माझे गुरु श्री पाठकगुरुजी यांच्या थोड्याफार सेवेमध्ये असल्यामुळे श्री दत्त संप्रदायातील अवतारी सत्पुरुष यांच्याविषयी माहिती मला होती. अनेक स्थानांना भेटी देण्याचा योग श्री पाठकगुरुजी यांच्या पुण्यायीने आला.
माझे आराध्यदैवत म्हणजे "श्री स्वामी समर्थ " ज्यांना आम्ही "आजोबा" असे म्हणतो. परंतु गुरुजी माझ्याकडून दत्तसेवा / उपासना जास्त करून घेतात. शेवटी काय सर्व उपासना दत्त महाराजांकडेच पोहोचतात. कारण कलियुगाचा स्वामी श्री दत्तमहाराज आहेत.
"कृते जनार्दने देवे ! त्रेताया रघुनंदना ! द्वापारे रामकृष्णस्य ! त्रेताया रघुनन्दन !"
आमच्या Jai Gurudev Ashram Trust , Ganagapur चे vice president व माझे जवळचे मित्र श्री उन्मेष पाटील यांनी मला दत्तमहाराजांचा प्रथम अवतार "श्रीपाद श्रीवल्लभ " यांचे विषयी माहिती करून दिली. श्रीगुरुचरित्र मध्ये श्रीपादांचा उल्लेख आहे परंतु सविस्तर माहिती नाही. श्री पाठकगुरुजीनी मला हरिओम तीर्थ स्वामी यांनी लिहिलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे ओवीबद्ध पद्य चरित्र वाचनास दिले (First week of January २०१३ ).
त्यानंतर आम्ही ३rd week of January २०१३ मध्ये गाणगापूर ला गेलो. आमच्या अश्रामामाध्येच राहिलो. ७-८ दिवस मुक्काम होता. दरवर्षी प्रमाणे पारायण गौरव पुरस्कार पुरस्कार प्रदान सोहोळा २६ January ला संपन्न झाला. यावेळी आमच्या Trust ने श्रीमती सुधा गाडगीळ , विलेपार्ले यांना प्रदान केला. २७ January ला सकाळीच गाणगापूर येथून श्रीपादांची कर्मभूमी कुरवपुर येथे जाण्याचे ठरले. मी म्हटले कि फक्त मी आणि श्री अरविंद ओक आणि श्री. सुरेंद्र फडणीस यांनी जायचे असे ठरले. परंतु पाठकगुरुजी आणि उन्मेष म्हणाले कि जातोच आहेस तर बरोबर इतरानाही घेवून जा, म्हणजे सगळ्यांचे दर्शन होवून जाइल. त्याप्रमाणे २७ January २०१३ ला मी आणि इतर ७ असे आम्ही एकूण ८ Qualis गाडी ने सकाळी ५-१५ ला आमच्या आश्रमातून निघालो. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्ता एकदम रिकामा होता. गाणगापूर पासून सुरुवातीचे १५-२० किलोमीटर सोडले तर बाकी सर्व रस्ता एकदम छान होता.महत्वाचे म्हणजे रस्त्यामध्ये एकही toll नाही. नास्ता करण्यासाठी थांबलो. मग पुन्हा प्रवास सुरु.
सकाळी ९-४५ ला आम्ही पंच पहाड येथे पोहोचलो. कुरवपुर हे कृष्णा नदीच्या मध्यभागी असलेले एक बेट आहे. या बाजूला पंच पहाड तेथून आम्ही गॊल छोट्या बोटीमधून (बुट्टी ) कुरवपुर ला पोहोचलो. नदीतून जाण्यासाठी अंदाजे १५ मिनिटे लागली तसेच त्याने प्रत्येकी २० रु घेतले. अंदाजे सकाळी १०. १५ ला आम्ही कुरवपुर मंदिरात पोहोचलो. श्री उन्मेष यांनी आधीच भट्ट गुरुजी यांना फोन करून सांगितले होते. फारच प्राचीन मंदिर आहे. येथे श्रीपाद यांनी आयुष्यातला बराच काल व्यातित केला होता. राहण्यासाठी विशेष सोय नाहि. येण्याआधी येथील पुजारी श्री वासुदेव भट (०९७४०३१३८२८/०९७३१८२७५४६) यांना फोन केलात तर तिथे प्रसाद्भोजनाची व्यवस्था होते.
अतिशय पवित्र आणि सात्विक असे हे स्थान अहे. महाराजांचे vibrations येथे जाणवतात. उत्सवाचे दिवस सोडले तर येथे विशेष गर्दी नसते.
असो , भट्टगुरुजी ना भेटलो. मग कपडे बदलून सोवळे घातले , मादिरामध्ये जाउन दर्शन घेतले. मग नित्य जप केला , मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. मन प्रसन्न होते. अंदाजे ११. ४५ ला महाराजांची आरती झाली. त्यानंतर भारतीय बैठकीमध्ये महाप्रसाद घेतला. सतत नामस्मरण आणि "दिगम्बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " चा जयघोष चालू होता. वातावरण पूर्ण भक्तिमय व दत्तामय झाले होते.
त्यानंतर जाताना आम्ही टेंबे स्वामींच्या गुहेचे दर्शन घेतले. या ठिकाणी टेंबे स्वामी यांनी तपश्चर्या केली होति. व श्री टेंबे स्वामींनी हे कुरवपुर स्थान शोधून होते. एवढ्या isolated जागेमध्ये टेंबे स्वामींनी कशी उपासना केली असेल हे आठवून अंगावर शहारे येतात. टेंबे स्वामींचे आपल्या सर्व दत्त भक्तांवर अनंत उपकार आहेत. किंबहुना दत्त धर्माचे पुनरुज्जीवन श्री टेंबे स्वामींनी केले.
यानंतर आम्ही अंदाजे दुपारी १.३० ला कुरवपुर येथून निघालो. परत त्या छोट्याश्या गोल होडीमधून कृष्णा नदी ओलांडून Qualis ने परतीचा प्रवास् सुरू केला. अश्या प्रकारे एका वेगळ्याच अनुभवातून कुरवपुर येथून आम्ही आमच्या गाणगापूर आश्रमामध्ये संध्याकाळी पोहोचलो. अंदाजे oneway गाणगापूर ते कुरवपुर २६० kms आहे.
भक्तजन कुरवपुर ला जाण्यासाठी खूप प्रयत्न किव्हा कष्ट करतात परंतु आम्ही तर आरामात जाऊन आलो. यालाच गुरुकृपा असे म्हणतात. आमच्या पैकी श्री ओक सोडून बाकी ७ जन प्रथमच कुरवपुर ला जाऊन आले. हे केवळ श्री पाठक्गुरुजी यांच्या दत्तभक्ति मुले , श्री उन्मेष पाटील यांच्यापुढाकारामुळे आणि आमच्या आश्रमामध्ये सुरु असलेल्या श्रीपादांच्या अखंड परायाणामुळे शक्य झले. आम्ही कुरवपुर दर्शन घेवून आल्यावर आम्हाला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद पाठकगुरुजी आणि उन्मेष यांच्या चेहेरया वर दिसत होता. आल्यावर गुरुजी ना आम्ही आमचा प्रवास व दर्शन याची माहिती दिलि. आम्हा ८ जणांना किती आणि काय काय सांगू असे झाले होते. अत्यंत आनंद आणि समाधान देणारा हा अनुभव होता.
गाणगापूर येथून ३० January २०१३ ला कारने दुपारी जेवून निघालो आणि अक्कलकोट दर्शन केले आजोबाना नमस्कार केला. त्यानंतर सोलापूर दत्त chowk येथील शुभराय मठामध्ये गेलो. (आजोबा आणि शंकर महाराज यांनी यथे बराच काल वास्तव्य केले होते ). मठाच्या सर्वेसर्वा आणि कार्मासाध्वी शुभांगी बुवा यांना भेटलो. त्यांनी अनाथ बाळांसाठी चालवलेले पाखर संकुल , महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरणासाठी चालावलेले अनेक उपक्रम तसेच विवाहपूर्व व नंतर जोडप्यांसाठी समुपदेशन केंद्र बघितले. शुभराय महाराज , आजोबा आणि शंकर महाराज यांच्या पादुकांचेदर्शन घेतले. शुभांगी बुवांचे कार्य बघून दुर्गाशक्ती / स्त्री शक्ती काय करू शकते हे बघायला मिळाले. बुवांच्या निरपेक्ष वृत्ती कडे बघून आपोआपच नतमस्तक झालो आणि मग सिद्धेश्वर express ने मुंबई कडे रात्री प्रयाण केले. या वेळी देव देवळात आणि माणसांत सुद्धा बघायला मिळाला .




Atishay chan anubhav betala aahe
ReplyDeletelooks like u had a great time, nicely done !
ReplyDeletelooking forward to read about ur future trips.
Thanks Redhat and Third eye.... Pithapur trip experience already written
ReplyDeletemiracle shripadshrivalbh charitramrut reading
ReplyDeletewow. nice
Delete