सवयच नव्हती. त्यामुळे exactly काय चाललेय काय कळायचेच नाही. तेव्हा माहित नव्हते की ते त्यांचा इथला प्रवास आत्ता संपवत आहेत. शिवाय गुरुजी कधीतरी आपल्यातून जातील असे आम्हाला कधीच वाटायचे नाही आणि असा विचारपण यायचा नाही. मी त्यांना गमतीने म्हणायचो, काय हो तुम्ही सारखे सारखे इथे ऍडमिट होताय? काय भानगड आहे. तुम्हाला इथली कोणी नर्स आवडली आहे का? तर सांगा मला. ते खूप हसायचे,म्हणायचे, अरे तरुणपणात चुकलो नाही आत्ता काय करणार? यात काही अपमान किंवा उद्धटपणा नसायचा. आमचे रिलेशन उत्तम असल्यामुळे असे बोलायला काही वावगे नव्हते आणि दोन मित्रांमध्ये थट्टा मस्करी चालतेच.
गुरुजींना मी नेहमी म्हणायचो की तुम्ही म्हणता कि दत्त महाराज वाचवतील/ सांभाळतील. अहो पण ते वेळेवर येतील ना ? उशीर झाला तर काय फायदा ? ते खूप हसायचे आणि म्हणायचे, जो विश्वाचा संसार चालवतो तो वेळ कसा चुकवेल. कधीतरी ते कोणाला तरी सांगायचे अरे वर्षाला एक तरी श्री गुरुचरित्र पारायण करून महाराजांवर मेहेरबानी करा.
आठवणी असंख्य आहेत , त्यातल्या थोड्या आज लिहिलेल्या . बाकीच्या नंतर कधीतरी सांगतो.
विशाल फुलपगार
दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा.
https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s







