Saturday, November 18, 2017

Kailas Manas sarovar yatra September 2017


कैलास मानससरोवर यात्रा ३ सप्टेम्बर २०१७ ते १५ सप्टेम्बर २०१७ 



हा मी काढलेला कैलासचा फोटो आहे. 
कैलास पर्वत व एकूणच तिबेट विषयी मला लहानपणापासूनच आकर्षण होते. कैलास पर्वतविषयीच्या अनेक कथा / दंतकथा ऐकून होतो. एकंदरीत कैलासचि यात्रा किती कठिन आहे तसेच तिबेटवरील चीनचा कब्ज़ा व भारतीयांना तिथे मिळणारी हिन् वागणूक हे देखील ऐकून होतो. एकंदरीत कैलास पर्वत, कैलास मानससरोवर तसेच तिथून जवळ असलेले राक्षसताल (रावणाने जिथे तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले ) व यांच्या सुरस कथा ऐकून होतो. त्यामुळे कैलास यात्रा करायचीच होती पण ती कशी व कोणाबरोबर करावी हे सुचत नव्हते. कैलासाला जाऊन आलेले माझे मित्र श्री. संजय फडके यांनी कैलास परिक्रमा पूर्ण केली होती. श्री. विजय कांबळे व श्री. हेमंत मोहिते हे मात्र खराब हवामानामुळे फक्त पहिल्या दिवसाची परिक्रमा पूर्ण करू शकले (एकूण परिक्रमा तीन दिवसांची असते).

बरीच चौकशी केल्यावर कळले कि कैलास यात्रा साठी भारतातून तीन मार्गाने जात येते.
१) केंद्र शासनाच्या उत्तराखंड मार्गाने:  (एकूण ४०० किलोमीटर पायी  चालणे  ) त्यात पण अर्ज भरणे आणि मग इतर शासकीय सोपस्कार वर्षाला अंदाजे १८०० ते २००० लोक यात्रा करतात.
२)  सिक्कीम च्या नाथूला मार्गाने : वर्षातून अंदाजे ४०० जण यात्रा करतात.
३) नेपाळ मार्गे : हा खाजगी मार्ग असून यातून वर्षाला १८००० जण यात्रा करतात. यात देखील काठमांडूवरून रोड ने किव्हा विमान , हेलिकॉप्टर ने जाऊ शकतो.

यातला उत्तराखंड आणि सिक्कीम चा मार्ग मला काही जमलं नसत. त्यामुळे नेपाळमार्गे प्रवास करावा असे मी ठरवले. व २०१४ -१५ पासून याचा गंभीर विचार केला. परंतु एप्रिल २०१५ मध्ये आलेल्या भीषण भूकंपामुळे तिथले रस्ते पूर्णपणे खराब झाले त्यामुळे by road यात्रा नेपाळमार्गे बंद झाली ती अजून बंद आहे. मात्र विमान , हेलिकॉप्टर ने चीन बॉर्डर पर्यंत जात येते आणि मग आपण तिबेट मध्ये जाऊ शकतो असे कळले. व आपणही तसेच जावे असे ठरवले. २०१६ साली खूप प्रयत्न करूनही पैशांची जमवाजमव झाली नाही व त्यामुळे कैलास प्रवास घडला नाही. त्यामुळे मी थोडा नाराज झालो. एखादी गोष्ट व्हायची असेल तर सर्वे काही पटकन जुळून येते असा अनुभव असल्यामुळे मी जास्त काही विचार केला नाही. परंतु तीव्र इच्छा असल्यामुळे मी जाणार हे मात्र नक्की. माझी मैत्रीण सौ. अर्चना गोरे हि योग टीचर असल्यामुळे तिच्याकडून मी योग , प्राणायाम , सूर्यनमस्कार वगैरे २०१६ मधेच शिकलो व नियमित प्रॅक्टिस करत होतो. माझे वजन ९० किलो होते त्यामुळे वजन कमी  करण्याचा सार्वजनिक विचार मनात आणला व त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्याला काही विशेष यश आले नाही. असो साधारण पणे २०१७ च्या राखी पौर्णिमेला (ऑगस्ट २०१७) कैलासाला जायचे असे मी ठरवले. पौर्णिमेला मानस सरोवर किनारी राहण्याला विशेष महत्व असते व पहाटे ४ -५ वाजता आकाशातील तारे मानससरोवर मध्ये स्नान करायला येतात व हा खगोलीय नजरा  आपण डोळ्याने पाहू शकतो असे म्हणतात म्हणून पौर्णिमेचा विचार केला.

२०१७ उजाडला तरीदेखील माझी आर्थिक व्यवस्था होत नव्हती. तसेच नेपाळमार्गे विमानाने गेल्यास tour operator १.५ लाख ते १. ७५ लाख घेतात अशी माहिती होती. म्हणजे माझे बजेट २.२५ ते २. ५ लाख होते. २०१६ पासून मी श्री. नामराज  जोशी (हे नियमित कैलास यात्रा आयोजित  करतात असे मला इंटरनेट वरून कळले.) याना फेसबुक वरून follow करत होतो. व मी ठरवले कि हा माणूस योग्य वाटतो व त्याच्याबरोबरच जावे असे मी नक्की केले (मनाचा कौल). साधारणपणे जानेवारी २०१७ पासून अनपेक्षित पैसे येण्यास सुरुवात झाली मग मी , माझी पत्नी डॉ अदिती व मुलगा कुमार आर्यन आम्ही मे २०१७ ला सिंगापोरला फिरून आलो. जाण्याआधी नामराजजी ना फोन करून सांगितले कि मला कैलासला जायचे आहे तरी मी सिंगापुर वरून आल्यावर तुम्हाला भेटतो.  मग पुढील चर्चा करूया. ते म्हणाले अवश्य या. सिंगापुर वरून आल्यावर मी नामराजजी ना फोन केला व म्हटले कि भेटायचे आहे. ते म्हणाले मे घर पर हू . कभी आते हो. मी म्हटले अभि आया. मी पटकन मोटरसायकलवरून खार वरून त्यांच्या घरी कालीना ला (santacruz east ) पोहोचलो. प्रथम भेटीतच मला त्यांच्यावर कॉन्फिडन्स आला. मी म्हटले कि मला ऑगस्ट१७ च्या राखी पौर्णिमेला जायचे आहे. जोशी म्हणाले कि ऑगस्ट पेक्षा सप्टेम्बर मध्ये जा कारण ते स्वतः पण जाणार आहेत तसेच सप्टेम्बर मध्ये वातावरण relatively चांगले असते. आत्ता  ते जून २०१७च्या पौर्णिमेला जाणार आहेत. आजपर्यंत त्यांच्या ४८ कैलास यात्रा झाल्या आहेत. मी म्हटले कि done आपण सप्टेंबर च्या पौर्णिमेला जाऊ. मी म्हटले किती खर्च येईल ते म्हटले कि ex lucknow १,५५,०००/- मी लगेच त्यांना १,५६,०००/- दिले. (numerology प्रमाणे ३ हा माझा लकी नंबर आहे हे मला आत्ताच कोणीतरी सांगितले होते त्यामुळे १००० रु. एक्सट्रा दिले ). त्यांना पण आश्चर्य वाटले कि मी फक्त अर्धा तासाच्या भेटीत पूर्ण पैसे देऊन मोकळा झालो. पासपोर्ट ची xerox  दिली एक फोटो दिला. एक पर्सनल माहिती फॉर्म भरून दिला. ते म्हटले कि ३ सप्टेंबर ला दुपारी एक च्या आधी लखनौ  एअरपोर्ट ला पोहोचायचे आहे . आपण लखनौ एअरपोर्ट वरून साधारण एक वाजता निघू. पुन्हा ३ तारीख लकी , मी म्हटले कि हा एक चांगला संकेत आहे.

जुलै महिन्यात यात्रेची खरेदी करायचे ठरवले. माझी बायको म्हणाली कि घाटकोपर येथील decathlon या दुकानात जाऊया तिथे सर्व काही मिळेल. मग मी मुलगा आणि बायको आम्ही Decathlon , घाटकोपर येथे गेलो. तिथे ट्रेकिंग shoes , गरम कपडे, ग्लोव्हस , टॉवेल खूप चांगल्या किमतीत मिळाले.

मी खरेदी केली त्यात Asics चे स्पोर्ट्स shoes पण घेतले. संपूर्ण खरेदी मी पूर्ण केली. मला १२ नंबर चे ट्रेकिंग shoes सहज मिळाले. decathlon मध्ये जाऊन सांगितले कि ते कैलास ची खरेदी करून देतात. एकंदरीत मी तीन महिने आधीच पूर्ण खरेदी करून मोकळा झालो.



Decathlon Shopping list for kailasyatra
Shoes and sandals
1)      Forclaz 100 high ndy trekking shoes waterproff : Rs. 3999/-
2)      Asics gel pulse 8 running shoes : Rs. 7000/- (from ASICS shop)
3)      Arpenaz sandal 100 black : Rs. 1699/-
Socks
1)      Forclaz 500 highlight grey blue (2 pairs) : Rs. 699 each
2)      Asics sports socks : Rs. 400 each (from Asics shop)
3)      Woolan socks Aprpanez 2 pairs : Rs. 599 each
Trousers
1)      Pant forklaz (100) grey (adjustable): Rs. 1699
2)      Pant Arpenaz 50 (Beige) : Rs. 599
3)      Pant forclaz 50 light grey : Rs. 999.
4)      Fleece tight forclaz 50 black x 2 pieces : Rs. 599 each.
5)      Capri Arpenaz 100 biege : Rs. 899
6)      Microfiber Towel : Rs. 399
Rainwear
1)      Jacket rain : 799
2)      Trouser rain : Rs. 699
1)      UV protection Hat : Rs. 899
2)      Gloves forclaz 100 black : Rs. 399
Jackets

1)      Fleece forclaz 200 black jacket : Rs. 1099
2)       Arpanez 200 man jacket : Rs. 1299
Also buy thermal full sleeves T shirt 2 sets
स्विमिन्ग ट्रंक

1)      Thermals 2 sets
2)      Monkey cap : Rs. 199
३) Waterproff digital watch (Rs.1500 from Titan shop)
४) थर्मास गरम पाण्याकरिता
५) Mobile powerbank
६) टॉर्च
७) टॉवेल 
आत्ता म्हटले कि येत्या तीन महिन्यात चांगला फिटनेस करूया. सकाळी रोज  ४० सूर्यनमस्कार चालूच होते. प्राणायाम , कपालभाती, उज्जायी प्राणायाम चालू होता. पण चालणे काही नियमित होत नव्हते. त्यातच २०१७ मध्ये पाऊस जोरदार असल्यामुळे जास्त चालणे झालेच नाही. वजन ९४ किलो होते ते देखील कमी करणे महत्वाचे होते. त्यात पाठदुखी चालू झाली , त्यामुळे जास्त चालणे शक्य होत नव्हते. माझा मित्र व फिटनेस ट्रेनर श्री राहुल पाटील यांनी सांगितले कि ताबडतोब physiotherapy चालू कर व मला खार येथील २०८ optimal movement हे चांगले आहे व तिथे तू जा. मी ताबडतोब तिथे गेलो आणि physiotherapy चालू केली. महिन्याभरातच माझी पाठदुखी दूर झाली. चला एक प्रॉब्लेम सुटला.  एवढे करून देखील मला खूप दम लागत होता म्हणून ऑगस्ट च्या  आठवड्यात वजन केले तर वजन १०० किलो. मला धक्काच बसला. मी physiotherapy, सूर्यनमस्कार , प्राणायाम आणि सकाळी व संध्याकाळी मिळून २ तास चालणे एवढे करून माझे वजन वाढले होते. बायको ने ताबडतोब सर्व ब्लड टेस्ट करून घेतल्या त्यात थायरॉईड function बरोबर नव्हते. TSH ची value वाढली होती. अजून एका डॉक्टर ने सांगितल्याप्रमाणे brain - pitutory ग्लॅन्ड ची MRI केली ती मात्र नॉर्मल आली. डॉक्टर ने सांगितले कि थायरॉईड ग्लॅन्ड वाढली असून ताबडतोब operation करावे लागेल नाहीतर वजन वाढतच जाईल. मी म्हटले कि काय करायचे ते कैलासवरून आल्यावरच करू. आत्ता यात्रा एक महिनासुद्धा नाही. मिशन कैलास हेच ठरवले. परिक्रमा करायची असेल तर वजन कमी पाहिजे हे नक्की. त्यामुळे टेन्शन आले. पण असो.

जाण्याच्या दोन आठवड्या आधी तुफान पाऊस होता त्यामुळे चालणे झालेच नाही. म्हणजे अजूनच कठीण परिस्थिती . पण मनाने मी खूपच स्ट्रॉंग होतो मला निश्चितच माहित होते कि मी हि यात्रा पूर्ण करणार.

असो मी कैलास ला जाणार म्हटल्याबरोबर माझे मित्र परिवार व ओळखीचे लोक खूप खुश होते. अनेक जण  म्हटले कि तू जाऊन ये मग पुढच्या वर्षी आम्ही जाऊ. एकदा माझ्या मुलाला मी शाळेतून आणण्यासाठी गेलो असता त्याच्या क्लास टीचर ने मला कैलास यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या , मी चक्रावलोच कि हिला कसे कळले. ती म्हणाली कि आर्यन ने सगळ्या वर्गात व सगळ्या टीचर्स ना सांगितले आहे कि त्याचे वडील कैलास यात्रेला जाणार आहेत. आर्यन त्याच्या बुद्धीप्रमाणे (तो चौथी मध्ये आहे ) google वरून माहिती काढत होता , विडिओ बघत होता आणि मला प्रश्न विचारात होता. एकंदरीत वातावरण कैलासमय झाले होते. माझे मित्र श्री पंकज आणि विशाखा वाहिनी याना तर माझे फारच कौतुक , ते नियमित माझ्याशी या विषयावर बोलत. सौ रश्मी विवेक पंडित , माझी मानलेली बहीण हिला तर पूर्ण आत्मविश्वास होता कि मी विनासायास हि यात्रा पूर्ण करणार.  आमच्या सर्व यात्रेकरूंचा  whatsapp ग्रुप होता. मी तर नामराज सोडून कोणालाच ओळखत नव्हतो. आमच्या बरोबर एक डेप्युटी कलेक्टर मॅडम आई वडिलांसोबत येणार आहे असे कळले.  असो. ऑगस्टमध्ये सर्व जणांची एक मीटिंग झाली पण मी त्याला उपस्थित राहू शकलो नाही. त्यामुळे कोणाचीच ओळख झाली नाही,.

मी साधारण एक आठवडा आधी चिनी युआन खरेदी केले (भारतीय १० रुपये = १ युवान ) . बजाज allaiance कंपनी कडून ओव्हरसीस ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला. पण तुम्ही युनाइटेड इंडिया assurance चा कैलास यात्रेसाठी असलेला इन्शुरन्स घ्या. मला हे उशिरा कळले. मी वोडाफोन इंटरनॅशनल रोमिंग केले १० दिवस इनकमिंग फ्री  (चीन व नेपाळ ) ३५०० रुपये व आउटगोइंग ला १ रुपये मिनिटे हि स्कीम घेतली. म्हणजे घराचे लोकांशी बोलता येईल.

श्री. नामराज जोशी यांनी एक मोठी duffle बॅग व एक बॅगपॅक दिली व मी एक बॅग घेतली. या प्रमाणे माझ्याकडे २ checkin बॅग व एक बॅगपॅक होती. कैलास यात्रेसाठी मी xiomi चा Redmi note ४ हा ४००० mah बॅटरी चा फोन घेतला. MI ची २०००० mah ची powerbank घेतली. एकंदरीत सर्व खरेदी झाली. आईने गूळ पोळ्या बनवल्या , बायकोने तिखट पुऱ्या बनवल्या. मी तिबेटमध्ये वाटण्यासाठी १०० poppins च्या गोळ्याचे पाकिटे घेतली. एकंदरीत ऑल सेट टू  गो.

साधारणपणे जून मध्ये मी विमानाची तिकीट काढली. मुंबई लखनौ ३ सप्टेंबर १०. ५० सकाळी reaching लखनौ दुपारी १ व ११ सप्टेंबर लखनौ मुंबई ५. ४५ pm अशी विमानाची तिकीट काढली. लवकर काढल्यामुळे फक्त ६५०० मध्ये रिटर्न तिकीट मिळाले (GO AIR ).  ३ सप्टेंबर ला दुपारी एक वाजता लखनौ एअरपोर्ट वरून निघायचे असे ठरले होते.  मला बायको ने pulse oxymeter दिले होते त्यामुळे मी नियमित ऑक्सिजन तपासणी करणार होतो.
  आमचा Schedule पुढीलप्रमाणे

3rd Sept - Day 1 Arrive in Lucknow and then drive to Nepalgunj

4th Sept - Day 2: Morning fly to Simikot Stay at Simikot or if possible take a chopper, fly to Hilsa, cross border and then stay at Taklakot
5th Sept - Day 3: Day rest at Taklakot. 6th Sept - Day 4: Drive to Manasarovar
9th Sept - Day 7: Trek to Darchen and drive to Taklakot.
7th Sept - Day 5: After Holy Bath and Pooja drive to Yamdwar and then trek to Dirapuk. 8th Sept - Day 6: Trek to Zuthulpuk
10th Sept - Day 8: Fly from Hilsa to Simikot by helicopter, fly to Nepalgunj . O/N stay.
11th Sept - Day 9: Drive to Lucknow.





INCLUSIONS:

Stay on twin sharing basis in Nepalgunj

*Nepalganj-Simikot-Nepalganj by fixed winged aircraft.
*Simikot-Hilsa-Simikot by helicopter
*Guesthouse accommodation in Tibet
*Tibet group visa and travel/trekking permits
*English speaking Tibetan guide
*All meals in Tibet (breakfast, lunch & dinner) *Transportation in Tibet
*Yaks & Yak men during the Parikrama around Mt. Kailash
*Nepalese support staff including cook and Sherpas *Gamow bag (pressure bag) and oxygen for emergency use *Medical kit bag

*Restricted area permit & royalties of Humla Region Porterage in Hilsa
EXCLUSIONS:

-Hiring of horse during the Parikrama
-A visit to Khojarnath temple
-Rescue and evacuation service
-Travel insurance -Personal expenses
-Any additional cost due to natural calamity and -unforeseen circumstances
-Tips for guide & driver
- GST if applicable.
-Anything not mentioned in the INCLUSIONS
IMPORTANT: This tour would be of 8 days duration of the yatris wishes to opt for ex Lucknow.This Yatra could be shortened by a day or two if the Kailash Parikrama is not undertaken. Uncertain weather conditions could sometimes prolong the Yatra or there are rare chances of tour cancellation due to strong winds. But ultimately we are all dependent on Bhole Baba to see us through.



३ सप्टेंबर २०१७ (oxygen ९६ , pulse ७४ )

सकाळी नास्ता करून घरून निघालो. मन प्रसन्न होते. मी ९. ३० वाजता मुंबई एअरपोर्ट ला पोहोचलो. त्यानंतर नामराज जोशी व प्रफुल भाई आले.
मुंबई एअरपोर्ट वरून लखनौ ला इंडिगो एअर ने प्रयाण 
आम्ही एकाच विमानात होतो. विमान वेळेत सुटले व वेळेत पोहोचले. तिथे विमानतळावर पुण्याची ठकार फॅमिली , बंगलोर चे सूर्या व शशांक असे दहा जण  भेटलो. काही जण ट्रेन ने २ तारखेला आले होते त्याना लखनौ   एअरपोर्ट जवळील हॉटेल CROSSROAD वरून pickup केले. असे आम्ही २३ जण  मिनी बस ने नेपाळगंज च्या दिशेने निघालो. नेपाळगंज हे नेपाळमध्ये असून लखनौ पासून अंदाजे ५ तास प्रवास आहे. वाटेत एका धाब्यावर छान जेवण केले.

लखनौ वरून नेपाळगंज ला जाताना एका धाब्यावर जेवलो 


मग आम्ही भारत नेपाळ बॉर्डर क्रॉस केली. तिथे तपासणी  झाली,  अर्धा तासात आम्ही सोपस्कार पूर्ण केले आणि boder नजीकच असलेल्या नेपाळगंज मधील हॉटेल स्नेहा या हॉटेल मध्ये पोहोचलो. सर्वाना रूम वाटप झाले . मी व नामराज जी एका रूम मध्ये होतो. रात्री आम्हला briefing  झाली त्यात कळले कि अजून वीजा  मिळाला नाहि त्यामुळे लवकरात लवकर म्हणजे ६ तारखेला आपण तिबेट मध्ये जाऊ  शकू.  आत्ता पौर्णिमा ७ तारखेला होती म्हणजे तो पर्यंत मानससरोवर ला जाणे अशक्य त्यामुळे सर्व प्लांनिंग पुढे गेले. आम्ही सगळे जण  नाराज झालो. पण नामराज ने सांगितले कि जो कुछ होता है भोलेबाबा कि मर्जी से होता है.  काठमांडू वरून येणारे ५-७जण उद्या येणार. हॉटेल ठीक होते पण बाहेर खूपच गरम होते. रात्री जेवण ठिक होते. रात्री १ वाजेपर्यंत मी आणि नामराज गप्पा मारत होतो.

४ सप्टेंबर १७ (oxygen ९५ , pulse ७२)

सवयी प्रमाणे सकाळी लवकर उठलो , व्यायाम , योग व meditation केले. आज काहीच काम नव्हते. तसेच ओळखीचेही कोणी नव्हते, त्यामुळे गप्पा मारण्याचा प्रश्न नव्हता. बाहेर खूप गरम होत असल्यामुळे रूम वर AC लावून बसणे  हा उद्योग. दुपारी पुन्हा एकत्र जेवलो. थोड्याफार गप्पा झाल्या.  एकंदरीत व्हिसा कधी मिळणार हा एकाच चर्चेचा विषय. प्रत्येकजण आडाखे बांधत होता. अजूनही काही जण आशेवर होते कि व्हिसा मिळेल आणि आपण पौर्णिमेला मानससरोवर ला पोहोचू.संध्याकाळी काठमांडूवरून ७ जण आले. आम्ही लगेचच नेपाळगंज मधील जागृत देवस्थान "बागेश्वरी  देवी " ला गेलो. तिथे हवन  पूजा केली. देवीला साकडे घातले कि यात्रा यशस्वी होऊ दे. अशी पौराणिक मान्यता आहे कि या ठिकाणी देवीची जीभ आहे व स्थानिक लोक याला शक्तीपीठ मानतात. रात्री हॉटेलवर येऊन जेवलो. रात्री नामराज जी ने सांगितले कि उद्या सकाळी आपल्याला ११ वाजता विमानाने सिमीकोट ला जायचे आहे. त्यामुळे आम्ही खुश झालो. सकाळी १०. वाजता सगळ्यांना तयार राहायला सांगितले. एका विमानात १८ जण या प्रमाणे २ फेरी कराव्या लागणार होत्या.  रात्री परत मी आणि नामराज जी गप्पा मारत होतो. त्यांचे अजुनपर्यंतचे अनुभव ऐकत झोपायला १. ३० वाजले.

५ सप्टेंबर १७ (oxygen ८१ , pulse ९९ सिमीकोट येथे  )

मी नेहमीप्रमाणे ५- ३० ला उठलो. व्यायाम , योग व meditation केले. सकाळी ८. १५ ला नास्ता करून रूम वर आलो. अचानक नामराज जी ना फोन आला कि विमान रेडी आहे ताबडतोब १८ जण  पाठवा. आज weather चांगले आहे. लगेच माणसांची जुळवाजुळव झाली . instruction प्रमाणे थोडे सामान व एक बॅग इथेच ठेवायची व परत येताना कलेक्ट करायची त्या गडबडीत मी गुळपोळी हॉटेलमध्येच विसरलो.  माझी तयारी झाली असल्यामुळे साहजिकच मी पहिल्या batch मध्ये गेलो. बस ने १५ मिनिटात नेपाळगंज एअरपोर्ट ला पोहोचलो.

नेपाळगंज एअर पोर्ट वरून सिमीकोट ला या छोट्या विमानाने  सिमीकोट ला प्रयाण 

एका checkin बॅग व एक बॅगपॅक घेऊन आम्ही विमानात चढलो. एका बाजूला ९ आणि एका बाजूला ९ असे १८ जन बसलो. आणि विमानाने टेकऑफ केले.
विमानातील फोटो १ x १ बसण्याची व्यवस्था 
 अतिशय सुंदर निसर्गसौन्दर्य बघत डोंगरावरून विमान जात होते. ४५ मिनिटांनी आम्ही सिमीकोट एअरपोर्ट ला पोहोचलो.  दोन डोगरांच्या मध्ये असलेले हे एक छोटेसे एअरपोर्ट. बाहेर कमालीची थंडी होती तसेच oxygen घेताना थोडासा त्रास होत होता. हातात असलेले स्वेटर आम्ही लगेचच घातले. १५ मिनिटे चालत एक खूप सुंदर रिसॉर्ट ला पोहोचलो.
सिमीकोट येथील सन वेली रिसॉर्ट , खूपच छान निसर्ग व राहण्याची व्यवस्था 
एका रूम मध्ये ६ जण. पुण्याचे ठकार फॅमिली चे ५ जण आणि मी एक असे आम्ही सहा जण एकत्र रूम मध्ये गेलो,. सुनंदा ठकार बरोबर माझी चांगली मैत्री जमली. शासनातून मोठ्या पदावर निवृत्त झालेल्या सुनंदाबाई खूप मनमोकळ्या होत्या. ठकार परिवारातील सर्वे जन ६० व अधिक वयाचे होते. पण खूप मजेत होते. उरलेले जण १२ वाजेपर्यंत आले. रिसॉर्ट च्या वायफाय चा आम्ही वापर करत होतो. आमच्या ग्रुप चे ३० व शिवम ग्रुप चे ३० असे ६० जण एकत्र होते आणि व्हिसा ची वाट बघत होते.

थंडी चांगलीच होती त्यामुळे गरम कपडे घातले होते. इथे गप्पागोष्टी चालू झाल्या दुपारी चांगले जेवलो. सगळ्यांची ओळख झाली. संध्याकाळी ४. ३० ला शिवमंदिर पर्यंत चालत गेलो.
रिसॉर्ट पासून रोज ४५ मिनिटे चालत शिवमंदिर पर्यंत जायचो. 

small trekk झाला. येऊन जाऊन ५. ५ किलोमीटर अंतर होते. आम्हाला वाटले कि जोरदार प्रॅक्टिस आहे.  नंतर कळले कि हे काहीच नाही. सिमीकोट हे ९४५० फूट उंचावर आहे. रात्री जेवल्यावर नामराज जी ने सांगितले कि आजपासून रोज अर्धी diomox ची गोळी सकाळी व संध्याकाळी घ्यायची. (या गोळीमुळे रक्त पातळ होते व कमी oxygen मुळे शाररिक त्रास होत नाही.)  मी रात्री अर्धी डिओमॉक्स घेतली आणि रात्रभर ७ वेळा urination ला गेलो. त्यामुळे झोपच आली नाही. रात्रभर जागरण झाले. सगळे जणच रात्रभर टॉयलेट चे राऊंड मारत होते. तसेच पाणी सतत पीत होतो त्यामुळे अजूनच प्रॉब्लेम. शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका असे instructions होते. आम्ही थर्मास मध्ये गरम पाणी भरून घेतले होते.


६ सप्टेंबर १७ (oxygen ८३ , pulse १०५ सिमीकोट येथे  )

रात्रभर झोप आली नाही त्यामुळे शेवटी सकाळी ६ वाजता उठलो. मस्त थंडी होती. छानपैकी समोर हिरवा डोंगर , निसर्ग  व एअरपोर्ट दिसत होता. धुके पण होते. मन प्रसन्न झाले. सकाळी समोर गार्डन मध्ये बसून मेडिटेशन केले. प्राणायाम केला खूप मज्जा आली, हळूहळू सगळे जण  उठले. गरम गरम चहा पिला. सर्वांचे मन प्रसन्न होते. आदित्य मिश्रा परिवार व प्रफुल नाईक पतिपत्नी यांच्याशी चांगले बॉण्डिंग झाले. आदित्य मिश्रा हे सेंट्रल exise मधील मोठे अधिकारी असून माझे मित्र शेखर केदारे चे ते बॉस होते. गंमत म्हणजे मी १९९५ ला श्रीवर्धन ला केदारेबरोबर राहिलो  होतो तेव्हा मिश्रा साहेबाना भेटलो होतो. त्यामुळे खूपच आनंद झाला. world is always small and you keep on meeting same people again and again. त्यामुळे माझे आणि मिश्रांचे चांगले बॉण्डिंग झाले. मोठे अधिकारी असूनदेखील अत्यंत down to earth आणि समजदार व्यक्तिमत्व व खूपच मिश्किल त्यामुळे खूप मजा येत होती. नास्ता करून आम्ही पुन्हा शिवमंदिर पर्यंत चालत गेलो व ५. ५ किलोमीटर पुन्हा हॉटेल मध्ये आलो.

सिमीकोट निसर्ग दर्शन 
व्हिसा नसल्यामुळे आत्ता पौर्णिमेला मानससरोवर ला जाणे शक्यच नव्हते. आमच्या बरोबर असलेला शिवम च ३० जणांचा ग्रुप आज हेलिकॉप्टर ने सिमीकोट पासून हिल्सा या नेपाळ चीन बॉर्डर वर गेले. म्हणजे आम्ही सिमीकोट व ते हिल्सा ला व्हिसा  ची वाट बघत थांबणार होतो. नामराज म्हटले कि व्हिसा येईपर्यंत इथून हालयाचे नाही.  होणारा एक्सट्रा खर्च मी म्हणजे करिन पण तुम्ही इथे आरामात राहा. दुपारी जेवल्यानंतर अशी खबर आली कि व्हिसा  मंजूर झाला असून. दिल्ली - काठमांडू-नेपाळगंज- सिमीकोट असा प्रवास करून हा व्हिसा  इथे येईल मगच आम्ही हिल्सा मार्गे तिबेट ला जाऊ शकू. परंतु त्याला अजून दिल्लीमध्ये व्हिसा  ची कॉपी आज रात्री जरी मिळाली तरी उद्या त्याचा प्रवास चालू म्हणजे लवकरात लवकर पर्वा म्हणजे ८ सप्टेंबर ला आम्हाला मिळेल. म्हणजे उशिरा का होईना आम्ही कैलास ला जाणार हे नक्की. पौर्णिमेच्या चंद्राला येथूनच नमस्कार केला. माझे वोडाफोन चे नेपाळ / चीन इनकमिंग फ्री रोमिंग चालू होते त्यामुळे मुंबई चे फोन चालू होते.  आज रात्री गाण्याच्या भेंड्या खेळलो खूप मज्जा  आली.

डिमॉक्स मुळे  रात्री ५-६ वेळा urination झाले त्यामुळे रात्री पुन्हा जागरण.

७ सप्टेंबर (oxygen ७५ , pulse ९५ सिमीकोट येथे  )

आज दिवसभर व्हिसा चे स्टेटस माहित करत होतो. संध्याकाळी कळले कि व्हिसा नेपाळगंजपर्यंत आला आहे व उद्या सकाळी पहिल्या विमानाने सिमीकोट ला येईल म्हणजे उद्या सकाळी आम्ही हिल्सा व तिथून बॉर्डर क्रॉस करून तिबेट ला तकालाकोट जाणार हे नक्की. आजही आम्ही सर्व जण  best of mood मध्ये होतो. आजही शिवमंदिर पर्यंत चालत गेलो. वाटेत एका शाळेत parent day च्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालू होती. प्रिन्सिपॉल ने आम्हाला डान्स करायला बोलावले. आम्ही त्या शाळेतल्या लहान मुलांबरोबर नाच केला खूप मज्जा आली.


सिमीकोट स्थानिक शाळेत मुलांबरोबर नाचलो , खूप मज्जा 
 diomox ने आज कमी त्रास दिला. जेवून आम्ही रात्री नाचलो , गाणी गायलो आणि उद्या सकाळी लवकर हेलिकॉप्टर चा प्रवास.

सिमीकोट हे डोंगरामध्ये वसलेले आहे. त्यामुळे येथील connectivity फक्त विमानानेच आहे.
आमच्या रेसॉर्टमधून एअर पोर्ट दिसायचे 
 हवा जोरात असेल किंवा धुके असेल तर विमाने उडत नाहीत व त्यामुळे नेपाळगंज सिमीकोट विमानवाहतूक बंद असते.  माणसे व सामान यांचे वाहतूक फक्त विमानानेच असते त्यामुळे येथील लोकांचे जीवन खूपच कष्टप्रद आहे. १० वि पर्यंत शाळा आहे. असो उद्या हेलिकॉप्टर ने हिल्सा ला जायचे व तिथून तिबेटमध्ये जायचे असे ठरलेच होते. मोबाइल मध्ये दलाई लामा तसेच चीन विरोधी फोटो आढळल्यास चीन बॉर्डरवरून परत पाठवतात असे सांगितले. त्यामुळे सर्वानी मोबाइलला मधील ते फोटोकाढून टाकावे असे instructions होते. काही जणांनी तर फेसबुक, whatsapp delete केले. मी फक्त मोबाइल चेक केला आणि शांत बसलो. 

त्यात संध्याकाळी एक दिल्लीचा ग्रुप कैलास यात्रेवरून परत आला. आम्हाला हॉटेलमध्ये भेटला. त्यांनी आम्हाला खूप घाबरवले. परिक्रमा करू नका खूप पाऊस व बर्फ पडतोय. श्वास घ्यायला त्रास होईल वगैरे वगैरे. यांनी परिक्रमा केली नाही. ह्या ग्रुप चा व्हिसा  असल्यामुळे ते पौर्णिमेला मानससरोवर ला होते. पण ढगाळ वातावरणामुळे त्यांना विशेष काही दिसले नाही. या ग्रुप मधील फक्त दोघांनी सांगितले कि बिनधास्त परिक्रमा करा काहीही होणार नाही. यावर आमच्या ग्रुप मध्ये खूप  चर्चा झाली. कारण आमच्या ग्रुप मध्ये तीस पैकी २० जण ६० पेक्षा जास्त वयाचे होते तसेच १८ महिला होत्या. जास्तीतजास्त ७१ व कमीतकमी २१ वय होते. म्हणजे आमची टीम खूपच विक होती. त्यात नामराज जी खूप पॉसिटीव्ह होते. त्यांनी पहिल्या दिवसापासून सांगितले होते कि मी सगळ्यांना परिक्रमा करावणार. आज पण ते बोलले कि आपण परिक्रमा करणार तुम्ही काळजी करू नका. दुसऱ्यांच्या कडे लक्ष देऊ नका.भोलेनाथ वर  विश्वास ठेवा.  त्यात गंमत म्हणजे त्या ग्रुप मधील काही जणांनी आम्हाला परिक्रमेला चालायचे कसे ते गमतीशीर शिकवले. म्हणजे एक श्वास घ्यायचा मग एक पाऊल  टाकायचे मग पुन्हा एक श्वास घ्यायचा मग एक पाऊल टाकायचे असे केले तर श्वास लागत नाही. मी त्याची प्रॅक्टिस केली आणि कळले कि हा मूर्खपणा आहे. या  पद्धतीने परिक्रमा करायला महिना लागेल. पण माणूस टेन्शन मध्ये असला कि काहीही करतो व काहीही विश्वास ठेवतो हे खरे. 

मी तर परिक्रमेला पोर्टर घेऊन चालणार होतो. पण माझ्या परिचयाच्या रश्मी पुराणिक ज्या ABP maza मध्ये रिपोर्टर आहेत त्यांनी अनुभवाने सांगितले कि घोडा पण घ्या तुम्हाला mental support होईल तसेच दम लागला तर घोड्यावरून continue करता  येईल. मला ते पटले. तसे पण मी चालत परिक्रमा केली असा biodata मला बनवायचा नव्हता. आणि मी चालत परिक्रमा करू शकतो हे सिद्ध पण करायचे नव्हते आणि तसा  मोठेपणा पण नको होता. 

तीन दिवस कपडे बदलले नव्हते पण घाम येत नसल्यामुळे काही जाणवले नाही. विशेष म्हणजे कपडे होते पण नेपाळगंजला बागेत ठेवले होते. इथे सामानाचे restriction असल्यामुळे मोजकेच कपडे आणले होते. त्यामुळे वांदे  झाले. परिस्थिती प्रमाणे सर्व काही आपण adjust करतो हे मात्र खरे.  त्या तीन दिवसात एकदा अंघोळ केली. रिसॉर्ट मधील कॉमन बाथरूम मध्ये दोन नळ होते. एक प्रचंड थंड व एक कमी थंड. त्यामुळे एकदाच अंघोळ करता आली. आत्ता कैलासाला जायची ओढ लागली होती. गप्पा मारत मारत झोप कधी आली ते कळलेच नाही. उद्याचा मुक्काम तिबेटमध्ये ताकालाकोट येथील हॉटेलमध्ये मग तिथेच गरम पाण्याने अंघोळ करायची असे सांगितले. 

८ सप्टेंबर (oxygen ८५, pulse १०२ टाकालाकोट तिबेट येथे १४००० फूट   ) 

सकाळी सर्व जण  रेडी झाले व ८ वाजता आम्ही रिसॉर्ट वरून एअरपोर्ट ला १० मिनिटात चालत पोहोचलो. आज हेलिकॉप्टर प्रवास, माझा पहिलाच . एका हेलिकॉप्टर मध्ये ५ जण बसतात अशी २ प्रवासी  हेलिकॉप्टर होती.व एक फक्त आमचे सामान नेण्यासाठी.  त्यात एका प्रवासी हेलिकॉप्टर पायलट चा आज weekly off . त्यामुळे आज एका हेलिकॉप्टर चे ३० जणांसाठी ६ राऊंड होणार. हिल्सा ला पोहोचायला २० मिनिटे असे एका फेरीसाठी ५० ते ५५ मिनिटे लागणार. तसेच आमचा ग्रुप व्हिसा असल्यामुळे आम्हा ३० जणांना एकत्रच बॉर्डर क्रॉस क्रॉस करायची म्हणजे शेवटचे हेलिकॉप्टर येईपर्यंत सर्वाना थांबवेच लागणार. प्रत्येकाचे बॅगपॅकसकट वजन केले व ५ प्रवासी एका  लागले. जाणाऱ्या हेलिकॉप्टरला आम्ही सर्वे जन टाटा करत होतो. खूप मज्जा येत होती. दुसरे हेलिकॉप्टर सतत सामान घेऊन जात होते. माझा पहिलाच हेली प्रवास असल्यामुळे मी खुश होतो. मी, नामराज प्रकाश व इतर दोघे शेवटच्या फेरीत जाणार होते. माझे backpack शकत वजन १०५ किलो झाले. सर्वात शेवटी म्हणजे ३. ३० ला आम्ही हिल्सा ला पोहोचलो. 
सिमीकोट एअरपोर्ट वरून हिल्सा , चीन बॉर्डर ला हेलिकॉप्टर ने प्रयाण , सोबत नामराज  जोशी 

हेलिकॉप्टर मध्ये 

हिल्सा ला आलो. माझे वजन जास्त असल्यामुळे मी शेवटच्या फेरीत आलो. 
हेलिकॉप्टरमधून दिसणारा निसर्ग 
एका नदी किनारी हेलिपॅड होते. व तिथेच dormetory होती. आमचं बरोबरच शिवम चा ग्रुप तिथे २ रात्र  राहिला  होता. त्यामानाने आम्ही सुखात सिमीकोट ला दिवस काढले. असो  आम्ही नदीवरील पुलावरून पलीकडे गेलो. तिथे नेपाळ मिलिटरी ने आमचे इम्मीग्रेशन केले. मग आम्ही चिनी बस ने चीनचेकपोस्ट ला गेलो. पाच मिनिटे चा बस प्रवास होता. तिथे आमच्या सर्व बॅग ठेवल्या होत्या. चिनी सैनिकांनी आमच्या बॅग जुजबी चेक केल्या. मोबाइलला मधील फोटो बघितले. ५-१० मिनिट मधेच आम्हला सोडले. विशेष म्हणजे आज तिबेट मध्ये फक्त आम्ही ६० जण  परिक्रमेला आले होते. विशेष काहीच प्रॉब्लेम झाला नाही. (नंतर कळले कि दुसऱ्या ग्रुप च्या यात्रेकरू च्या मोबाइलला मध्ये दलाईलामा चा फोटो सापडला व त्याला ताबडतोब परत पाठवले. ) आम्ही पुन्हा बस मध्ये बसलो व टाकालाकोट च्या दिशेने निघालो. आत्ता आम्ही तिबेट मध्ये होतो. जवळजवळ २ तास बस प्रवास होता. रस्त्यामध्ये आम्हाला राक्षसताल लागले. 
राक्षसताल , येथे रावणाने तप केले होते , तिबेट

हे विस्तीर्ण खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. इथे रावणाने तपश्चर्या केली होती त्यामुळे इथे कोणीही स्नान करत नाही. या पाण्यात जीवन नाही. अत्यंत शांत व स्थिर पाणी आहे. आम्ही उतरून फोटो काढले. मला तरी हे सरोवर खूप आवडले. तिथून पुढे निघालो तर मानसरोवर . हे गोड्या पाण्याचे सरोवर. अत्यंत जवळ असून देखील कित्ती फरक होता. तिथून पुढे आम्हाला कैलासाचे दर्शन झाले. 


कैलास 
मी पाय लांब असल्यामुळे ड्राइवर च्या बाजूच्या सीट वर होतो त्यामुळे मी सर्वप्रथम कैलास\पहिला आणि ओरडलीच. सर्वजण खूप exited झाले. पटापट फोटो काढले. हाच कैलास नंतर ४ दिवस आमच्याबरोबर होता. वातावरण एकदम स्वच्छ होते. थंडी खूप होती. कमी oxygen जाणवत होता. कस्टम clearance झाले मग आम्ही हॉटेल एवरेस्ट मध्ये आलो. तिथे १० युआन ला walking stick घेतली. खूप छान quality व foldable.  खूप मोठे हॉटेल होते एका रूम मध्ये ३ जन. रात्री छान जेवलो. आमचे जेवण नेपाळी शेर्पा वेगळे बनवत  आणि आम्ही वेगळ्या ठिकाणी जेवायचो.  हॉटेलमध्ये गरम गरम पाण्याने अंघोळ केली. आता  गरम पाण्याने अंघोळ परिक्रमावरून परत इथे येऊ तेव्हाच. आज इथे accamalitize होणे महत्वाचे होते. उद्या सकाळी जर काही त्रास झाला नाही तर सगळे ठीक आहे असे समजायचे. आजपासून नामराज जी ने oxygen चेक करायला सुरुवात केली. diomox गोळी चालूच होती. हॉटेलमध्ये wifi होते त्यामुळे whatsapp वरून फोटो पाठवले. चीन मध्ये गुगल व फेसबुक वर बॅन आहे. माझा मोबाइलला चालू असल्यामुळे घरी फोन केले.  आमचे ग्रुप चे वरिष्ठ सदस्य श्री संत यांनी हट्ट केला कि ते परिक्रमा चालत करणार आहेत. मग त्यांना खूप समजावले कि घोडा घ्या . बऱ्याच वेळाने ते ऍग्री झाले. उद्या सकाळी अंघोळ करायची नव्हती. उद्या सकाळी भारतीय वेळेप्रमाणे ६. ३० ला निघायचे असे ठरले. चीन ची वेळ भारतापेक्षा ३ तास ३० मिनिटे पुढे होता. रात्री गप्पा मारत उशिरा झोपलो. भयंकर थंडी होती. इथे कोणालाच इंग्लिश हिंदी काळात नाही. त्यामुळे आनंदच होता. 


९ सप्टेंबर (oxygen ८१, pulse ९० टाकलाकोट तिबेट येथे १४००० फूट ) मानस सरोवर


सकाळी ५. ३० ला उठलो. रात्री झोप ठीक ठीक आली. कपडे बदलले , आत्ता ४ दिवस हेच कपडे.undergarment त्यावर २ जोडी थर्मल, त्यावर गरम T shirt , जाकीट व pant, ग्लोव्हस, मंकीकॅप , टोपी, तोंडाला यूव्ही सन क्रीम , गॉगल (निलेश गीते या माझ्या मित्राने अमेरिकेतून पाठवला ) , वूलन सॉक्स , त्यावर नॉर्मल सॉक्स, त्यावर ट्रेकिंग चे बूट , कमरेला पाउच (त्यात पल्स ऑक्सिमीटर , पासपोर्ट, मोबाईल , पॉवर बँक वगैरे ) व बॅगपॅक (त्यात rainwear , औषधे, सन क्रीम , खाऊ, थर्मास , पॉपीन्स च्या गोळ्या tissuepapers वगैरे ). मी मेडिटेशन, नास्ता केला. थंडी होती. सकाळी ९. ३० ला निघालो. तीन बस होत्या त्यात प्रत्येकी २० यात्री व स्टाफ होता. आज तिबेट मध्ये आम्ही ६० यात्री होतो. अजिबात गर्दी नाही. आतुरतेने ड्राईव्ह करून एका ठिकाणी मानस सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या डॉर्मेटरी मध्ये आलो. तिथे dufflebags ठेवल्या व बॅगपॅक घेऊन पुन्हा बस ने निघालो. आज मानस सरोवर परिक्रमा , स्नान व मानस सरोवर किनारी रात्री मुक्काम. असा कार्यक्रम आहे. बस ने परिक्रमा करताना रास्ता ठीकठाक होता. साधारणपणे १ तासाने आम्ही स्नान करायला थांबलो.
मानस सरोवर मध्ये स्नान , प्रचंड थंडी आणि खूप आनंद 
 महिलांना कपडे बदलायला एक तंबू उभारला होता. एकंदरीत आम्ही सर्व जण स्त्री पुरुष भेदभावाच्या पलीकडे गेलो होतो.  मी स्विमिन्ग ट्रंक घातली आणि बस मधून बाहेर आलो. मरणाची थंडी वाजत होती व प्रखर ऊन होते. अंग गारठले होते. हळूच मानस सरोवर मध्ये पाय टाकला आणि बर्फाहुन अधिक थंड पाणी. माझी पुढे जाण्याची हिंम्मत होई ना. इतर यात्री मात्र भराभर आत गेले. काहींनी १०-२० डुबक्या मारल्या . मी मात्र मांडी  एवढ्या पाण्यात गेलो आणि उभाच राहिलो. अजून पाण्यात जाण्याची हिम्मतच झाली नाही, खाली दगडगोटे गुळगुळीत होते त्यावर बॅलन्स करणे कठीण जात होते. शेवटी नशिबाने मदत केली. माझा पाय घसरला आणि मी पाण्यात पडलो. नाकात , तोंडात , कानात पाणी गेले. उभा राहिलो, नमस्कार केला  पूर्ण पाण्यात गेल्यामुळे थोडी हिम्मत झाली . मग पटापट ३ डुबक्या मारल्या . पुढे हिम्मत झाली नाही. ज्यांनी कोणी मानस सरोवर मधील दगड आणायला सांगितले होते त्यांच्यासाठी दगडगोटे घेतले. व तोल सांभाळत बाहेर आलो. प्रखर ऊन आणि प्रचंड थंडी त्यामुळे अंग पुसणे , कपडे घालणे पर्यंतचा वेळ खूपच अवघड होता. कपडे घातल्यावर थोडा हुरूप आला. पुन्हा मानस सरोवराच्या किनाऱ्यावर बसून २-३ मिनिटे मेडिटेशन केले.
मानस सरोवर किनारी थोडे ध्यान केले 
 गरम पाणी पिलो. भूक नव्हती पण तिथेच थोडे जेवलो. पुन्हा मानस ची प्रदक्षिणा चालू. व संपूर्ण प्रदक्षिणेला अडीच तास लागले.  बस परत डॉर्मेटरी ला आली,. 
मानस सरोवर च्या काठावर आमी राहीलो  ती डॉर्मेटरी 

एका खोलीत ६ जण मी व ठकार परिवाराचे ५ जण. व टॉयलेट बाहेर उघड्यावर . आल्यावर तिथे एका पुजाऱ्याने हवन केले. मला इंटरेस्ट नव्हता पण सर्वाबरोबर मी गेलो. या डॉर्मेटरी च्या समोर मानस सरोवर अँड एका बाजूला कैलास दिसत होता. मी लगेच रूम मध्ये जाऊन दत्तावधूत रचित दुर्गा सप्तशती वाचली. खूप समाधान लाभले. मानस सरोवरासमोर दत्तावधूत रचित दुर्गा सप्तशती व कैलास समोर धनकवडीच्या श्रीशंकर महाराजांची शंकरगीता वाचणे आणि परिक्रमा पूर्ण करणे या एवढ्याच इचछा होत्या. सर्वांची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती. ६० च्या खाली गेली तर प्रॉब्लेम. पण निदान आजतरी ओके. नामराज जी सगळ्यांच्या ओक्सिजन लेवल व तब्येतीकडे बारीक लक्ष ठेवून होते. मरणाची थंडी वाजत होती.  आकाश स्वच्छ होते. आज माझा मित्र गणेश सामंत याचा वाढदिवस , त्याला कॉल केला. मी मानससरोवर ला आहे व लक्षात ठेवून मी कॉल केला याचा त्याला आनंद झाला. रात्री जेमतेम जेवलो. जेवताना चुकून एक भजी खाल्ली ती पूर्ण तेलाने भरलेली होती. आत्ता त्रास होणार हे नक्की, आधीच थोडाफार ऍसिडिटी चा त्रास होत होता. उद्या सकाळीच परिक्रमेला निघायचे होते. म्हणजे फिटनेस चांगला पाहिजे. तसेच रात्री ३ ते ४ दरम्यान (IST )ला आकाशातून तारे स्नान करायला येतात हे पाहण्यासाठी जागायचे होते. खोलीत एकाला एक जवळ जवळ ६ बेड होते त्यात मी adjust करून आडवा झालो. बाहेर मानससरोवर व कैलास चे दर्शन होत होते. तरी एका प्रकारची नीरव किंवा खूपच divine शांतता होती. म्हणजे तुम्हाला मनातून आनंद व समाधान लाभते. (you are at your inner peace ). मी काय म्हणतोय याचा अर्थ तुम्हाला कैलास ला गेलात कि कळेल. (very difficult to describe ). असो मला ऍसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे मला झोप येत नव्हती. साधारणपणे रात्री १ वाजता मी उठलो. टॉर्च घेतली व बाहेर गेलो. मला जोरात २-३ उलट्या झाल्या. अचानक झालेल्या उलट्यामुळे मी थोडा घाबरलो. माझा आवाज ऐकून शेजारच्या खोलीतून शशांक बाहेर आला. त्याने मला पाणी प्यायला दिले. मग आम्ही पहाटे ४-५ वाजेपर्यंत गप्पा मारत जागे होते. ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला समोर तारा स्नान दिसले नाही. असो मी शशांक ला सांगितले कि झालेला प्रकार कोणाला सांगू नको. मी ठरवले कि जर सकाळी तब्येत ठीक असेल तरच परिक्रमा करायची नाहीतर नाही. उगाच माझ्यामुळे कोणाला त्रास नको. मनात प्रार्थना केली आणि सकाळी ५ वाजता आडवा झालो. 

१० सप्टेंबर (oxygen ८०, pulse ९० ) मानस सरोवर/ दारचेन , परिक्रमेचा पहिला दिवस 

सकाळी ६ वाजता उठलो. खरे म्हणजे रात्री झोपलोच नाही. पण पाठ टेकवल्यामुळे जरा आराम वाटला. सकाळी थोडा अशक्तपणा होता पण mind फ्रेश होते. म्हणजे परिक्रमा करणार हे जाणवले. तसेच घोडा केल्यामुळे मी रिलॅक्स होतो. सकाळी थोडा चहा व नास्ता केला. भूक लागताच नव्हती. थर्मास मध्ये गरम पाणी भरून घेतले. प्लास्टिक बाटलीत पण गरम पाणी भरले व ती बाटली अंगावरच्या थर्मल जाकीट मध्ये ठेवली. पुन्हा बस ने अर्धा तास प्रवास करून आम्ही दारचेन ला पोहोचलो.
परिक्रमा सुरु करताना आसा कैलास दिसतो. नशिबाने आकाश स्वच्छ आहे 

हा कैलास परिक्रमेचा स्टार्टींग पॉईंट.  इथे यमद्वार आहे.
यमद्वार , कैलास परिक्रमा सुरुवात , दार्चेन 
यातून गेल्यावर जन्म मरणाचा फेरा चुकतो असे म्हणतात. मला काही हे पटले नाही पण मी सर्वाबरोबर त्यातून गेलो. माझे मिशन फक्त कैलास होते. आमच्यातले ३० पैकी ४-५ जण परिक्रमा करणार नव्हते ते दार्चेन मध्ये हॉटेल मध्ये थांबले. बाकीपैकी ५ जन चालत करणार होते. मी घोडा आणि पोर्टर घेतला होता (२७५० युआन ) . यात एक घोडा , घोडेवाला आणि एक पोर्टर . पोर्टर घेणे खूप महत्वाचे एक म्हणजे तो आपली बॅकपॅक उचलतो. त्याशिवाय आपल्याला तो एक मेंटल सपोर्ट असतो. वाटेत काही झाले तर तो आपल्याला मदत करू शकतो. याना तिबेटींशिवाय कोणतीच भाषा येत नाही. त्यामुळे संवाद हातवारे करून व इशाऱ्याने करावे लागते. बहुतेक वेळा त्यांना काही कळतच नाही.  यांची युनिअन आहे व आम्ही त्या युनिअनतर्फे घोडा व पोर्टर घेतला . त्यामुळे पुढील ३ दिवस ते आपल्याबरोबर राहतील याची जबाबदारी युनिअन ची. असो , मी सर्वेप्रथम घोडा , घोडेवाला व पोर्टर च्या पाया  पडलो. त्यांच्या भरवश्यावर आत्ता मी तीन दिवस होतो.
माझा घोडा व  घोडेवाला 



घोड्याची मनोमन मी माफी मागितली. (१०० किलो माझे वजन म्हणून ). परिक्रमा अंदाजे दुपारी २ वाजता चालू केली.आजचा दिवस कैलासाच्या बाजूने , रास्ता सरळ होता. श्वास घेण्यासाठी थोडा त्रास होता. थंडी तर बोचणारी होती व तीव्र सूर्यप्रकाश होता. घोड्यावर कसाबसा बसलो. संपूर्ण शरीर झकाल्यामुळे शरीर गरम होते. हातात ग्लोव्हस असल्यामुळे फोटो काढायला ग्लोव्हस काढावे लागत होते. ते त्रासदायक होते तरीपण मी काही फोटो काढाले. सर्वेकाही डोळ्यात साठवत होतो.  बाटलीमध्ये इलेकट्रोल पावडर टाकून सतत पाणी पीत होतो. संपूर्ण प्रदक्षिणेमध्येकैलास उजव्या बाजूला होता. रास्ता कच्चा होता पण घोडा व्यवस्थित चालत होता. साष्टांग दंडवत घालत व "ओम मणी पद्मे हुम"  ता तिबेटी मंत्र म्हणत परिक्रमा करणारे तिबेटी लोक होते.
साष्टांग दंडवत घालत प्रदक्षिणा करणारे स्थानिक बॉन धर्मीय लोक 
आम्हाला फूड पॅकेट दिले होते.. त्यात ४-५ घोट फ्रुट ड्रिंक व अर्धे सँडविच व अर्धे सफरचंद खाल्ले. जवळ जवळ ३ तासात आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी डेरापुक ला आलो. कमी ओक्सिजन जाणवत होते.  या ठिकाणी पण एक डॉर्मेटरी व त्यात पुन्हा ठकार फॅमिली चे ५ व मी एक असे सहा जण . या डॉर्मेटरी पासून कैलास ७५० मीटर वर असेल. मी व पूर्णिमा भाभी एकत्रच पोहोचलो. संत साहेब म्हणाले कि त्यांना चालत जमले नसते. मी रूम मध्ये गेल्यागेल्या शंकरगीता वाचायला घेतली. अंदाजे ९० मिनिटे लागली. आज आम्हाला गरमागरम सूप दिले. मी सूप कधीच पित नाही पण त्यादिवशी पिलो. तरतरी आली.  रात्री गरमागरम डाळभात ४-५ घास खाल्ला. गरम पाणी पिले व रात्रीसाठी थर्मासमध्ये साठवून घेतले. . इथे भूकच लागत नाही. डिओमॉक्स चि गोळी चालूच होती.

आम्हाला सूचना दिल्या कि उद्याचा दिवस खूप कठीण आहे. डोंगर घोड्यावरून चढायचा आहे (१२ किमी ) व डोलमा पास ला  (१८५०० फूट ) घोड्यावरून उतरायचे व चालत उतरायचे. (६ किमी ) . उतरायचे फारच कठीण आहे. तसेच ऑक्सिजन लेवल खूप कमी असतो.त्यामुळे तिथून लगेचच खाली उतरायचे. थांबायचे नाही. ऑक्सिजन कमी पडला तर तब्येत बिघडू शकते. प्रसंगी मृत्यू पण होतात हो गोष्ट सगळ्यांनी डोक्यात फिट केली. आम्ही सगळे जण खूपच exited होतो. सकाळी लवकर उठणार होतो.रात्री सर्वांचे ऑक्सिजन मोजले. माझे ऑक्सिजन  रात्री ७२ व पल्स  ११२ होती. ऑक्सिजन ६० च्या खाली गेला तर ऑक्सिजन सिलेंडर लावायला लागणार होता. आम्ही सगळे जण खूपच पॉसिटीव्ह होतो. आदित्य मिश्राजी  आमच्या सर्वांचे मनोबल वाढवत होते. त्या डॉर्मेटरी च्या कॉट मध्ये कोंबून झोपलो. झोपताना देखील वूलन सॉक्स , मंकी कॅप व ग्लोव्हस घालून झोपलो एवढी थंडी होती. उद्याची आतुरतेने वाट बघत होतो. . घरी फोन केले. मोबाइलला नेटवर्क उत्तम होते. पण आज कैलासाच्या पायथ्याशी झोपायला मिळाले याचे समाधान. खरे म्हणजे झोप आलीच नाही. माझी उंची व कॉट ची लांबी हे गणित कधीच जमले नाही. त्यामुळे घर सोडून सर्वत्र मला कॉट छोट्याच वाटतात. असो उद्याची परिक्रमा सर्वांची सुखरूप पार पडो अशी मनोमन प्रार्थना केली व आडवा झालो. 

११ सप्टेंबर (oxygen ६७, pulse ९९ ) डेरापुक  , परिक्रमेचा दुसरा दिवस
सकाळी सूर्योदय आधी उठलो. प्रातर्विधी बाहेर थंडीत उघड्यावर पण आडोशाला जाऊन . नामराज जी नि सगळ्यांचे ऑक्सिजन चेक केले. पहाटेचा कैलास अत्यंत जवळून बघितला.



कैलासाच्या अत्यंत जवळ असलेल्या डॉर्मेटरी मधून असा कैलास दिसतो, डेरापुक 
जसजसा सूर्योदय झाला तसे सूर्यकिरणे कैलासावर पडून कैलास पूर्ण सोनेरी रंगाचा झाला. हे दृश्य आम्ही बघितले.

 आज आकाश स्वच्छ होते.   सगळे जण परिक्रमेला निघाले. एक एक घोडेवाला येऊन यात्री ला घेऊन जात होता. नामराज सगळ्यात शेवटी होते. प्रकाश,  निमा सगळ्यांची काळजी घेत होते. आमच्या ग्रुप च्या शेर्पा कडे ४-५ walkietalkie होत्या. सकाळी गरमगरम उपमा खाल्ला भूक अजिबातच नव्हती. गरम पाणी पिले व भरून घेतले. त्यात इलेकट्रोल पावडर मिक्स केली. सूर्य आणि आम्ही एकत्रच निघालो. सर्वाना मी पोप्पीन्स च्या गोळ्या वाटल्या. मन भरून कैलास  पाहिला. वातावरण व आकाश निरभ्र होते. आमचे मिश्राजी सर्वांचे मनोधैर्य वाढवत होते. हा सेंट्रल एक्सईझ  पदावरील अधिकारी अत्यंत नम्र व मिश्किल. प्रकाश संत हे वयाने ज्येष्ठ पण खूप जॉली. त्यांच्या स्वच्छ स्वभावामुळे सर्वे जन त्यांना मानतात. प्रफुलभाई व अल्पा बेन ,  ठकार फॅमिली टिपिकल मराठी फॅमिली , मजेशीर.  प्रफुलभाई व अल्पा बेन हे खूप छान गुजराती कुटुंब. असे आम्ही सगळे जण निघालो . आज चढण तीव्र होती. त्यामुळे श्वास लागत होता. घोडा पण थांबत थांबत चालत होता. त्याची मला दया येत होती. पण काय करणार. सतत त्याची मनात माफी मागत होतो. आम्ही निघालो एकत्र पण पुढे मागे झालो. मी आणि पूर्णिमा भाभी आम्ही पुन्हा मागेपुढे होतो. एकंदरीत हसणारे सर्वे लोक दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरु झाल्यावर शांत झाले. कच्चा व अरुंद  रास्ता , तीव्र चढण  यामुळे वाट अवघड होती. उजव्या बाजूला नियमितपणे (अखंडपणे नाही ) कैलास चे दर्शन होत होते. साष्टांग दंडवत घालत व "ओम मणी पद्मे हुम"  ता तिबेटी मंत्र म्हणत परिक्रमा करणारे तिबेटी लोक होते. त्यांच्या श्रद्धेला सलाम. त्यांना बघत बघत आमचा घोडा पुढे चालत होता. संपूर्ण लक्ष श्वास घेणे व श्वास  यावर होते. एरवी सहजपणे घेतलेल्या श्वासाचे महत्व कित्ती आहे हे आपल्याला कैलासला कळते. थांबत थांबत मी व घोडा डोलमा पास ला पोहोचलो. (१८५०० फूट ).

डोल्मापास , खाली गौरीकुंड दिसतेय १८५०० फूट 

डोल्मापास , खाली गौरीकुंड दिसतेय इथे पार्वती स्नान करायला येते अशी धारणा आहे. 
तिथे घोड्यावरून उतरलो. उजव्या बाजूला खाली गौरी कुंड दिसत होते. पौराणिक इतिहास असलेल्या गौरी कुंड ला नकळत नमस्कार केला. बरं आत्ता  तो डोंगर उतरायचा तर रस्ताच  नाही. त्यात walking स्टिक पकडून , श्वास घेणे व श्वास सोडणे , याचा व्यायाम करत तीव्र उतारावरून तोल सांभाळत हळू हळू उतरायला लागलो. दम लागत होता. ऑक्सिजन म्हणजे O२ नसून त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही हे कळले. घशाला तीव्र कोरड पडत होती. इलेकट्रोल मिश्रित गरम पाणी पिल्यामुळे बरे वाटायचे. २-४ मिनिटे चाललो कि दम लागायचा मग मिनिटभर विश्रांती. असे करत करत उतरत होतो. नशिबाने साथ दिली कारण नेहमी डोलमा पास ला धुके , पाऊस किंवा बर्फवृष्टी होते. पण आज आकाश एक्दम स्वच्छ होते. चालताना थोडा गोठलेला बर्फाचा रास्ता लागल त्यावरून चाललो , मज्जा आली.
डोल्मापास वरून उतरताना लागलेला थोडा गोठलेला बर्फाचा रास्ता
 डोंगराच्या पायथ्याशी एक छोटे हॉटेल होते तिथे बसायला जागा मिळाली. फूड पॅकेट  मधील अर्धा सफरचंद ,अर्धा सँडविच व थोडा फ्रुट जूस पिलो ,भूक अजिबात नव्हती. खाऊन लगेच निघालो. घोडेवाला आला होता. घोड्यावरून पुन्हा २ तास प्रवास व मग आम्ही झुटूलपुक या ठिकाणी डॉर्मेटरी मध्ये आलो. एका रूम मध्ये ५  जण होते. मी संत व इतर ३ असे ५ जण आम्ही रूम मध्ये. आल्याआल्या आम्हाला गरम चहा मिळाला. 
परिक्रमा मार्गावर जागोजागो कचऱ्याचे डब्बे आहेत त्याचे कौतुक वाटले. संध्याकाळी घासभर जेवलो. भूक नव्हतीच.आत्ता  उद्याचा म्हणजे शेवटचा दिवस सरळ होता. उद्या परिक्रमा पूर्ण होणार याचा आनंद. एक एक जण येत होते. परिक्रमेचा दुसरा दिवस खूपच challenging होता व त्यातून आपण व्यवस्थित पार पडलो याचा आनंद.  घरी फोन केले , गप्पा मारत कॉट वर आडवा झालो. 

१२ सप्टेंबर (oxygen ७४, pulse ११0 )   , परिक्रमेचा तिसरा दिवस


झुटूलपुक येथील डॉर्मेटरी 
सूर्य व आम्ही एकत्रच बाहेर आलो. बाहेर कडाक्याची थंडी व बोचणारा वारा होता. गरम पाण्याने तोंड धुतले. गरम चहा व थोडा उपमा खाल्ला. प्रातर्विधी आडोशाला जाऊन केला. सकाळी सकाळीच सर्वांचे घोडेवाले व परटेर आले होते. मग आम्ही मार्गस्थ झालो. नेहमीप्रमाणे घोडेवाला , घोडा व पोर्टर ला नमस्कार केला. आज उरलेले सर्वे पोप्पीन्स च्या गोळ्या वाटल्या. जवळपास २ तासाने जिथून चालू केले त्या ठिकाणी आम्ही आलो. म्हणजे परिक्रमा पूर्ण केली.
परिक्रमा पूर्ण झाल्यावरच आनंद आणि फोटो 
 आज मात्र परिक्रमेमध्ये कैलास चे दर्शन झाले नाही. मी सर्वप्रथम नामराजजी ना मिठी मारली. सर्वत्र आनंद होता. आज रास्ता सरळ होता. एका ठिकाणी एक किमी अरुंद रस्ता व एका बाजूला दारी होती. तिथे घोड्यावरून उतरलो व चाललो. साधारणपणे १ तास थांबल्यावर आम्हाला घ्यायला बस आल्या. त्यात बसून आम्ही डेरापुक च्या हॉटेलला गेलो. तिथे परिक्रमा ना केलेले ४-५  जणांना तिथून घेतले. काही तिबेटी बायका तिथे सामान विक्री साठी आल्या होत्या. त्यान्च्याकडून विजय पाटील साठी स्फटिक माळ घेतली. बायकोसाठी कलर मणि चे माळ घेतली. काही कैलास चे लॉकेट घेतले. अंग दुखत होते पण मनात समाधान होते. पुन्हा बस प्रवास करून हॉटेल हिमालय मध्ये टाकालाकोट ला आलो. तिथे वायफाय मध्ये whatsapp मध्ये फोटो पाठवले. घरी फोन केले.उद्या परतीचा प्रवास , वाईट वाटले पण पर्यांय  नव्हता. आटा घराची आठवण येत होती. ४ दिवसांच्या गॅप नंतर गरम पाण्याने अंघोळ केली. कपडे बदलले. नवीन कपडे घातले त्यामुले सगळे जण  फ्रेश वाटत होते. संध्याकाळी लवकर जेवलो. सर्वानी पैसे काढले व आमच्या organising  टीम ला  टीप दिली (प्रत्येकी कमीतकमी १०० युआन ). काही जणांनी भाषण केले. आम्हाला जपून आणणाऱ्या नामराज  जोशी , निमा , प्रकाश व इतर सर्व स्टाफ चे आम्ही आभार मानले. यात्रेकरूंना कोणताही त्रास होऊ नये या साठी झटणारे हे सर्वे देवदूतच आहेत. (थॅंकलेस जॉब ) . डोलमा पास येथे एका यात्रेकरूंच्या ऑक्सिजन चा त्रास झाला तेव्हा पटकन walkietalkie वरून समन्वय करून त्यांना ऑक्सिजन सिलिंडर दिला तसेच त्या यात्रेकरूला चार शेर्पां  नि उचलून खाली आणले व ऍम्ब्युलन्स बोलावून पुढे हॉटेल मध्ये पाठवून दिले. हे मॅनॅजमेन्ट अफलातून होते. (या बद्दल अधिक लिहीत नाही )या खडतर प्रवासात पैशाला जास्त किंमत नाही. असो. रात्री लवकर झोपायला गेलो.

सहयात्री पद्मश्री मॅडम यांचे कौतुक वाटले कारण एक तर त्यांनी आपल्या आई वडील (७१ वर्षे ) , मावशी ला कैलास ला घेऊन आल्या. स्वतः चालत पूर्ण परिक्रमा केली. आई वडील व मावशी ने घोड्यावरून केली. त्यांचे वडील तर ७१ वर्षाचे पण मानसिक दृष्ट्या त्यांनी ठरवले आणि त्यांनी सहजच यात्रा व परिक्रमा पूर्ण केली.
कु. आस्था मिश्रा हि २१ वयाची सर्वात छोटी पण तिनेपण यात्रा व्यवस्थित पूर्ण केली. प्रकाश संत हे सिनियर सिटीझन पण खूप मस्तीखोर व निर्मल मनाचे त्यांच्याबरोबर खूप मज्जा आली.
आदित्य मिश्रा खूप बॅलन्स स्वभावाचे,  मिश्कीलपणा करत होते सर्वांचे मनोबल ते वाढवत होते.
प्रफुल व अल्पा नाईक हे गुजराती पण खूप मिक्स झाले व  खेळत होते.
सुनंदा ठाकर या शासनातील क्लास १ निवृत्त अधिकारी. माझी खूपच मैत्री  झाली.  
केशव ठाकर हे बँकांमधील निवृत्त अधिकारी. टिपिकल पुणेकर पण खूप छान व्यक्तिमत्व
नारवेलकर आजी या ६८ वर्षाच्या पण नियमित ट्रेकिंग ला जातात. मस्तीखोर यांनी पण यात्रा सहजच पूर्ण केली.या खुप छान शिंकायच्या. मला खूप हसायला यायचे.
शारदा  जोशी या अध्यात्मिक वारसा लाभलेल्या आजी. टिपिकल पुणेकर पण मनमिळावू.
सुरजीत  वळंजू  BMC Engineer . एक्दम जॉली व्यक्तिमत्व.
शशांक व सूर्य हे बंगलोरचे तरुण खूप छान मिक्स झाले. एकदम devoted .
पूर्णिमा पांडे या मुंबईच्या . खूप जॉली. संपूर्ण परिक्रमेमध्ये आम्ही दोघे पुढेमागे असायचो.
रहमीत यादवजी, हे महानगरपालिकेमधील शिक्षण खात्यातून वरिष्ठ पदावरून निवृत्त. जास्त ना बोलणारे पण मानाने खूप चांगले.
ज्याप्रमाणे नदीला पूर आला कि काही ओंडके ठराविक अंतर एकत्र वाहतात व नंतर पुन्हा वेगळ्या मार्गाने जातात, तसेच आम्ही सर्वेजन या यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलो व नंतर वेगळे झालो पण खूप गोड आठवणी मनात ठेवून. मी एकटा असूनदेखील सर्वानी ,मला जाणवू दिले नाही तसेच ग्रोउपमध्ये कोणतेही भांडण नाही. हे वैशिष्ठ्य 

१२ सप्टेंबर (oxygen ८८, pulse ९५ ) हॉटेल माऊंट हिमालय 

सकाळी उठून नास्ता करून बस मध्ये बसलो. सर्वप्रथम कस्टम immigration केले नंतर पुनः बस ने चीन नेपाळ बॉर्डर ला गेलो. रस्त्यामध्ये रक्षाठेल , मानसरोवर आणि कैलास चे दर्शन  झाले. ना जाणो या आधी कधी आलो होतो व पुन्हा कधी येणे होईल. बॉर्डर क्रोससिंग ला आमच्या गाड्या थांबल्या . १० मिनिट मध्ये आम्ही नेपाळ बॉर्डर ला गेलो, तिथे नेपाळ बॉर्डर करूस केली व हिल्सा हेलिपॅड ला पोहोचलो. आमच्या ग्रुप चे ३० व शिवम चे ३० असे ६० जण  . आत्ता पुन्हा ३ हेलिकॉप्टर व त्यातील १ फक्त सामान  नेण्यासाठी. प्रत्येक हेलि मध्ये ५ जन असे हिल्सा ते सिमीकोट प्रवास करू लागले. मी ,नामराज , निमा , प्रकाश शेवटच्या फेरी मध्ये आहेत असे नामराज जी ने घोषित केले. प्रत्येकी ४ फेऱ्या झाल्यावर एका हेलिकॉप्टर ने विश्रांती घेतली. मग एका हेली ने ५-५ जण करत मी शेवटी संध्याकाळी ४ वाजता सिमीकोट ला पोहोचलो. खराब हवामानामुळे सिमीकोट नेपाळगंज विमानसेवा बंद होती. फक्त सुरुवातीचे १० जण विमानाने नेपाळगंज ला पोहोचले त्यात ठकार परिवार व संत परिवार हे नेपाळगंज व तिथून लखनौ ला पोहोचले. त्यामुळे आमची त्यांची भेट झाली नाही याचे वाईट वाटले.  बाकी सर्वे जण सिमीकोट लाच राहिलो. रात्री ऑक्सिजन ९१ व पल्स १०१ होता. म्हणजे खूप नॉर्मल. रात्री जेवलो. घराची खूप आठवण येत होती. उद्या सकाळी १८ seater विमानाने नेपाळगंज ला जायचे.  लखनौ मुंबई तिकीट उद्याच बुक करणार असे ठरवले. 


१४ सप्टेंबर नेपाळगंज/लखनौ  
सकाळी ७. ला मी सिमीकोट वरून विमानाने निघालो व ८. १५ ला नेपाळगंज ला पोहोचलो. खूप गरम होत होते,. सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे जण नेपाळगंज ला आले. अंघोळ केली. जेवलो मग निघालो. सर्वेजन उद्याच जाणार होते त्यामुळे सावकाश निघाले. मी एकटाच असल्यामुळे घाई करून काहीच उपयोग नव्हता. ५ तास प्रवास केल्यावर संध्याकाळी ७. ला आम्ही लखनौ एअरपोर्ट जवळ हॉटेल क्रॉस रोड येथे आलो. प्रफुलभाई नि ऑनलाईन बुकिंग केले. खूप छान व स्वस्त हॉटेल होते. तिथेच जेवलो आज घरी बरेच फोन केले. माझे ११ तारखेचे रिटर्न टाके कॅन्सल करून नवीन तिकीट काढले . मुक्काम लांबल्यामुळे बायको, मुलगा , आई , वडील वाट बघत होते.  उद्या सकाळी ७. ४५ चे इंडिगो चे टिकट काढले म्हणजे उद्या जेवायला घरी. रात्री गप्पा मारत जेवलो आणि झोपलो विशेष काही नाही.  

१५ सप्टेंबर २०१७ लखनौ/ मुंबई 

सकाळी ६.३० ला एअरपोर्ट ला पोहोचलो. हॉटेल १. ५ किमी अंतरावर होते. चेकिन केले वजन ४ किलो जास्त होते त्यामुळे ३०० रुपये प्रति किलो ने १२०० रुपये भरले. मानस सरोवराचे पाणी tupperware च्या बाटलीत भरलेले होते व ते चेकिन बॅग मध्ये टाकले अजिबात गळाले नाही,.
लखनौ ते मुंबई इंडिगो विमानात , चेहेऱ्यावर आणि मनात खूप समाधान 
विमान वेळेत सुटले व वेळेत १०. ५ ला पोहोचले. माझ्या स्वागतासाठी पावसाने मुंबई मधील रस्ते स्वच्छ धुतले होते. साधारण ११ वाजता घरी पोहोचलो. खूप आनंद झाला . वाटेत फोन सतत चालू होते. घरी आल्याआल्या बायकोने सांगितले कि तू बारीक झाला आहेस. तिचा व अध्यात्माचा तास काहीच संबंध नसल्यामुळे परत कैलास ला जायचे नाही असा तिने सल्ला /इशारा दिला. असो दुपारी मुलाला आणायला शाळेत गेलो तो खूप खुश झाला आई वडील खुशीत होते. यापेक्षा अधिक काय हवे. निसर्गाने साथ दिली सर्वांच्या शुभेचछा कामाला आल्या. माझे गुरु पाठकगुरुजी यांची मला क्षणा क्षणाला आठवण आली. आज ते असते तर खूपच खुश झाले असते. खूप कठीण असणारी किंवा कठीण वाटणारी हि यात्रा माझी सहजपणे पूर्ण झाली असे म्हणण्यास हरकत नाही. माझ्या सर्व सहयात्रींचा मी खूप आभारी आहे कारण सर्वानीच मला सामावून घेतले व शेवटपर्यंत पॉसिटीव्हिटी कायम ठेवली. आमच्यात जास्त वरिष्ठ नागरिक जरी असले तरी ते मनाने माझ्यापेक्षा तरुण आहेत आणि मस्तीखोर सुद्धा .

वर्षाला जगभरातून जे १७००० ते १८००o जण कैलास यात्रा करतात  त्यापैकी मी २०१७ मध्ये एक भाग्यवान  ठरलो.  आमची यात्रा जर वेळेत सुरु झाली असती व वेळेत जर ठरल्याप्रमाणे आम्ही ५ सेप्टेंबरला तारखेला कैलास ला पोहोचलो असतो तर पावसामुळे आम्हला यात्रा पूर्ण करता आली नसती. पण जे काही होते ते चांगल्यासाठी होते आणि सर्व सहयात्री निश्चयाने यात्रा करणार होते म्हणून निसर्गाने साथ दिली असे म्हणण्यास हरकत नाही. कारण इथे निसर्ग, भगवान शंकर सर्वेकाही ठरवतात. त्यांना शरण जाणे हे उत्तम. ज्यांना attitude होता त्यांची यात्रा अर्धवट झाली हे मी पहिले (शिवम ग्रुप मधील काही यात्री.. पण त्याबद्दल लिहिणार नाही कारण ते त्यांचे नशीब.)


यात्रेदरम्यान काही सूचना
१) चांगला टूर ऑपरेटर निवडा . नामराज जोशी चांगला आहे. ९३२३८०५८८८
२) सप्टेंबर महिना त्यामानाने safe आहे. कमी गर्दी व पावसाची शक्यता कमी  ( हा लोकांच्या अनुभवाप्रमाणे अंदाज आहे. )
३ ) टुर ऑपरेटरच्या सल्ल्याने चालावे.
४) नेपाळमार्गे जाणे सोयीस्कर आहे.
५) ट्रॅव्हल इन्शुरन्स करावा (युनाइटेड इन्शुरन्स ची कैलास साठी पोलिसी आहे. )
६) डेकॅथलॉन (Decathlon), या दुकानात सर्वे काही मिळते तिथून शॉपिंग करावी.
७) शारीरिक पेक्षा मानसिक तयारी महत्वाची आहे. मानसिकदृष्ट्या खंबीर असणे महत्वाचे आहे. 
८) आमच्या ग्रुप मध्ये २१ ते ७१ वयोगटातले  यात्री होते  त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. त्यामुळे म्हातारी माणसे देखील परिक्रमा पूर्ण करू शकतात असा माझा विश्वास / अनुभव आहे.
९) परिक्रमेला घोडा घेण्यात कमीपणा नाही. यात्रा पूर्ण होते. परंतु ५-६ किमी डोंगरावरून तीव्र उतारावरून उतरावे लागते तिथे घोडा नाही याची नोंद घ्यावी. पोर्टर मात्र नक्कीच सोबत घ्यावा , तो आपले सामान उचलतो आणि आपल्याला सोबत करतो. यात्रा पूर्ण झाल्यावर पोर्टर , घोडेवाला , शेर्पा याना बक्षिस द्यावे. 
१०) संपूर्ण यात्रेमध्ये शाकाहारी जेवण मिळते. आपले शेर्पा जेवण बनवतात व जेवण चांगले असते त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. खरे म्हणजे इथे भूक लागताच नाही. 
११) मानससरोवर आणि परिक्रमा या वेळी डॉर्मेटरी मध्ये राहावे लागते. एका खोलीत ५-६ जण. विशेष काही फॅसिलिटी नसतात. टॉयलेट ला बाहेर  लागते. पण सगळेच जातात त्यामुळे विशेष नाही.
१२) ज्यांना कैलास दर्शन करायचे आहे त्यांनी पण जरूर या यात्रेला जावे. मानससरोवर च्या किनाऱ्यावर राहताना समोर कैलास दिसतो. तसेच पहिल्या दिवसाची परिक्रमा करावी. सोप्पी आहे तसेच त्या  रात्रीचा मुक्काम कैलाशच्या पायथ्याशी असतो. त्यामुळे  होतो.
१३) इथे ऑक्सिजन कमी आहे त्यामुळे प्राणायाम , कपालभाती असे श्वसनाचे व्यायाम करावेत. उज्जायी प्राणायाम ने शरीरातील ऑक्सिजन लेवल वाढते त्यामुळे उज्जायी प्राणायाम नियमित करावा.
१४) यात्रेदरम्यान सकाळी व  रात्री अर्धी diomox  गोळी ना चुकता घ्यावी. या सूचना तुम्हाला मिळतीलच.
१५) मन  शांत ठेवावे.  उगाचच वाद घालू नये.ग्रुप बरोबर बरोबर मिसळून जावे.
१६ ) सतत गरम पाणी व इलेकट्रोल पावडर प्यावी त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी maintain राहील.
१७) सन  क्रीम  लावावी. शरीर झाकून घ्यावे. गरम कपडे व ट्रेकिंग बूट यात compromise करू नये. चांगल्या दर्जाचे घ्यावे. (डेकॅथलॉन दुकान उत्तम )
१८) हि शर्यत नाही त्यामुळे  काहीही शाररिक त्रास झाल्यास ताबडतोब  टूर ऑपरेटर व सहयात्री ला सांगावे.
१९) इथे फक्त निसर्गाची सत्ता चालते त्यामुळे आपला अहंकार  बाजूला ठेवावा. परिक्रमा होईलच किंवा कैलासाचे दर्शन होईलच असे कोणी खात्रीने सांगू शकत नाही. सर्वे काही वातावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे उगीचच त्रागा करू नये. 
२० ) नेपाळी शेर्पा , तिबेटचे लोक तसेच आपला टूर ऑपरेटर यांच्याशी सन्मानाने वागावे.
२१) सर्वे काही चिनी शासन ठरवत असल्यामुळे कधीकधी कार्यक्रम बदलतो, उशीर होतो. तेव्हा संयम ठेवावा.
२२) हिंदू , बुद्धिस्ट, जैन व तिबेटच्या बॉन धर्मियांचे सर्वोच्च स्थान आहे त्यामुळे त्याचा आदर राखावा , स्वच्छता ठेवावी.
२३) तिबेट मध्ये खूप गरिबी आहे, त्यामुळे स्थानिक माणसे , मुले याना देण्यासाठी चॉकोलेट , बिस्कीट सोबत घ्यावे व त्यांना वाटावे. 
आणि सर्वात शेवटी बिनधास्त कैलास ला जा... जगात या ठिकाण एवढे समाधान कोठेही नाही हे निश्चित.
अधिक माहिती हवी असल्यास मला कधीही फोन करा.

 विशाल फुलपगार , मुंबई 18 Nov 2017
9821532033

12 comments:

  1. सर खूप छान अनुभव लिहिला आपण पुन्हा परिक्रमा झाली. धन्यवाद!!

    ReplyDelete
  2. विशाल जी आज दूसरी बार यह यात्रा वर्णन पढ़ रही हूँ। मैं स्वत:इस यात्रा का हिस्सा थी इसलिए पुरानी यादें फिर ताजा हो गईं।
    आपने बहुत ही संतुलित तरीके से यात्रा का अक्षरशः वर्णन लिखा है। यह अन्य यात्रियों के लिए भी एक मार्गदर्शक गाइड है।
    ईश्वर ने हमें जीवन की इस आध्यात्मिक, मानसिक, सांस्कृतिक और शारिरिक यात्रा का सहयात्री बनाया ,हम सब सकुशल यह यात्रा संपन्न कर सके हम भोलेनाथ शिव के चरणों मे कोटिशः प्रणाम करते हैं। नामराज जोशी जी सचमुच एक निष्ठावान, ईमानदार और समर्पित व्यक्ति हैं। वे हमारी इस यात्रा के निमित्त बने, माध्यम रहे उनको भी नमन।
    आपने इतना सुंदर,व्यवस्थित और क्रमबद्ध लिखा है तथा जो photos -videos डाले हैं हम एक बार फिर कैलास-मानसरोवर परिक्रमा कर आए।
    धन्यवाद।

    ReplyDelete
  3. Thanks.
    Few moments in life are to be lived and are once in a lifetime opportunity. We all lived those moments very happily. And when i turn back and cherish those moments I feel it was a dream which actually came true

    ReplyDelete
  4. खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती..तुमच्यामुळे आज कैलास परिक्रमा करता आली..इतक्या कठीण परिस्थितीत पण तुम्ही चॅन फोटो काढले..तसेच तुमचा अनुभव आणि हे ओरिजिनल फोटो आमच्या सर्वांबरोबर सामायिक केल्याबद्दल तुमचे आभार..कैलास पर्वताचे आकर्षण हे सर्वांनाच असते पण प्रत्यक्षात तिथे जाणे आणि दर्शन घेणे हे खूप कमी लोकांच्या नशिबात असते..पण तुम्ही त्या नशिबावंतांपैकी आहात म्हणून तुमचे विशेष कौतुक..तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला जर हा ब्लॉग वाचून प्रेरणा मिळाली तर नक्कीच तुम्ही पण एकदा कैलास ला जाऊन याच. याच्या एवढा आनंद कुठेच नाही

      Delete
  5. फार सुंदर आणि सविस्तर लिहीलेय. वाचतांना मजा आली.

    ReplyDelete
  6. Very detailed write up. Will be very useful for those who are planning this . Nicely written & nice photos.
    Bloglekhan friend 2020.

    ReplyDelete
    Replies
    1. I have written with the intention to give information and also should be useful for someone who wants to visit.

      Delete