आजही ज्या व्यक्तीमुळे मला
किंवा आमच्या
घराला समाजात मान मिळतो अश्या माझ्या आजोबांबद्दल मी लिहिणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक रोल मॉडेल असतो किंवा आदर्श
असतो तसे माझे आजोबा हे माझे रोल मॉडेल
आहेत.
जगात खूप चांगली माणसे असतात. ते स्वतःसाठी
/ समाजासाठी / नातलग मंडळींसाठी खूप काही चांगली कामे करतात. काही जण प्रसिद्ध होतात तर काही जण होत नाहीत. समस्त फुलपगार
परिवारामध्ये एक अत्यंत तेजस्वी आणि जबरदस्त व्यक्ती होऊन गेली ते म्हणजे माझे आजोबा लक्ष्मण पांडुरंग फुलपगार गुरुजी ( १० जुलै १९१७ - ८ ऑक्टोबर
१९९४ ).
जे फुलपगार
गुरुजीना ओळखतात त्यांना हे पटेल परंतु
महत्वाचे म्हणजे मी आशा करतो कि माझा मुलगा आर्यन
जेव्हा मोठा होऊन हे वाचेल तेव्हा त्याच्या स्मरणात हि गोष्ट नेहमीच अभिमानास्पद राहील.
जग सतत बदलत असते. काळ , वेळ, माणसे , परिस्थिती कायम बदलत असते. लोकांची स्मरणशक्ती नेहमीच कमी असते , केलेली मदत ते लगेचच विसरतात
व पुढे जातात. आपण सुद्धा जास्त गुंतून न राहता पुढे जायचे. असो , मी शक्यतो तटस्थपणे आठवणी लिहिण्याचा प्रयत्न करतो.
जन्मतः महार जातीत जन्मलेल्या पांडुरंग येसुजी फुलपगार यांच्या ६ मुले व
२ मुली यातील एकाचे नाव लक्ष्मण. जनावरांच्या चामड्याचा व्यापार करणे हा
आमचा पिढीजात
धंधा. जन्म - जुन्नर गावी म्हणजे शिवनेरी
किल्ल्याच्या पायथ्याशी. अजूनही आमचे गावी खालचा माळीवाडा येथे एक घर आहे. विशेष म्हणजे मराठा वस्तीमध्ये एकट्या आमचेच
महारांचे घर. असे लिहिण्यास कारण कि त्यावेळी जाती प्रमाणे वस्त्या असत. पण
फुलपगार त्याला अपवाद असावेत. शिक्षण ७वी पास व मुंबई
महानगर
पालिकेच्या धारावी येथील शाळेतून मुख्याध्यापक म्हणून
निवृत्त झाले. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत सर्वानी बौद्ध धर्मात प्रवेश केला.
श्री. विठ्ठल उपशाम हे आजोबांचे सखें मामा, त्यांनी या सर्व भावंडाना मुंबई आणले आणि मग ते मुंबई मधेच शिकले. त्याकाळी पांडुरंग फुलपगारची सर्व मुले दादर नायगाव येथे एका चाळीत राहायची.
साधारणपणे १९५२ ला डॉ. आंबेडकर साहेबानी समाजासाठी मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडून खार या मुंबई उपनगरात एक खूप मोठी जागा घेतली. व त्यात आजोबानी साधारण २८०० sq ft चा bunglow प्लॉट विकत घेतला. एका तर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे vision बघा कि त्यांनी समाज बांधवांसाठी खार सारख्या भागात जागा मिळवली. म्हणजे आज खार इतका प्रसिद्ध आणि महागडा भाग आहे कि आपण येथे भाड्याने राहण्याचे स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. त्याशिवाय आजोबांचे डेरिंग बघा कि काहीही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी कशी पैशाची जमवाजमव केली असेल याचा मी विचार देखील करू शकत नाही. only daring. जमीन घेऊन त्यांनी त्यावर ४ BHK चा टुमदार बंगला बांधला. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ "पांडुरंग भुवन " असे नाव दिले आणि १९५६ मध्ये ते इथे राहायला आले. त्यावेळी ते साधारण ४० वर्षाचे असतील. आजोबाना अशोक, सुरेश , दिलीप अशी ३ मुले व सुमन हि मुलगी अशी ४ अपत्य. ते आजोबाना दादा म्हणत.

आमचे आजोबा म्हणजे पक्के
आंबेडकरवादी. सर्वानी शिकले पाहिजे , समाजात मोठे झाले पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे अशी त्यांची कायम वृत्ती
असे.
व्यवसाय
: कुटुंब मोठे तसेच येणारे जाणारे
माणसे खूप. घरी जेवायला सतत पाहुणे , गाववाले असायचे, चहापाणी कायम चालू आणि हि चिंतेची नाही तर अभिमानाची बाब होती. माझी आजी देखील महानगर पालिका शाळेतून मुख्याध्यापिका
म्हणून निवृत्त झाली त्यामुळे घरात
शिक्षणाचे महत्व होते. अर्थात इतर भावंडानी याचे महत्व पण ओळखले नाही आणि याचा लाभदेखील घेतला नाही. यावर अधिक
विवेचन नको.
आजोबानी आमच्या गच्चीवर त्यांच्या
निवृत्ती नंतर Vishal & Company या माझ्या नावाने बफीन्ग ब्रश ची कंपनी चालू केली. त्यात जवळपास १०-१२
कामगाराना प्रत्यक्ष व २०-२५ जणांना अप्रत्यक्ष
रोजगार होता. हि फॅक्टरी चांगली चालत
होती. कामाच्या
व्याप वाढल्यावर आजोबानी santacruz , दौलतनगर येथे शासनाच्या जमिनीवर अंदाजे २००० ते ३००० sqft फॅक्टरी चालू केली. या उत्पन्नातून
घराचे चांगले चालले होते.
सदर काम शासनाने दोनदा तोडले आम्ही पुनः उभे केले. नंतर मात्र शासनाने त्यावर कंपाऊंड घातले. व मग हि फॅक्टरी बंद करावी लागली. परंतु याचा फोटोपास त्यांनी काढला नाही, का काढला नाही हे माहित नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी जी अनेक बांधकामे होती त्यात मराठी माणसाचे असे फक्त आमचेच बांधकाम होते. यातला नफा नुकसानीचा भाग सोडला तरीदेखील उद्योग उभे करावेत , त्यातून रोजगार निर्मिती , स्वावलंबन व महत्वाचे म्हणजे प्रचंड डेरिंग दिसून येते. म्हणजे निवृत्त झाल्यावर देखील ते स्वस्थ बसले नाहीत.

याशिवाय चिंचोटी, वसई येथे त्यांनी
१५-२० गुंठे
रोड ला लागून जागा विकत घेतली. व तिथे L P
Soap नावाची
अजून एक कंपनी चालू केली. यात liquid सोप व कपडे धुवायचा साबण बनायचा. आमचे नातेवाईक श्री कडलाक हे एका साबणाच्या कारखान्यात कामाला होते मग त्यांचे
expertise व
आमचे भांडवल अशा प्रकारे कि कंपनी चालायची. तिला बऱ्यापैकी ऑर्डर मिळायच्या व हि कंपनी सुद्धा बऱ्यापैकी नफ्यामध्ये
होती.
या जागेला देखील बरकत होती. यातून एक १२ महिने पाणी असलेला ओढा वाहायचा. व एक कायम तुडुंब भरलेली मोठी विहीर होती. गावातली लोक यातून पाणी घ्यायला यायचे. आजोबांची मुले म्हणजे माझे वडील , काका हे कामकाज बघायचे. थोड्या वर्षाने माझे दिलीपकाका आजारी झाले त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला. त्या दरम्यान याकडे दुर्लक्ष होत गेले. व आजोबानी त्यांच्या हयातीत हि जागा विकून पैशाची वाटणी मुलांमध्ये करून टाकली. या जागेत आम्ही खूप राहायचो. खूप मज्जा यायची. असो.

जीवनकाल : आजोबानी खूप लोकसंग्रह केला. त्यांचे भाऊबंद , नातेवाईक , गावातले लोक , मुंबईतील ओळखी पालखीचे हे
कायम घरी आजोबाना भेटायला येत असत.
त्यामुळे घर अनेकदा overcrowded होत असे. याशिवाय आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीला स्वतःचे ऑफिस
नव्हते ते पण आमच्या घरात होते. त्यामुळे
सोसायटी चे कामकाज आमच्या घरातून चालायचे. यात आजोबा अनेक वर्षे chairman
होते. त्याची
गर्दी ती वेगळीच. कॉलोनीतील अनेकांचे इलेक्ट्रिक मीटर
आमच्या कंपाऊंड मध्ये अनेक वर्षे होते. ते कालांतराने
प्रत्येकाच्या कंपाऊंड मध्ये शिफ्ट केले.
जुन्नर या आमच्या गावी देखील आजोबाना खूप मान होता , त्याची अनेक कारणे असावीत. एक तर ते शिक्षक होते , त्यावेळी शिक्षकांना खूप मान असायचा. त्यांचे सर्व भाऊ हे सामाजिक भान असलेले आणि महत्वाकांक्षी होते , त्याशिवाय सर्वामध्ये खूप एकी होती. गावी त्यांचा भाऊ मारुतीअप्पा राहायचे त्यांनी खूप मान कमावला आणि राखला होता. त्याशिवाय रामचंद्र अप्पा, त्यांचे भाऊ देखील व्यवसायिक व सामाजिक वृत्तीचे होते. त्याशिवाय दुसरे भाऊ विठ्ठलनाना , बळवंतअप्पा हे देखील स्थिरस्थावर होते. मुंबई ला येऊन आजोबानी घर ना घेता बंगला बांधला व त्यात सर्वाना मुक्त प्रवेश होता , तसेच आजोबा सर्वाना सर्व प्रकारे मदत करायचे त्यामुळे त्यांच्या शब्दाला खूप मान होता. आजोबा व त्यांचे भाऊ यात उत्तम संवाद होता. यांच्यामध्ये कधी वाद विवाद अथवा वितुष्ट झाल्याचे मला आठवत नाही. खरे म्हणजे सर्व भाऊ उद्योगी होते. त्याबद्दल मी जास्त काही लिहीत नाही. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेलो कि आजोबाना VIP वागणूक मिळत असे. लग्नात किव्हा जेवणाला आम्ही कधी रांगेत उभे राहिल्याचे मला आठवत नाही.

महत्वाचे म्हणजे आजोबा समाजातील लग्न जुळवण्याची
काम विनामूल्य करत असत. कोणाची मुले लग्नाची आहेत आणि ती कोणत्या घरात योग्य राहतील असे ते नेहमीच हेरून ठेवत.
तसेच स्थळ आणले कि ते त्याची जबाबदारी घेत.
लग्नानंतर काही कुरबुर झाली तर दोन्ही
बाजूची मंडळी
आमच्या घरी येत आणि मग आजोबा त्यांच्यात समेट घडवून आणत. बाहेर भांडणारे पती पत्नी आजोबांसमोर गप्पा असत आणि त्यांचे
म्हणणे ऐकत.
अनेक ना जुळणारे लग्न त्यांनी जमवले. अनेकदा मुलगी किव्हा मुलगा बघायचा कार्यक्रम आमच्या घरीच होत असे. तसेच अनेकांचे साखरपुडे (engangement ) आमच्या घरी गच्चीवर झालेत. लग्नासाठी त्यांनी अनेक मुलं मुलींना convince करून लग्न जुळवले होते. यामुळे आजोबांचा मान अधिकच वाढत असे. आजोबांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर , वरती हाल्फ सदरा व टोपी घालत. त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कोणाकडे उसने पैसे घेतले असतील असे मला वाटत नाही. तसेच आमच्या दारावर कधीच कोणी उधारी परत मागायला आला नाही. त्यांनी किती जणांना मदत केली तो भाग वेगळा.

जवळचे मित्र : आजोबांचे जवळचे मित्र मला आठवत नाहीत परंतु , माळवेगुरुजी व शिशुपाल गुरुजी हे त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईकदेखील.
माळवेगुरुजी च्या मुलीबरोबर त्यांच्या धाकट्या
मुलाने म्हणजे दिलीप काकानी लग्न केले त्यामुळे मैत्री चे रूपांतर नात्यात झाले.
तर शिशुपाल गुरुजी हे त्यांचे मेहुणे.
माळवेगुरुजी व शिशुपाल गुरुजी हे देखील समाजात मान असलेले व लग्न जुळवणारे
होते त्यामुळे त्यांचे एकमेकात चांगलेच
पटायचे. एकंदरीत इतके लोक आजोबाना भेटायला यायचे कि त्यात आणखी कोणी मित्र होते का ते मला सांगणे कठीण आहे.
आहार व व्यायाम : जेवण आणि
जेवणाची वेळ याबाबत ते खूप particular होते. veg /नॉन veg दोन्ही प्रकारचे जेवण ते
जेवत. आणि ते मनापासून जेवत. खरं म्हणजे जेवण
हा पूर्ण फुलपगार फॅमिली चा ट्रेडमार्क आहे. आम्हा सगळ्यांना खूप भूक लागते आणि चटक मटक आवडते. असे म्हणतात कि फुलपगार लोक जिथे पण
जातात तिथे आधी जेवणाची काय सोय आहे ते बघतात ,नसेल ते शोधून काढतात किंवा व्यवस्था
करतात. अजून एक
गोष्ट मला चांगलीच आठवते कि ते चपाती/ भाकरी डाळ किव्हा कालवणात चुरून (काला ) करून खायचे ती पद्धत मला खूप आवडायची.
मी देखील माझे ताट त्यांच्याकडे नेत असत मग
ते मला काला करून द्यायचे. प्रसंग कोणताही असो
ते जेवणाची वेळ सहसा चुकवत नसत. तसेच रात्री जेवल्यानंतर ते खार स्टेशन पर्यंत चालत जायचे मग बनारसी पान खाऊन यायचे. ते एरवी देखील
खूप चालायचे, त्यामुळे ते उंच असले तरी त्यांची
प्रकृती काटक होती. सकाळी ते शीर्षासन
करायचे. ते
अत्यंत जलद गतीने चालत असत. ते नेहमी तांब्यातून पाणी पीत , ग्लास मधून कधी पाणी पीत नसत. कदाचित हा सवयीचा भाग असावा.
रात्री जेवल्यानंतर ते एकटेच एक पत्त्याचा डाव
खेळात आणि मगच झोपत.
नातवांबरोबर संबंध : मला जेव्हा पासून आठवतंय
तेव्हापासून मी कायम लोक आजोबांशी आदराने बोलताना
पाहिलेत. त्यांचा सल्ला घ्यायला अनेक जण यायचे. व त्यांचा शब्द अंतिम असे. आजोबांशी कोणी argument करत
नसत. सर्वजण त्याच्याशी हळू आवाजात
बोलत . अर्थात
समाज प्रथेप्रमाणे त्याचा दुश्वास देखील काही लोक करायचे पण त्यांना काही किंमत नव्हती. He earned respect , he commanded respect and he got respect through his
deeds.
नातवांपैकी मी , राजेश , निलेश आम्ही मोठे होतो , त्यामुळे आम्ही आजोबांशी बोलायचे. ते आम्हाला छोटी मोठी कामे सांगत आणि आम्ही ते धावत करायचो. सोनाली , योगिता , सुजित , हर्षद , प्रियांका हे लहान होते. आजोबा खूप व्यस्त असायचे पण ते आमचे लाड करायचे. आमच्या घराच्या आवारात राजापुरी हापूस आंब्याचे झाड आहे. आत्ता कमी आंबे येतात पण पूर्वी अंदाजे १२०० आंबे यायचे , ते मे महिन्यात आम्ही मुले काढायचो , पुसून पोटमाळ्यावर गवतामध्ये ठेवायचो . हा एक दिवसभराचा कार्यक्रम असायचा मग ते आंबे रोज तपासायचे , पिकलेले आंबे काढणे , वाटणे , खाणे , आमरस करणे असा खूप मोठा कार्यक्रम असायचा. आंबे लावून झाले कि मग आजोबा आम्हाला खार स्टेशन जवळ "बनारसी " या हॉटेल मध्ये न्यायाचे , व तिथे आम्ही सामोसा प्लेट व लस्सी घ्यायचो. त्यावेळेला वर्षातून एकदाच हॉटेल मध्ये जायचो. कारण म्हणजे हॉटेलमध्ये जेवणे अशी पद्धत नव्हती व मनोवृत्ती देखील नव्हती. अक्षरशः आम्ही नातवंड मे महिन्याची वर्षभर वाट बघायचो. त्यावेळी हॉटेलमध्ये खाताना खूप श्रीमंत असल्यासारखे वाटायचे. माझ्यावर त्यांचा खूप विश्वास होता आणि अपेक्षा देखील होती. मी engineer च्या last year ला त्यांचे निधन झाले नाहीतर त्यांना या गोष्टीचा खूप अभिमान वाटलं असता. घरातील सर्व सुना, त्यांची मुलगी / जावई याना घरात खूप मान ते द्यायचे. महिलांना respect करावा हे आम्ही घरातूनच शिकलो.

लक्ष्मणरावांचा परिवार
बु. वत्सलाबाई लक्ष्मणराव फुलपगार (निवृत्त मुख्याध्यापिका , पार्ले महानगर पालिका शाळा )
१) अशोक लक्ष्मण फुलपगार - रिटायर्ड उप प्रबंधक - इंडियन एरलाईन्स
अर्चना अशोक फुलपगार (सुन )
- रिटायर्ड मुख्य लिपिक - मुंबई महानगरपालिका
२) सुरेश लक्ष्मण फुलपगार - रिटायर्ड सहायक प्रबंधक- एअर इंडिया
शिल्पा सुरेश फुलपगार (सून )
- गृहिणी
३) बु. दिलीप लक्ष्मण फुलपगार - मुंबई महानगर पालिका
दीपा दिलीप फुलपगार - मुंबई
महानगर पालिका
४) सुमन जयवंत वाव्हळ - गृहिणी
जयवंत चिमाजी वाव्हळ (जावई )
- रिटायर्ड क्लास १ अधिकारी सचिवालय
यावरून असे दिसते कि त्यांच्या हयातीत त्यांची
सर्व मुले चांगली settle
होती. हे देखील उल्लेखनीय आहे
त्यांचा कनिष्ठ मुलगा दिलीप याना
तरुण वयातच हृदयाचा त्रास चालू झाला त्याचा औषध उपचार यामध्ये सगळ्यांचे लक्ष गेले. कालांतराने शर्थीचे
प्रयत्न करून त्यांचे १७ नोव्हेंबर १९८७
ला निधन झाले. त्यानंतर उद्योग धंद्यावर सर्वांचेच
दुर्लक्ष झाले हळूहळू दोन्ही कंपनी बंद झाल्या. याशिवाय या उद्योगावर आजोबानी वैयक्तिक लक्ष दिले नाही कारण ते इतर कामात
व्यस्त असत. त्यांची मुले नोकरी सांभाळून यात
लक्ष घालायचे. मला असे वाटते कि आजोबानी यात
एक्स्पर्ट माणसांना नेमायला हवे होते. असे झाले असते तर हा धंधा चांगलाच वाढला असता. परंतु तत्कालीन परिस्थिती वर आत्ता comment करणे योग्य नाही.
तरीही उद्योगधंदे उभे करावे , त्यातून रोजगार निर्मिती करावी , भांडवल निर्मिती करावी , नफा कमवावा या गोष्टी amazing
आहेत.
विशेषकरून मागासवर्गीय समाजातून येऊनसुद्धा कोणतेही पाठबळ नसताना स्वतःच्या हिमकतीवर एवढे सगळे करणे म्हणजे impossible. आजोबानी कधी देवावर विश्वास ठेवला असे मला आठवत नाही. परंतु त्यांचा स्वतःच्या
कर्तृत्वावर विश्वास होता. ते कधीही कोणत्याही
प्रसंगाला घाबरले नाहीत. भीती हा शब्द
त्यांना माहीतच
नव्हता. प्रचंड प्रमाणात कष्ट करायचे. आजोबा दमलेत किंवा आजोबा दमून आलेत असे मला आठवत नाही.
त्यांना तीन मुले , व एक मुलगी. मुलगी दहिसर ला
राहते. मुलांची लग्न झाली व जागा कमी
पडायला लागली.
तसेच नंतर वितुष्ट नको म्हणून त्यांनी बंगला पडून तिथे ground +२ मजल्याची इमारत स्वतः बांधायचा निर्णय घेतला. कोणत्या
मुलाने किती contribution द्यायचे हे त्यांनी ठरवले व त्याप्रमाणे साधारण पाने १९८६ मध्ये हि इमारत बांधून तयार झाली व प्रत्येकाला एक मजला
व त्यावर २ BHK फ्लॅट मिळाला. खरे पाहता एखाद्या
बिल्डर ला joint venture मध्ये इमारत बांधता आली असती पण मालकी हक्क गेला असता आणि प्रत्येकाला कमी
जागा मिळाली असती. परंतु बाबासाहेबानी स्थापित
केलेल्या सोसायटी मधील जागा न गमावता
मुलं
नातवंडांना खार मध्ये हक्काची व एकाच ठिकाणी जागा मिळावी हा त्यांचा हेतू. या प्रमाणे त्यांचा प्रत्येक मुलगा हा आज २ BHK चा मालक आहे. किती हि दूरदृष्टी.
तसेच इमारत contractor लावून बांधणे तसेच त्या
स्पीड ने पैसे उपलब्ध करणे हे खूपच डेरिंग
चे काम आहे. पण त्यांनी हे केले व आमची सोय केली.
नाहीतर बाजारभावाप्रमाणे आम्हाला खार मध्ये भाड्याने राहणे सुद्धा परवडले नसते. याबद्दल मी त्यांचा ऋणी
राहीन. त्यांच्या हयातीतच त्यांनी सर्व मुलांना वाटणी करून
दिली.
एवढा प्रचंड मान असून देखील आजोबांचे पाय कायम जमिनीवर होते. ते कोणाशी उद्धटपणे बोलल्याचे मला आठवत नाही, किंवा मी प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे ऐकलं नाही. साहजिकच जे आजोबाना विरोध करायचे
किव्हा आजोबांविषयी वाईट बोलायचे , अशा लोकांच्या सवई , त्यांच्या घरातील वातावरण , त्यांची समाजातील प्रतिमा आणि त्यांची प्रगती बघून मला
तेव्हादेखील किव यायची आणि आत्ता देखील वाईट वाटते. अशा अनेक विरोधकांना आजोबानी अनेकदा मदत केली होती व त्याची कधीच वाच्यता केली नाही. मला वाटते कि
मोठ्या माणसाचे ते एक विशेष लक्षण असावे.
अश्या माझ्या आजोबांचे १० ऑक्टोबर १९९४ ला निधन झाले. यांच्या प्रेतयात्रेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. यावरून त्यांची प्रसिद्धी दिसते.
त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्यांनी पॉसिटीव्ह बदल घडवला किव्हा तसा प्रयत्न केला. त्यांच्यापासून निश्चितच अनेकांना प्रेरणा मिळाली असेल. एक गरीब मागासवर्गीय समाजातून येऊन देखील त्यांनी सर्वामध्ये एक अत्यंत मानाचे स्थान स्वकर्तुत्वाने व स्व हिमतीने मिळवले. हि त्यांचा जीवन प्रवास मला निश्चितच आदर्श वाटतो. अर्थातच आपण सर्वजण short memory मध्ये जगतो.
ल. पा फुलपगार गुरुजी यांची आठवण मी
माझ्या पद्धतीने किव्हा मला जाणवले /
आठवले
त्याप्रमाणे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला. अनेक बाबी लिहायच्या राहिल्या आहेत, काही त्रुटी असतील परंतु
सर्व फुलपगार परिवारात माझे आजोबा greatest
होते याबद्दल
कोणाचे दुमत नसणार. त्यांच्या हयातीत मी सज्ञान होतो त्यामुळे मला बऱ्यापैकी आठवण आहे. अर्थात त्यांच्या ग्रेटनेस
किंवा सांसारिक यशामध्ये त्यांची पत्नी बु.
वत्सलाबाई
लक्ष्मणराव फुलपगार (निवृत्त मुख्याध्यापिका , पार्ले महानगर पालिका शाळा ) यांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल नंतर लिहू.
सध्या corona virus संकटामुळे lockdown आहे त्यामुळे अनेक वर्षाची ईच्छा आज थोडक्यात पूर्ण झाली.
विशाल अशोक फुलपगार (२६ एप्रिल २०२०)

खूप छान आठवण..आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌺
ReplyDeleteधन्यवाद. खरच आजोबा खूपच ग्रेट होते. आत्ता कळतेय मला.
ReplyDeleteएक कटर आंबेडकरवादी
ReplyDeleteWell done! 👍
ReplyDelete