युरोप फिरायला जायच प्रत्येकाच स्वप्न असते. आपण चित्रपटातून युरोप खूप बघितलाय. मलादेखील पॅरिस ,स्वित्झरलँड , इंग्लंड , जर्मनी वगैरे देश बघायची इच्छा होती. अर्थात आपली इच्छा आणि आपले बजेट हे नेहमीच विरुद्ध दिशेला असते. युरोप फिरायला जायचे म्हणजे खूप खर्चिक, खूप लांब आणि गोऱ्या लोकांच्या देशात जायचे म्हणजे ते एक टेन्शन. २०१७ सप्टेंबरमध्ये मी कैलास मानस सरोवरला तिबेट मध्ये आणि मे २०१७ ला बायको , मुलाबरोबर सिंगापुर ला गेलो. तेव्हाच आम्ही ठरवले होते कि पुढच्या वर्षी स्वित्झरलँड ला जायचे.
फिरायला जायचे म्हणजे काही बेसिक गोष्टी पाळायच्या म्हणजे खर्चात खूप बचत होते. त्यापैकी एक महत्वाची बाब म्हणजे ऑफ सिझन मध्ये किंवा पर्यटकांचा हंगाम सुरु व्हायच्या थोडे आधी जायचे. कारण एक तर पर्यटकांची गर्दी कमी असते त्यामुळे एन्जॉय येते व हॉटेल /रेस्टॉरंट व फिरण्याच्या ठिकाणी ३० ते ५०% पर्यंत डिस्कॉउंटपण मिळते. फक्त स्वस्त म्हणून राहण्याच्या ठिकाणात तडजोड करायची नाही. राहायला नेहमीच सुरक्षित ठिकाण निवडायचे. https://www.tripadvisor.in/ अशा काही साईट आहेत ज्यावरून खूप माहिती मिळते.
आपल्याकडे फिरायला जायचे म्हणजे मुलांच्या शाळेप्रमाणे दिवाळीची सुट्टी व उन्हाळ्याची सुटी असे दोनच पर्याय असतात. युरोप ला जाण्यासाठी पर्यटकांचा हंगाम उन्हाळ्याच्या सुट्टीचा असतो. दिवाळीत जास्त कोणी जात नाही कारण तिथेपण थंडीची सुरुवात असते. आम्ही ऑफ सिझन म्हणून ऑक्टोबर २०१८ ला जायचे ठरवले.
मी , माझी आई , बायको डॉ. आदिती आणि मुलगा आर्यन असे आम्ही चौघे जण जाणार असे ठरले. वडिलांना पाठ दुखीमुळे एवढा प्रवास शक्य नव्हता. मुलगा आणि बायकोच्या सुट्ट्या आणि बजेट बघता जास्तीतजास्त १२-१४ दिवसाचं जाता येईल, असे कळले. मी थोडाफार रिसर्च करून पॅरिस आणि स्वित्झरलँड ला जायचे असे ठरवले व त्याप्रमाणे प्लॅनिंग ला सुरुवात केली.
यावेळी हॉटेलमध्ये ना राहता AIRBNB मध्ये थांबावे असा विचार होता. कारण एकतर कमी खर्चात मोठी जागा राहायला मिळते , जेवण बनवण्यासाठी किचन असते आणि कपडे धुवायला वॉशिंग मशीन असते. मी , बायको आणि मुलगा आम्ही तिघेही शाकाहारी होतो, आणि शाकाहारी लोकांचे खाण्याचे हाल होतात अशी ऐकीव माहिती होती. परंतु टुर ऑपरेटर चिराग सोबत बोलल्यावर त्याने सांगितले कि पॅरिस मध्ये हॉटेलमध्ये राहा , चांगले डिस्काउंट मिळेल आणि स्वित्झरलँड मध्ये अपार्टमेंट हॉटेल मध्ये राहा म्ह्नणजे ऐसपैस १ BHK फ्लॅट मध्ये आरामात राहू शकतो.
त्यामुळे आधी व्हिसा, मग विमानाचे बुकिंग व इतर बुकिंग करायचे ठरले. ट्रॅव्हल हिस्टरी असल्यामुळे व्हिसा रिजेक्ट व्हायचे काहीच कारण नव्हते. ३० ऑक्टोबर २०१८ला सकाळी मुंबई दिल्ली पॅरिस ला जायचे तिथून ट्रेन ने स्वित्झरलँड ला मग येताना पुन्हा पॅरिसवरून ८ नोव्हेंबर रात्री पॅरिस - दिल्ली मुंबई असे यायचे असे ठरले. विमान प्रवास अर्थातच एअर इंडियाने करायचा.
यूरोपमधिंल २६ देशांचा एक सामायिक schangen व्हिसा मिळतो व तो मिळाला कि आपण या २६ देशांपैकी कुठल्याही देशात फिरू शकतो. फक्त एअरपोर्टवर येताना आणि जाताना व्हिसा चेक होतो. बाकी कुठेही बघत नाहीत. भारतात या सर्व देशांचा व्हिसा अर्ज स्वीकारणे , अपॉइंटमेंट देणे , अर्ज छाननी करून संबंधित दूतावासाकडे पाठवणे यासाठी VFS GLOBAL या कंपनीतर्फे काम होते. व्हिसा द्यायचा कि नाही आणि दिला तर किती दिवसासाठी द्यायचा हा निर्णय संबंधित देशांचा दूतावास घेतो.
आमच्यापुढे फ्रान्स एम्बसी किंवा स्वित्झरलँड एम्बसी (दूतावास) मध्ये अर्ज करायचा पर्याय होता. गूगल बाबाच्या मदतीने असे कळले कि फ्रान्स हा देश सर्वात जलदगतीने व्हिसा देतो म्हणून फ्रान्स एम्बसी ला अर्ज केला. आणि ७ सप्टेंबर २०१८ ला VFS GLOBAL च्या कालीना, मुंबई येथील ट्रेड सेन्टर येथील ऑफिसमध्ये गेलो , बायोमेट्रिक केले , अर्ज जमा केला , तिथेच फोटो काढला. खरे म्हणजे तिथे प्रत्येक schangen देशाचे काउंटर होते. विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे साधारण एक तासात आम्ही बाहेर पडले व ४ दिवसांनी एजन्टने पासपोर्ट कलेक्ट केला आणि घरी आणून दिला.
लगेचच विमानाची तिकीट , पॅरिस - स्वित्झर्लंड TGV सुपरफास्ट ट्रेन तिकीट , तिथं फिरण्याच्या ठिकाणाची ,म्युसिअमची एन्ट्री तिकीट , पॅरिसमध्ये हॉटेल आणि स्वित्झरलँड मध्ये अपार्टमेंट बुक केले. त्याशिवाय स्वित्झरलँड मध्ये फिरण्यासाठी फॅमिली ट्रॅव्हल पास काढला. या ट्रॅव्हल पास ने बस , ट्रेन , ट्राम , बोट यातून स्वित्झर्लंड मध्ये कितीही वेळा आणि कुठेही फिरू शकतो.
याआधीच रिसर्च करून पॅरिसमध्ये राहायला हॉटेल विंड्सर ऑपेरा हे हॉटेल फायनल केले होते. स्वित्झरलँडमध्ये लुसर्न (Lucerne / Luzern ) हे मध्यवर्ती व सुंदर शहर आहे. इथून कुठेही सहजच जात येते (आपल्याकडील दादर स्टेशन प्रमाणे ) त्यामुळे लुसर्नमधील HITRENTAL या १ bhk अपार्टमेन्ट मध्ये राहायचे ठरले. TATA AIG चा ओव्हरसीस इन्शुरन्स काढला.
नोव्हेंबर हा यूरोपमधील थंडीचा महिना. माझ्याकडे कैलास यात्रा २०१७चे सर्व गरम कपडे होतेच. त्याप्रमाणे बाकी सर्वासाठी डेकॅथलॉन मधून सर्व खरेदी केली.
संपूर्ण प्रवासात काय ठिकाणे बघायची, कधी बघायची , प्रवास कसा करायचा , किती वाजता निघायचे व परतायचे , सर्व ठिकाणांचे एन्ट्री तिकीट वगैरे बारीक सारीक तपशील दिवस तारखेनुसार ठरला होता त्यामुळे काहीच गोंधळ नव्हता. पासपोर्ट , व्हिसा , सर्व एन्ट्री टिकेट्स, ट्रॅव्हल पास, TGV ट्रेनची पॅरिस - लुसर्न व रिटर्न तिकीट यांचे दोन दोन झेरॉक्स काढून ठेवले.
तास मी जन्मतःच नशीबवान , लहानपणापासून मी परदेशात फिरून आलो आहे. वडील इंडियन एरलाईन्स मध्ये होते त्यामुळे श्रीलंका , दुबई ,सिंगापूर , हॉंगकॉंग असे देश फिरून झाले होते. आई वडिलांबरोबर फिरायला जाणे म्हणजे एक वेगळीच मज्जा असते , लहानपणी आणि मोठेपणी सुद्धा. लहान असताना प्लांनिंग करावे लागत नाही. काहीही आवडले तर आई वडील विकत घेऊन देतात. फिरताना एखादे हॉटेल दिसले कि ऑटोमॅटिक भूक लागते व त्याची व्यवस्था आपले आई वडील करून देतात. लहानपणीचे हे विमान प्रवासाचे दिवस मला अजून आठवतात.एअरपोर्ट वर एअर कंडिशन ची खूप मज्जा वाटायची. मी विमानात बसलो कि पहिला कार्यक्रम सीट बेल्ट लावायचा, मग एक दोनदा खोलून खात्री करायचो. कधीतरी वाटायचे कि हा सीट बेल्ट लॉक झाला तर काय करायचे ? मग कानात कापूस घालायचो.विमान उड्डाण घेताना थोडी भीती वाटायची. आणि अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणजे एअर होस्टेस विचारायची कि व्हेज कि नॉन व्हेज ?. ती आपल्यापर्यंत येईपर्यंत मनात धाकधूक असायची. आपल्याला विसरून पुढे गेली तर ? विमानात मी हमखास नॉन व्हेज खायचो. (साधारण १९९७ ला मांसाहारी खाणे सोडले). आणि महत्वाचे म्हणजे विमानात जेवण कुठे व कसे गरम करतात याची मला खूप उत्सुकता असायची.
असो , आई २००७ मध्ये दुबई ला जाऊन आली होती, त्यानंतर तिने विमान प्रवास केला नव्हता. माझे मात्र बायकोबरोबर किंवा ऑफिसच्या निमित्ताने सतत विमान प्रवास होत होता. शिवाय अनेक वर्ष मी आई वडिलांबरोबर एकत्र प्रवास केला नव्हता. वडिलांना पाठीचा त्रास असल्यामुळे ते येणार नव्हते.

आम्ही पॅरिस साठी युरो व स्वित्झर्लंड मध्ये वापरायला स्विस फ्रॅंक घेतले. (तिथे युरो चलन चालते पण आम्ही स्विस फ्रॅंक घेतले.) जाण्याचा दिवस किती पटकन आला ते कळले पण नाही. आर्यन खूप exited होता. पॅरिसमध्ये डिस्नेलॅण्ड बघण्यासाठी एक अक्खा दिवस आम्ही ठेवला होता. एकूण आम्ही सगळेच पहिल्यांदा युरोप ट्रिप ला विशेषकरून स्वित्झर्लंड ला जाणार म्हणून खूप आनंदित होतो.
आई , बायकोने चपात्या , मेथी ठेपले , गुळपोळी हे तयार करून airpack करून घेतले. लाडू , चिवडा वगैरे पण घेतले. तांदूळ ,मसाला घेतला. रेडी to eat जेवण घेतले जे फक्त पाण्यात गरम करून घेतले कि खाता येते. एकंदरीत एक मोठी बॅग फक्त खाण्याच्या सामानाने भरली आणि ते महत्वाचे देखील होते.

३० ऑक्टोबर २०१८ ला AI ३४८ या सकाळी ७. ५५ च्या विमानाने दिल्ली आणि नंतर दिल्लीहून पॅरिस ला विमान होते. आम्ही पहाटे ५ वाजताच मुंबई एअरपोर्ट ला पोहोचलो. मुंबईहून दिल्ली ला सकाळी १० वाजता पोहाचलों.
मुंबई मधेच कस्टम व ईमिग्रेशन केले होते त्यामुळे बॅग डायरेक्ट पॅरिसलाच मिळणार होत्या. दिल्लीहून पॅरिसला जाणारे AI १४३ हे विमान दुपारी १ वाजता होते या जवळपास साडेसात तसंच प्रवास होता. विमानाच्या गेट वर जाताना आर्यनला भूक लागल्यामुळे तिथे एका ठिकाणी खाल्ले. Icecream च्या दुकानाच्या टर्नओव्हर मध्ये भर टाकली.
साधारणपणे १२ वाजता बोर्डिंग चालू झाले व आम्ही AI १४३ मध्ये प्रवेश केला विमान बऱ्यापैकी भरलेले होते. आर्यन खिडकीत बसला. प्रत्येक लहान मुलाला खिडकी आवडते व आर्यन हि त्याला अपवाद नाही. विमान वेळेत उडाले व थोड्याच वेळात आम्हाला जेवण दिले. आम्ही व्हेज असल्यामुळे व्हेज जेवलो. मी आणि आर्यन ने ३ इडियट्स हा विनोदी चित्रपट पाहिला आणि खूप हसलो. मग सर्वांसारखा तो पण झोपला. मी मात्र विमानात सीटवर बसल्यावर पाय कसे ऍडजस्ट करायचे हा माझा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत करत जागाच होतो. विमानात २-३ राऊंड मारले , सर्वत्र शांतता होती.
विमान प्रवास पण आयुष्यासारखा एक अनिश्चित प्रवास आहे. विमानाचे दरवाजे बंद होतात आणि दुसरीकडे विमान उतरले कि उघडतात. तो पर्यंत आपण अधांतरी असतो. एका प्रकारे याला time travel असे समजायला हरकत नाही. एवढे वेगाने प्रवास करत असताना देखील बाहेर काय चाललेय काहीच कळत नाही. Its like flying coffin. तसेच विमानात प्रवासी खूपच शिष्टपणाने वागतात. कोणाच कोणाशी बोलत नाही. हे मला अजुनपण न उलगडलेले कोडे. तसेच विमानातील crew बरोबर उगाचच उद्धटपणे वागतात असे का ? माणूस हा नेहमीच दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ / कनिष्ठ समजतो व तसेच वागतो.
असो विमान वेळेत सुटले आणि वेळेत पॅरिसला पोहोचले. उतरण्याच्या थोडा वेळ आधी विमानात लगबग होती. खाण्यासाठी नास्ता दिला व तो आम्ही जबाबदारीने खाल्ला. पॅरिस एअरपोर्ट ला संध्याकाळी ६ वाजता पोहोचलो. इम्मीग्रेशन करून व बॅग घेऊन आम्ही एक तासाच्या आतमध्ये एअरपोर्टच्या बाहेर आलो.
ठरल्याप्रमाणे आम्हाला घ्यायला एक गाडी व ड्राइवर आला होता व तो आमच्या नावाचा बोर्ड घेऊन उभा होता.
त्याला शोधणे हि पण एक एक्सईटिंग गोष्ट होती. मला जेवढे फ्रेंच येते त्यापेक्षा थोडे अधिक इंग्रजी त्याला येत होते. त्यामुळे तो काय बोलायचं आणि आम्ही काय बोलायचो याचा काहीही ताळमेळ नव्हता. आम्हाला घ्यायला मॅटॅडोर साईझ ची मर्सिडीझ कंपनी ची गाडी होती. व त्यात बसताना VIP असल्याचे उगाचच फीलिंग आले. प्रत्येक देशात हवेचा एक वेगळा वास असतो व आम्हाला तो पॅरिसमध्येपण जाणवला.
मुंबई मधेच कस्टम व ईमिग्रेशन केले होते त्यामुळे बॅग डायरेक्ट पॅरिसलाच मिळणार होत्या. दिल्लीहून पॅरिसला जाणारे AI १४३ हे विमान दुपारी १ वाजता होते या जवळपास साडेसात तसंच प्रवास होता. विमानाच्या गेट वर जाताना आर्यनला भूक लागल्यामुळे तिथे एका ठिकाणी खाल्ले. Icecream च्या दुकानाच्या टर्नओव्हर मध्ये भर टाकली.
![]() |
| दिल्ली एअरपोर्टवर |
![]() | |
|
साधारणपणे १२ वाजता बोर्डिंग चालू झाले व आम्ही AI १४३ मध्ये प्रवेश केला विमान बऱ्यापैकी भरलेले होते. आर्यन खिडकीत बसला. प्रत्येक लहान मुलाला खिडकी आवडते व आर्यन हि त्याला अपवाद नाही. विमान वेळेत उडाले व थोड्याच वेळात आम्हाला जेवण दिले. आम्ही व्हेज असल्यामुळे व्हेज जेवलो. मी आणि आर्यन ने ३ इडियट्स हा विनोदी चित्रपट पाहिला आणि खूप हसलो. मग सर्वांसारखा तो पण झोपला. मी मात्र विमानात सीटवर बसल्यावर पाय कसे ऍडजस्ट करायचे हा माझा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत करत जागाच होतो. विमानात २-३ राऊंड मारले , सर्वत्र शांतता होती.
विमान प्रवास पण आयुष्यासारखा एक अनिश्चित प्रवास आहे. विमानाचे दरवाजे बंद होतात आणि दुसरीकडे विमान उतरले कि उघडतात. तो पर्यंत आपण अधांतरी असतो. एका प्रकारे याला time travel असे समजायला हरकत नाही. एवढे वेगाने प्रवास करत असताना देखील बाहेर काय चाललेय काहीच कळत नाही. Its like flying coffin. तसेच विमानात प्रवासी खूपच शिष्टपणाने वागतात. कोणाच कोणाशी बोलत नाही. हे मला अजुनपण न उलगडलेले कोडे. तसेच विमानातील crew बरोबर उगाचच उद्धटपणे वागतात असे का ? माणूस हा नेहमीच दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ / कनिष्ठ समजतो व तसेच वागतो.
असो विमान वेळेत सुटले आणि वेळेत पॅरिसला पोहोचले. उतरण्याच्या थोडा वेळ आधी विमानात लगबग होती. खाण्यासाठी नास्ता दिला व तो आम्ही जबाबदारीने खाल्ला. पॅरिस एअरपोर्ट ला संध्याकाळी ६ वाजता पोहोचलो. इम्मीग्रेशन करून व बॅग घेऊन आम्ही एक तासाच्या आतमध्ये एअरपोर्टच्या बाहेर आलो.
![]() |
| पॅरिस CDG एअरपोर्ट वर जाहीर आगमन |
![]() |
| आम्हाला घेण्यासाठी गाडीचा ड्राइवर एअर पोर्ट वर |
एअरपोर्ट वरून आम्ही निघालो व मुख्य रस्त्याला लागलो. सर्वच पॉश गाड्या होत्या , संध्याकाळ असल्याने बरीच ट्राफिक होती व तरीदेखील गाड्या शिस्तीत जात होत्या. पॅरिस हे मुंबई सारखेच गजबजलेले शहर , उंच इमारती, प्रशस्त व स्वच्छ रस्ते , शिस्तीत चालणारी वाहने आणि तुरळक पाऊस यांनी आमचे स्वागत केले. काही ठिकाणी निग्रो/ इमिग्रंट लोक घोळक्याने उभी होती. त्याची भीती वाटली. असे करून साधारणपणे ४० मिनिटात आम्ही विंड्सर ऑपेरा या हॉटेल मध्ये पोहोचलो. मुख्य रस्त्यापासून एका छोट्या रस्त्यावर हे एक ४ मजली हॉटेल होते. आमचा रूम चौथ्या मजल्यावर होता. इथे मदतीला कोणी नव्हते लिफ्ट तर एवढी छोटी होती कि ३ माणसे जेमतेम मावायची . सामान आणण्याचे महत्वपूर्ण काम मी जबाबदारीने २-३ वेळा लिफ्टच्या फेऱ्या मारून केले. इथे खूप जुन्या इमारतींचे रूपांतर हॉटेल मध्ये केले होते
लक्षात ठेवा युरोप मध्ये हॉटेलचे रूम खूपच छोटे असतात म्हणजे रूम शुरू होनेसे पहिलेही खतम हो जाता है. हे लक्षात ठेवूनच आम्ही ट्वीन रूम बुक केला होता. त्यामुळे तो तुलनात्मक दृष्ट्या प्रशस्त होता. टॉप फ्लोर असल्यामुळे view चांगला होता. थकवा असल्यामुळे आम्ही अंघोळ करून घरून आणलेले पदार्थ खाऊन झोपलो. छान झोप लागली. इथे थंडी होती. उद्या जरा आरामात उठून पॅरिस शहराची टूर करायची होती.
![]() |
| हॉटेल विंड्सर ऑपेराच्या बाहेर |
![]() |
| हॉटेल रिसेपशन |
![]() |
| हॉटेल विंड्सर ऑपेरा मध्ये नास्ता करताना |
बाहेर थोडा फेरफटका मारून आलो. रात्री पॅरिस मला सुरक्षित वाटले नाही. सकाळी मात्र लगबग होती.
मग सगळेजण तयार होऊन उबेर टॅक्सी ने पॅरिस सिटी व्हिजन च्या ऑफिसला पोहोचलो आणि तिथून पॅरिस दर्शन बसमध्ये बसलो.
पॅरिस बघितले. पॅरिसच्या siene नदीवर cruze राईड घेतली.
![]() |
| siene नदीवर cruze राईड |
![]() |
| आयफेल टॉवेरवरून पॅरिस दर्शन |
![]() |
| आयफेल टॉवर वर भोजन |
![]() |
| आई आणि आर्यन आयफेल टॉवरवर |
![]() |
| थोडा पाऊस आला |
Louvre museum हे एक भव्यदिव्य museum होते. पण आत फिरण्यासाठी खूप चालावे लागले. इंटरेस्टिंग इतिहास खूप छान पद्धतीने जपून ठेवला होता. महत्वाचे म्हणजे मोनालिसा बाईंचे जगप्रसिद्ध चित्र पहिले. मला काही विशेष वाटले नाही , कदाचित मला कळले नसेल. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती व भूक लागली होती. मग बाहेर पडलो.म्युसिअम बाहेर यायला देखील खूप चालावे लागले.
![]() |
| मोनालिसा चे जग प्रसिद्ध चित्र |
![]() |
| हॉटेल गांधीजी मध्ये डिनर |
सकाळी ७. १५ ला हॉटेलवरून निघालो व १० मिनिटात पॅरिस सिटी व्हिजन च्या ऑफिसला पोहोचलो. नास्ता तयार नसल्यामुळे हॉटेलवाल्याने फळ पॅक करून दिली. बरोबर ८ वाजता बस निघाली व पंचेचाळीस मिनिटात डिस्ने लँड ला पोहोचली. हे ठिकाण शहराबाहेर होते. आमच्याबरोबर बस मध्ये काही भारतीय होते. बस वाल्याने ज्या ठिकाणी बस उभी केली तिथेच रात्री बरोबर ८ वाजता यायला सांगितले. त्यामुळे आम्ही आजूबाजूच्या खाणाखुणा लक्षात ठेवल्या. दिवसभर आम्ही डिस्ने लँड फिरलो. अनेक खेळ खेळलो. खूप चालायला लागले. गर्दीपण होती. तिथेच जेवलो , आईस्क्रीम खाल्ली. एकंदरीत खूप धमाल. आर्यनने तर खूपच एन्जॉय केले. पावसाने मात्र थोडा त्रास दिला पण ती पण एक वेगळी मज्जा. इथे माझा चष्मा कोणाचा तरी धक्का लागून तुटला. त्यामुळे अडचण झाली. पण मग मी आई चा चष्मा घालून म्हणजे केले.
![]() |
| डिस्ने लँड |
![]() |
| भर पावसात डिस्नी लॅण्ड मध्ये मज्जा करताना मी आणि आर्यन |
दुपारी १२. २३ ची पॅरिस ते Basel (स्वित्झरलँड) अशी सुपरफास्ट ट्रेन होती. चांगला रेट मिळाल्यामुळे फर्स्ट क्लास चे तिकीट काढले होते. तसे म्हटले तर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास मध्ये खूप फरक नाही. आज आरामातच उठलो. नास्ता करून आम्ही बाहेर चालत फिरून आलो. थंडी होती पण pleasant वातावरण होते. ११. १५ ला आम्हाला घ्यायला गाडी येणार होती व तिथून ३० मिनिटात PARIS GALE LAYON स्टेशन ला पोहोचायचे असे प्लांनिंग होते. आणि नेमके आमची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे उशिरा आली व आम्ही जेमतेम १२ वाजता स्टेशन ला पोहोचलो.आत्ता सामान उतरवायचे आणि मग सर्वाना घेऊन प्लॅटफॉर्म शोधायचा , डब्बा शोधायचा म्हणजे बहुतेक गाडी मिळणार नाही असे वाटले. सुदैवाने गाडीतून उतरल्या उतरल्या TGV ट्रेन चा एक सहाय्यक आमच्याकडे आला व स्वतःचे आयकार्ड दाखवून आमचे तिकीट बघितले व मग आमचे सामान ट्रॉली वर टाकले मी साशंक होतो. पण त्याने १० मिनिटात आम्हाला आमच्या सीटवर बसवून दिले , गाडीत सामानपण लावले.
![]() |
| पॅरिस ते बासेल TGV ट्रेन फर्स्ट क्लास तिकीट |
![]() |
| पॅरिस ते स्वित्झर्लंड TGV ट्रेन मध्ये |
![]() |
| बासेल स्टेशन स्वित्झर्लंड मध्ये जाहीर आगमन |
![]() |
| SBB अँप |
![]() |
| लुझेर्न स्टेशन बाहेर |
![]() |
| लुझेर्न स्टेशन बाहेरील बस डेपो |
येथील ट्रेन खूप स्वच्छ आणि convinient आणि विशेष गर्दी नव्हती. तिथून स्टेशन बाहेर आलो आणि NFB २० या नंबरची बस पकडून zihlmattweg या स्टॉप ला उतरलो. बस मध्ये उभा राहायला जागा होती. आणि स्थानिक लोक पण फ्रेंडली होती. एक्दम स्वच्छ हवा , स्वच्छ रस्ते व खूप सुरक्षित वाटत होते. स्टॉप ला उतरल्यावर रास्ता ओलांडून आमचे अपार्टमेंट हॉटेल होते. खूप उंच अश्या या २ इमारती होत्या. तिथे बिल्डिंग खालील लॉकर चा कोड आम्हाला आधीच सांगितलं होता व त्यातून चावी काढून आम्ही २ऱ्या मजल्यावरील आमच्या रूमवर आलो. सर्वाना झोपायला स्वतंत्र बेड , मोठे बाथरूम , किचन , हॉल असे ऐसपैस जागा होती. हॉल मध्ये एक instruction बुक होते , त्यात सर्व सूचना स्पष्ट लिहिल्या होत्या. एव्हाना अंधार झाला होता, आम्ही फ्रेश होऊन खाली आलो. समोरच MIGROS हे सुपरस्टोर होते तिथून , तेल , कपडे धुवायची पावडर , साबण , अंडी , बटर वगैरे आणले. खाली तळ मजल्यावरील वॉशिंगमशीन मध्ये कपडे धुतले , सुकवले व खोलीत इस्त्रीपण केले. किचनमध्ये जेवण बनवले.
![]() |
| लुसर्न स्टेशन वरील कूप सुपरस्टोर |
![]() |
| गॅलरीमध्ये ब्रेकफास्ट |
![]() |
| अपार्टमेंट हॉटेल ची इमारत |
![]() |
| स्थानिक ट्रेन |
स्वित्झर्लंड इटली बॉर्डरवरील लुगानो या गावी गेलो. तिथे चालत चालत खूप फिरलो. अत्यंत जुन्या पद्धतीचे घरे पहिली.
![]() |
| ट्रेन ची वाट बघताना |
माऊंट टिटलिस ला गेलो खूप छान वाटले , बर्फात खेळलो. काही भारतीय पर्यटक भेटायचे त्यांच्याशी गप्पा व्हायच्या.
![]() |
| केबल कार |
![]() |
| माऊंट टिटलिस वर प्रचंड थंडी आणि बर्फ |
![]() |
| चॉकोलेट फॅक्टरी मध्ये |
मग तिथून Montreux या चार्ली चॅप्लिनच्या गावी गेलो. छान वाटले सर्व प्रवास हा ट्रेन आणि बस ने SBB APP च्या साहाय्याने झाला थोडा उशीर झाल्यामुळे chillion castle बाहेरूनच बघितला.
![]() |
| chillion castle |
तिथून जिनेव्हा स्टेशनला आलो. थकवा असल्यामुळे जिनेव्हा फिरलो नाही. लुझेर्नला जायला ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटणार होती. मी धावत जाऊन ट्रेनच्या ड्राइवर ला सांगितले कि आईला चालायला उशीर होतोय व थोडी ट्रेन थांबवली तर पकडता येईल. त्या माणसाने ट्रेन दोन मिनिटे उशिरा सोडली काहीच बोलला नाही.
लुझेर्न शहर हे तलावांचे शहर आहे. तिथे एका क्रूझ वर दीड तासांची राईड घेतली मज्जा आली. स्विस फॅमिली ट्रॅव्हल पास मुळे हे शक्य झाले.
![]() |
| Cruze ride इन लुझेर्न |
![]() |
| Rheinfall स्टेशन |
तिथेच आम्ही एक बॅटरीवर चालणारी व ड्राइवर नसलेली कार बघितली.
लवकर आलो कि कपडे धुणे व ड्रायरमध्ये सुकवणे , इस्त्री करणे , अपार्टमेंटमधील गार्डेनमध्ये फिरणे असे करायचो.
जगप्रसिद्ध माऊंट जुंगफ्रा वर गेलो. खूपच थंडी आणि बर्फ होता . गर्दी कमी असल्यामुळे एन्जॉय करता आले. इंटरलाकेन हे ठिकाण पण पहिले. या ठिकाणी अनेक भारतीय चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. इथे चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा खूप प्रसिद्ध आहे.
तिथेच एका हॉटेलमध्ये जेवलो.
![]() |
| कित्ती छान ट्रेन आणि कित्ती छान, स्वच्छ प्लॅटफॉर्म |
संपूर्ण स्वित्झरलँडमध्ये जागोजागी स्वच्छ टॉयलेट आहेत त्यामुळे खूप सोय व्हायची.
परतीचा दिवस कधी उजाडला कळलेच नाही. अपार्टमेंट मध्ये सकाळी नास्ता बनवायचो आणि रात्रीचे जेवण त्यामुळे जेवणाचे हाल झाले नाहीत. तसेच COOP किंवा MIGROS या जागोजागी असणाऱ्या सुपरस्टोर मधून सँडविच , बर्गर , फ़्राईस वगैरे घ्यायचो. त्यामुळे घराचा फीलिंग आला. एकंदरीत स्वित्झरलँड चा अनुभव छान होता
![]() |
| निघालो. |
![]() |
| लुझेर्न स्टेशनला जायला बस ची वाट बघताना बस स्टॉप वर |
![]() |
| शाळेतील मुले तिकीट तपासायचे काम शिकतात |
एअर इंडिया AI १४२ हे विमान रात्री ९. ३० ला सुटले .
![]() |
| पॅरिस CDG एरपोर्टवर |
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता भारतीय वेळेनुसार दिल्ली ला आले आणि मग मुंबई ला AI १६३ या दुपारी ३च्या विमानाने ५ वाजता पोहोचलो.
![]() |
| मुंबई एअर पोर्ट वर सामान कलेक्ट केले. |
युरोप खूप सुंदर आहे , पण खूप चालायची तयारी ठेवायची. वातावरण आणि स्वच्छता असल्यामुळे त्याचे काही वाटत नाही. पॅरिस सूर्यास्तानंतर सुरक्षित वाटत नाही व तिथे आशियाई लोकांना जास्त किंमत देत नाही असे मला तरी जाणवले. स्वित्झर्लंड मात्र एक्दम सुरक्षित , स्वच्छ आणि सुंदर शहर. निसर्ग आणि हवा खूप छान . असा एक्दम पॅरिस आणि इथे फरक जाणवतो. तरी तिथली मोठं मोठाली घरे , एकटे दुकटे राहणारे वृद्ध लोक खूप दिसले , वाईट वाटले. हाकेला कोणीतरी येत असेल असे वाटत नाही. अर्थात ती त्यांची जीवन पद्धती आहे. आपण ते चूक किंवा बबरोबर असे म्हणू शकत नाही. स्वित्झर्लंड खूप सुंदर असले तरी मी त्याचे वर्णन Beauty without soul असे करिन.
शेवटी मला काय किव्हा कोणत्याही भारतीयाला " जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी " (माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा मला प्रिय आहे.)
विशेष म्हणजे माझी आई माझ्याबरोबर होती आणि तिने पण खूप एन्जॉय केले याचा विशेष आनंद झाला. कधीतरी युरोप आणि विशेषकरून स्वित्झर्लंड पाहावे . खूप पाहण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे.
पण गड्या आपला देश बरा.....