Sunday, May 10, 2020

USA visit May 2019 (अमेरिका भेट मे २०१९)





अमेरिका भेट मे २०१९

भाग १ - अमेरिकेचा व्हिसा

अमेरिका हि सर्वासाठी dream country आहे. आयुष्यात एकदा तरी अमेरिका बघावी असे म्हणतात. माझ्या इंजिनीरिंग च्या मित्रांपैकी ६०-७०% जण अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी / नोकरी करण्यासाठी गेले व त्यातले बरेचसे तिथेच स्थायिक झाले. मी मात्र विविध कारणामुळे अमेरिकेत जाऊ शकलो नाही. एकदा तरी अमेरिकेत जावे असे वाटायचे. पण व्हिसा काढण्यापासून सुरुवात होती.
साधारण २०१६ साली अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना येथे एक नवीन टेक्नॉलॉजि बघण्याची संधी मला माझा मित्र ललित महाडेश्वर ने दिली . त्याप्रमाणे त्याने invitation letter मला पाठवले व मी २ ऑक्टोबर २०१६ ला B १ business visa साठी DS १६० फॉर्म भरून (https://ceac.state.gov/genniv/) online application केले. फॉर्म मी स्वतःच भरला. मुंबई मध्ये कालीना, Trade सेन्टर येथे मी शुक्रवार ७ ऑक्टोबर २०१६ ला सकाळी ८. ३० ला बायोमेट्रिक ला गेलो. अवघ्या ४५ मिनिटात मी बाहेर आलो. सर्वे काही सिस्टिमॅटिक व organised होते. व्हिसा interview बुधवार १२ ऑक्टोबर २०१६ रोजी American Embassy , BKC मुंबई येथे सकाळी ९ चा होता. सर्वानी सांगितले कि व्हिसा interview खूप कठीण असतो आणि अमेरिकेचा व्हिसा मिळणे कठीण असते. अनेकांचे व्हिसा अर्ज रिजेक्ट होतात. वगैरे वगैरे वगैरे.

ठरल्याप्रमाणे मी सकाळी ८. १५ ला formal कपडे घालून अमेरिकन embassy च्या बाहेर पोहोचलो. प्रचंड गर्दी होती. हातात एक फाईल ज्यात LIC policy , पुणे येथील घराचे पेपर्स आणि invitation लेटर होते. देशाची आर्थिक परिस्थिती उघडी पडू नये म्हणून मी माझे bank statement घेतले नाहीत. ८. ३० ला आमची ९ वाजताच्या लोकांची रांग embassy बाहेर लागली, त्या रांगेत उभा राहिलो. मोबाइल, coin वगैरे घेतले नाही. सर्वजण तणावात होते. कोणते प्रश्न विचारणार , काय उत्तर द्यायचे काहीच माहित नाही. इंजिनीरिंग करताना VIVA (तोंडी परीक्षा असते ) त्यात नेमकी हीच परिस्थिती असते. त्यामुळे काहीही माहित नसताना पूर्ण आत्मविश्वासाने interview कसा द्यावा हे मी शिकलो होतो. रांगेत साधारणपणे १५०-२०० लोक असावेत. रांग चालू झाली आणि माझ्या खांद्यावर एक सुंदर फुलपाखरू बसले. आणि आम्ही security ला पोहोचल्यावर ते उडून गेले. हा मला एक शुभसंकेत वाटला.

Anyways सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही interview हॉल मध्ये पोहोचलो. जवळपास २० interview windows होत्या त्यात English व इतर भाषामध्ये बोलण्याची सोय होती. मी इंग्लिश निवडली होती. माझ्या टोकन क्रमांकाप्रमाणे मला १२ क्रमांकाच्या रांगेत उभे केले. त्यात माझा तिसरा नंबर होता. सर्वकाही systematic चालू होते. अजिबात गोंधळ नाही. अनेकांचे व्हिसा reject होत होते. ते लोक हिरमुसले होऊन जात होते. Interview नंतरचा आनंद आणि खिन्नता चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होती. व त्यामुळेच व्हिसा मिळाला कि नाही ते कळायचे. माझ्या रांगेतील पहिल्या माणसाचा ३५ मिनिटं interview झाला व मग त्याला visa मिळाला, त्याचे बरेच कागदपत्र तपासले.

एकतर मला interview ची सवय नाही आणि कोणी माझा interview घ्यावा हे मला आवडत नाही (attitude), त्यामुळे माझे कठीणच होते. Personality आणि luck यावर माझा नेहमीच निभाव लागतो आणि या वेळीही लागेल असा माझा आत्मविश्वास.

माझा नंबर आला , interview अधिकाऱ्याने माझा पासपोर्ट घेतला , माझ्याकडे ढुंकून बघितले नाही. नाव विचारले , कुठे जाणार , कधी जाणार , कुठे राहणार , कशासाठी जाणार , कधी परत येणार, सध्या कुठे नोकरी करता ,एवढेच प्रश्न त्याने मला ना बघता विचारले. सर्व वेळ तो समोरच्या कॉम्प्युटर वर काहीतरी टाईप करत होता. अचानक त्याने मला बघितले आणि म्हटला "OK SIR ", म्हणजे तुम्ही जा. माझा पासपोर्ट त्याने स्वतःकडे ठेवला. मी confuse झालो. आता मनात म्हटले कि हा पासपोर्ट मला जाताना बाहेर काउंटर वर मिळेल का कुठे मिळेल ? व्हिसा मिळाला का नाही मिळाला ? म्हणून मी त्याला विचारले Sir my passport ? तेव्हा तो हसून म्हणाला कि Congratulations your visa is granted and you may collect it tomorrow. खूप आनंदात मी तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी मी पासपोर्ट collect केला. १० यावर्षासाठी व्हिसा दिला होता.  व्हिसा का मिळतो आणि का मिळत नाही याचे ठोस कारण मला कळले नाही. पण माझ्या मते ते आधीच ठरवतात कि कोणाला व्हिसा द्यायचा कि नाही.  असो, काही कारणाने माझा नोव्हेंबर २०१६ चा नॉर्थ कॅरोलिना दौरा काही कारणाने रद्द झाला पण त्या गडबडीत मला व्हिसा मिळून गेला. ललित महाडेश्वर चे आभार.

माझा जिवलग मित्र निलेश गीते हा अमेरिकेत Michigan , Detroit मध्ये राहतो. त्याने आम्हा फॅमिली ला बऱ्याचदा बोलावले पण आम्ही काही ते गंभीरपणे घेतले नाही. मग २०१८ ला आम्ही ठरवले कि अमेरिकेला  जाऊया. बायकोची जिवलग मैत्रीण Dr. स्वप्ना  दवे हि शिकागो ला राहते. तसेच माझा मित्र संजेश चौधरी हा देखील शिकागो ला राहतो त्यामुळे तो देखील भेटणार होता. त्यामुळे आधी शिकागो ला जायचे मग तिथून निलेशकडे डेट्रॉईट ला जायचे आणि मग पुन्हा शिकागो ला येऊन परतीचे विमान पकडायचे असा प्रोग्रॅम निलेशने दिला. त्यात कॅनडा चा व्हिसा  घ्यायचा व कॅनडा देशात जाऊन Niagara waterfall बघायचा असे त्याने सांगितले. त्यामुळे कॅनडा व्हिसा पण काढावा लागणार होता. Generally USA व्हिसा असला कि कॅनडा व्हिसा सहजच मिळतो आणि त्यासाठी फक्त बायोमेट्रिक करावे लागते. त्याप्रमाणे आम्ही तयारी केली. सर्वप्रथम आदिती व आर्यन चा USA व्हिसा फॉर्म एजन्टकडून भरून घेतला.

१३ फेब्रुवारी २०१९ला दोघांचे बायोमेट्रिक झाले व व्हिसा interview १२ मार्च २०१९ सकाळी १० वाजता. मुलगा १० वर्षाचा होता तरीपण तो interview साठी गम्मत म्हणून शाळा बुडवून आला. पत्नी डॉ आदिती या KEM Hospital मध्ये Associate Professor आहेत त्यामुळे त्यांना सहजच १० वर्षाचा व्हिसा मिळाला (B Tourist ). लगेचच मी मुंबई दिल्ली शिकागो हि ६ मे २०१९ व शिकागो दिल्ली मुंबई हि २१ मे २०१९ ची Air India ची तिकीट काढली. दिल्ली शिकागो हि AIR INDIA ची १५ तासांची direct flight आहे.

त्यानंतर कॅनडाचा व्हिसासाठी २३ मार्च २०१९ ला VFS worli  ला बायोमेट्रिक केले. इथे सर्व निवांत होते आम्हाला ४ तास लागले. साधारणपणे ८ दिवसांनी पासपोर्ट courier ने कॅनडा embassy मधून व्हिसा स्टॅम्प लागून परत आले. कॅनडा व्हिसा validity passport संपेपर्यंत असते.

ठरल्याप्रमाणे आम्ही तयारी केली. माझे निलेशबरोबर आणि बायकोचे स्वप्नाबरोबर अनेकदा बोलणे व्हायचे. निलेशने आम्ही काय आवडीने खातो ते विचारून घेतले. तसेच माझा मित्र अनिल विसावले हा देखील निलेशजवळ डेट्रॉईट शहरात राहतो त्यामुळे एक दिवस त्याला भेटायचे असे ठरले.

७ मे ला सकाळी ७ वाजता विमान शिकागो ला पोहोचणार होते.डॉ. स्वप्नाकडे राहायचे शिकागो बघायचे , १० तारखेला आम्ही ट्रेन ने डेट्रॉईट ला जाणार व २० मे ला परत शिकागोला डॉ. स्वप्ना दवे कडे परत येऊन २१ तारखेला दुपारी १२ च्या विमानाने परतीचा प्रवास सुरु, असा कार्यक्रम आखला. शिकागो ते डेट्रॉईट व परत हा ६ तासांचा प्रवास आम्ही Amtrak ट्रेन ने करणार होतो (निलेशने तिकीट बुक केले होते ). त्यामुळे तो एक वेगळा अनुभव. आम्ही खूप आनंदी होतो कारण दोघांचेही friends भेटणार आणि अमेरिका पण बघायला मिळणार. त्यांना लागणाऱ्या व देण्यासाठी वस्तू आम्ही बॅगेत भरल्या . सर्व तयारी करून आम्ही तयार होतो.




 भाग २- अमेरिकेकडे प्रयाण

विमानात आम्ही . एअर इंडिया खूप छान अनुभव. 

आर्यन ला विमान अनुभव खूप आवडला. त्याने कॅप्टन ला चिट्ठी लिहिली 

मे २०१९ ला संध्याकाळी ८ वाजताचे  मुंबई दिल्ली AI ३१४ ने आम्ही दिल्ली ला प्रयाण केले. व अंदाजे १० वाजता दिल्ली ला पोहोचलो. आम्ही इमिग्रेशन व कस्टम्स दिल्ली ला केले. आणि ७ मे २०१९ ला पहाटे २ च्या AI १२७ विमानाने शिकागो ला प्रयाण केले. एकंदरीत हा सलग १५ तासांचा विमान प्रवास होता. परंतु तत्कालीन भारत पाकिस्तान तणावामुळे पाकिस्तान ने त्यांची  airspace भारतीय विमानासाठी बंद केली, त्यामुळे विमानाला लांबच्या मार्गाने जावे लागणार. म्हणजे  पोहोचायला खूप उशीर होणार पण पर्याय नव्हता. आमचे विमान पूर्ण भरलेले होते. माझ्या उंचीमुळे मला विमानात कसे बसायचे हे अजूनही समजत नाही. त्यात एवढा लांबचा प्रवास. तरी AIRINDIA मध्ये legspace तुलनात्मकदृष्ट्या चांगली असते. बहुतेक सर्व यात्रेकरू भारतीयच होते, त्यामुळे विमानात भारतीय वातावरण.

मला विमानात कधीच झोप लागत नाही त्यामुळे मी कंटाळलो. आर्यन आणि  अदिती मात्र झोपले. पाय मोकळे करण्यासाठी मी विमानात खूप चालायचो , त्यामुळे वेळ जायचा आणि बरे वाटायचे. विमानात ठराविक वेळेने खायला मिळत होते. crew खूप efficient होता. साधारण ५-६ तासाने मात्र टॉयलेट साठी रांग लागायला लागली. साधारणपणे ८ तासांनी विमान व्हिएन्ना विमानतळावर उतरले. विमानात इंधन भरले , crew आणि पायलट बदली झाले , साफ सफाई झाली. यात २-३ तास गेले पण विरंगुळा झाला. आत्ता विमान एक्दम स्वच्छ झाले होते व मग आम्ही शिकागोच्या दिशेने उड्डाण केले. शिकागो येण्याच्या आधी आम्हाला USA Customs चा एक declaration फॉर्म दिला. तो आम्हाला उतरल्यावर द्यायचा होता. 
हा फॉर्म आपल्याला अमेरिका कस्टमला भरून द्यावा लागतो. 
अमेरिकेत इम्मीग्रेशन ला खूप वेळ लागतो आणि गर्दी असते असे आम्ही ऐकून होतो. पण त्याची चिंता नव्हती आणि पर्याय पण नव्हता. असे अजून १० तासांनी आम्ही शिकागोच्या O 'hare  विमानतळावर सकाळी ७.१५ च्या ऐवजी दुपारी १२. १५ ला दमून थकून पोहोचलो.

नशिबाने त्यावेळी इतर विमाने आली नव्हती त्यामुळे इम्मीग्रेशन पटकन झाले आणि एका तासातच आम्ही सामान घेतले. अचानक डॉ. स्वप्नाची सासू खूप सिरीयस असल्यामुळे हरप्रीत नावाची स्वप्नाची मैत्रीण आम्हाला घ्यायला आली व आमची राहण्याची सोय कॅरोल नावाच्या मैत्रिणीच्या घरी केली. अश्या परिस्थितीत काय आम्ही खूप गोधळलो. हरप्रीत आम्हाला कॅरोल च्या घरी घेऊन गेली. त्यात अख्खा तळमजला आमच्यासाठी होता.  जेवणाचे पार्सल हरप्रीत ने आम्हाला दिले. मी निलेश ला फोन करून परिस्थिती सांगितली. तो म्हटला कि तुम्हाला मी घ्यायला येतो ,मला ५-६ तास यायला लागतील. मग आम्ही ठरवले कि उद्या ट्रेन ने डेट्रॉईट ला जायचे. निलेश ने आधीचे ट्रेन तिकीट कॅन्सल केले व नवीन तिकीट काढले तसेच आम्हाला घरून शिकागो ट्रेन स्टेशन ला सोडण्यासाठी एक मोठी कार बुक केली. थोडा वेळ झोपून आम्ही परत दुकानात, हॉटेल मध्ये जाऊन रात्रीचे जेवण व उद्या ब्रेकफास्ट साठी ब्रेड , बटर , दूध आणले. थोडा मुंबई वरून आणलेला खाऊ बाकी होता. संध्याकाळी कॅरोल आली . बायको तिला ओळखत असल्यामुळे खूप गप्पा झाल्या. स्वप्नाची सासू खूपच सिरीयस आहे असे कळले त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच नव्हता. डॉ. स्वप्ना ने कॉल केला तेव्हा तिला उद्याचा प्रोग्रॅम सांगितला. 

कॅरोल बरोबर आम्ही 

दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उठून नास्ता करून रेडी झालो.
   

टोनी बेकारी शिकागो मध्ये खाण्याचे सामानाची खरेदी केली 
बाहेर चालत जाऊन फिरून आलो. सामान भरलेले होतेच. निलेश फोन वरून संपर्कात होता. ठरल्याप्रमाणे बरोबर ११ वाजता एक मॅटॅडोर गाडी आली. त्यात बॅग ठेवल्या आणि कॅरोल ला टाटा करून आम्ही ३० मिनिटात शिकागो स्टेशन ला पोहोचलो. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चलन मिळावी म्हणून आम्ही शिकागो स्टेशनवर बरेच काही खायला पार्सल घेतले. AMTRAK या खासगी कंपनी ची हि ट्रेन होती.१२.४५ ला ट्रेन सुटली. त्या आधी १५ मिनिटआधी म्हणजे १२.३० ला आम्ही ट्रेन मध्ये सामान लावले आणि बसलो. अर्थात बॅग ढकलणे तसेच सामान लावणे हि महत्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. इथे रीसेर्व्हशन करावे लागते पण सीट नंबर देत नाही. कोणी कुठेही बसू शकतो. २ x २ व्यवस्था होती. ट्रेन स्वच्छ होती. व बरेच प्रवासी एकटे दुकटे प्रवास करत होते. आणि खूप सिरीयस दिसत होते. आपल्याकडे धम्माल असते. दोन जोडप्यांचा एक ग्रुप होता तो मात्र मज्जा , मस्ती करत होता.

एमट्रेक ट्रेन ने शिकागो ते डेट्रॉईट प्रवास. एक छान अनुभव  
सुरुवातीला एक TC  आला त्याने चेकिंग केले, थोड्या गप्पा मारल्या. ६-७ स्टेशन वर गाडी थांबली. निलेश फोन वर संपर्कात होता. मी आणि आर्यन खाण्याचे पदार्थ ट्रेन मध्ये संपवायची सूचना असल्याप्रमाणे खात होतो. एक दोनदा Pantry कार मध्ये जाऊन कॉफी घेतली. आर्यनने चॉकोलेट मिल्क घेतले. मी देखील आपल्या सवयी प्रमाणे मनात हिशोब करून अमेरिका कित्ती महाग आहे असे म्हटले. ट्रेन नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहोचली त्यामुळे निलेश ला एक तास थांबावे लागले. असे करून आम्ही संध्याकाळी ७ वाजता डेट्रॉईट स्टेशन ला पोहोचलो. निलेश ने मला मिठी मारली. आम्ही आलो याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शाळेतल्या जवळच्या मित्राला अमेरिकेत जाऊन भेटणे व त्याच्या घरी राहणे हा आनंदच वेगळा. स्टेशन वरून ३० मिनीट मध्ये आम्ही निलेशच्या घरी पोहोचलो. अत्यंत शांत कॉलनी मध्ये अनेक बंगल्यापैकी एक निलेशच्या बंगला. घरी येताच सौ शलाका आणि चि. अथर्व याने आमचे स्वागत केले. आमचे सामान आम्ही एका खोलीत ठेवले. फ्रेश झाल्यावर आम्हाला निलेश ने घर दाखवले. तळमजला + बेसमेन्ट + पहिला मजला असे ते एक मोठे घर आहे. शलाका ने स्वयंपाक करून ठेवला होता. लगेचच आम्ही जेवलो.
निलेशच्या घरी नेहमीच टेस्टी जेवण. धन्यवाद शलाका 

(खरे म्हणजे निलेश ने आधीच आमच्या आवडी निवडी विचारून ठेवल्या होत्या. मी आणि अदिती व्हेज आहोत आणि आर्यन कधी कधी बटर चिकन खातो.) जेवण अप्रतिम होते. असे वाटलेच नाही कि आपण अमेरिकेत आहोत.  खूप गप्पा मारून रात्री उशिरा झोपलो. मी सकाळी एक फ्रुट खातो हे निलेश ला माहित होते त्यामुळे त्याने आमच्या खोलीत सफरचंद ठेवले होते. त्यावरून त्याने कित्ती बारकाईने व्यवस्था केली होती ते कळले. 
  


सौ. शलाका आणि तिचे घर 
निलेश व शलाका यांनी सुट्टीच घेतली होती. कधीतरी निलेश घरून काम करत असे. अथर्व सकाळी लवकर शाळेत जात असे त्याला शाळेच्या बस स्टॉप वर सोडायला मी पण जात असे.  जेवण आणि नास्ता चे शलाकाचे  प्लांनिंग अप्रतिम होते. 

वॉलमार्ट मध्ये आम्ही खरेदीला गेलो.खूप विस्तीर्ण असे हे सुपर स्टोर , मोठी जागा , मोठ्या ट्रॉली सर्व काही मोठे. एकंदरीत अमेरिकेत everything is huge. जाताना रस्ते पण खूप लेन असलेले. सर्व काही शिस्तीत. वॉलमार्ट मध्ये थोडी खरेदी केली. मग पटेल सुपरस्टोर मध्ये गेलो. हे एक भारतीयांचे भारतीयांसाठी चालवलेले व अमेरिकेभर शाखा असलेले दुकान. येथे आम्ही भाज्या , मसाले घेतले. TARGET सुपरस्टोर मध्ये पण गेलो. सर्व पेमेंट कार्ड वर करत असू. 
   




रोज रात्री उशिरा पर्यंत जजमेण्ट हा पत्त्याचा खेळ खेळणे व रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणे हा आमचा नियमित उपक्रम. अथर्व जास्त बोलत नसे. आणि त्याला अजूनपर्यंत असे वाटायचे कि फक्त त्याचे वडील पाणचट जोक करून हसतात. पण मी आल्यानंतर आम्ही सतत जोक करत हसायचो. हे काय त्याला जमले नाही. अर्थात कालांतराने तो पण आमच्या सामील झाला. आणि मित्रांना हसण्यासाठी विशेष कारण लागत नाही हे आमच्या मुलांना कालांतराने कळले.

डेट्रॉईट शहर हे सर्व प्रकारच्या कार कंपन्यांची पंढरी एकेकाळी होती. ते शहर आम्ही फिरलो (डाउनटाऊन ). हे शहर अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डर वर वसले आहे मध्ये एक नदी.  "डेट्रॉईट प्रिन्सेस " या क्रूझ वर आम्ही एकदा गेलो. तीन तासांची हि फेरी होती. या बोटीवरून सूर्यास्त पाहिला.खाण्यापिण्याची रेलचेल होती. या बाजूला अमेरिका व त्या बाजूला कॅनडा आणि मध्ये बोट. जेवताना एकदा घेतल्यावर परत घायचे असेल तर नवीन ताट घ्यायचे जुने ताट सोडून द्यायचे असते हे इथे कळाले.







"डेट्रॉईट प्रिन्सेस " या क्रूझ वर संध्याकाळी धमाल 

 एकदा सकाळी ४ तास ड्राईव्ह करून डेटन(ओहिओ) येथे Museum of United State Airforce बघायला गेलो. या ठिकाणी अमेरिका हवाई दलाची सुरुवातीपासूनची विमाने ठेवली आहेत. यात राष्ट्राध्यक्षानी वापरलेली विमाने पण आहेत. तिथे आमचा गाईड अथर्व होता. त्याचे विमानांचे ज्ञान जबरदस्त. प्रत्येक विमानाची वैशिष्ट्य , त्याचा वापर कुहे झाला , त्यात काय विशेष आहे, त्यात काय दारूगोळा वापरायचे हे सर्व त्याला एक्दम पाठ. आणि तो खूप सविस्तरपणे समजावून सांगायचा. त्यामुळे वेळ कुठे गेला ते समजलेच नाही. एवढी विमाने मी कधीच पहिली नव्हती. शलाकाने आम्हाला दुपारी खाण्यासाठी जेवण पॅक करून दिले होते. ते आम्ही खाल्ले. 






डेटन(ओहिओ) येथे Museum of United State Airforce
तिथून आम्ही मुक्कामाला कलाहारी वॉटर पार्क पेनसिल्व्हेनिया येथे राहिलो. व दुसऱ्या दिवशी वॉटर पार्कमध्ये धम्माल करून रात्री उशिरा निलेशच्या घरी पोहोचलो.


कलाहारी वॉटर पार्क
डेट्रॉईट पासून वॉशिंग्टन म्हणजे अमेरिकेची राजधानी हा दहा तासाचा प्रवास आहे. निलेश ने एक ब्रेक घेत दहा तास गाडी चालवली व मग आम्ही वॉशिग्टन ला पोहोचलो. अर्थात शलाकाने डब्बा दिला होता. एकदा पेट्रोल भरायला आणि आराम करायला गाडी सर्विस प्लाझा ला थांबवली तेव्हा डब्बा खाल्ला. इथे गाडी चालवणे सोप्पे आहे. हायवेवर  प्रत्येक ३०-४० माईल वर सर्विस प्लाझा असतो. त्यात स्वच्छ वॉशरूम , बसायला जागा, खाण्याची दुकाने वगैरे असते.
वॉशिंग्टन ला जाताना सर्विस प्लाझा , आराम करण्याचे आणि पेट्रोल भरण्याचे ठिकाण 

इथे सर्व काम गुगल मॅप वर चालते. तिथे आम्ही जेवायचो , कॉफी प्यायचो. यामुळे गाडी चालवण्याचा आणि प्रवासाचा थकवा दूर होतो. वॉशिंग्टनला आम्ही दोन रात्र मुक्काम केला . व्हाईट हाऊस , सिनेट बिल्डिंग , सायन्स म्युसिअम , हिस्टरी म्युसिअम, एअर क्राफ्ट म्युसिअम, वॉशिंग्टन रेल्वे स्टेशन , लिंकॉन मेमोरियल , वॉशिंग्टन मेमोरियल असे अनेक ठिकाणे बघितली. खूप मज्जा आली. सर्व काही शिस्तीने आणि सिस्टिमॅटिक. दोन दिवस ड्रायविंग आणि एक दिवसात वॉशिंग्टन बघून आम्ही डेट्रॉईट ला परत आलो.





वॉशिंग्टन  रेल्वे स्टेशन 





हिस्टरी म्युसिअम , वॉशिंग्टन 


वॉशिंग्टन मेमोरियल 


व्हाईट हाऊस , वॉशिंग्टन 


लिंकॉन मेमोरियल 

अमेरिकेत भारतीय हॉटेल बरीच आहेत. त्या ठिकाणी आमच्यासारख्याना  व्हेज जेवण सहज मिळते. इतर ठिकाणी मात्र व्हेज असे सांगायचे आणि मग नो मीट , नो फिश , नो एग असे सांगायला लागायचे , नाहीतर बोंब आहे. 
वॉशिंग्टन वरून परतताना भारतीय हॉटेलमध्ये जेवण 

माझा मित्र अनिल विसावालेने आम्हा दोन्ही कुटुंबाना जेवायला बोलावले होते. अनिल हा माझा जिवलग मित्र पण १९९४ पासून त्याची माझी भेट नाही. तो अमेरिकेत स्थायिक झाला असे कळले आणि तो डेट्रॉईट मधेच होता. त्याला भेटण्याचा आनंद काही औरच. अनेक वर्षांनी भेटलो. त्याच्या पोटावरून आणि डोक्यावरच्या केसावरुन मला माझ्या वयाचा अंदाज आला. खूप गप्पा मारल्या. इतक्या वर्षांनी भेटलो असे वाटलेच नाही.

कॉलेज मित्र अनिल विसावले च्या घरी अप्रतिम जेवण आणि गप्पा टप्पा ..धमाल 
अनिलच्या मुलगा आणि अथर्व आणि आर्यन चांगलेच रमले. सौ. अनिता यांनी खूप छान जेवण केले होते. ते आम्ही दाबून खाल्ले. एवढेच नाही तर रात्रीसाठी पार्सल पण मी घेतले. मित्रांमध्ये काहीच फॉर्मॅलिटी नसते. त्यांना पण खूप आनंद झाला. फार आनंदात आम्ही परत आलो. या जेवणाची आम्ही अनेक दिवस चर्चा आणि स्तुती केली. विसावले परिवाराने आम्हाला खूप मानाने वागवले. त्यांचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन आम्ही निघालो. मित्रांचे प्रेम अमूल्य आहे.

भाग ३ - कॅनडामधून नायगारा धबधबा 

नायगारा धबधबा हा कॅनडामधून बघायचा असे आधीच ठरले होते व व्हिसा पण होता. त्याप्रमाणे एका दिवशी सकाळी लवकर निघालो. ४ तास ड्राईव्ह करून व अमेरिका बॉर्डर क्रॉस करून कॅनडा या दुसऱ्या देशात पोहोचलो. मध्ये एक नदी होती त्याच्या वरचा ब्रिज क्रॉस केला. भव्यदिव्य नायगारा धबधबा बघावा तर कॅनडामधूनच कारण तिथून फ्रंट व्युव्ह दिसतो. अमेरिकेतुन मात्र साइड व्युव्ह दिसतो.  हा नेत्रदीपक धबधबा, मग त्यातली बोट राईड, त्यातुन धबधब्याच्या अगदी जवळ जाणे, धबधबामधील टनेल बघितले. अत्यंत गजबजलेला हा भाग परंतु सर्व काही शिस्तीत त्यामुळे कुठेही गोंधळ नाही. या देशांनी पर्यटनस्थळे खूप छान पद्धतीने विकसित केली आहेत त्यामुळे जगभरातून पर्यटक इथे येतात.


नायगारा वॉटर फॉल कॅनडामधून बघणे अविस्मरणीय अनुभव 

आपले कोंकण जरी असे डेव्हलोप केले तर भागाचा पर्यायाने देशाचा विकास होईल. खूप एन्जॉय केले. सौ शलाकाने आम्हाला पुरून उरेल इतके जेवण दिले होते. ते आम्ही तिथेच गवतावर चटई टाकून मस्तपैकी वन भोजनाप्रमाणे जबाबदारीने खाल्ले. गावात झाडाखाली जेवण्यासारखा हा अनुभव होता. अमेरिकेत व कॅनडा मध्ये जागोजागो रेस्टरूम आहेत त्यामुळे कुठे अडचण नाही. 
 
नायगारा वॉटर फॉल येथील हिरवळीवर घराचा डब्बा खाल्ला . वन भोजन  
नायगारा वॉटर फॉल येथील हिरवळीवर पत्ते खेळलो 
अनेकदा आम्ही घरून डब्बा घेऊन जायचो याचे मुख्य कारण म्हणजे मी आणि अदिती व्हेज आहोत . तसेच हॉटेलमध्ये जेवायला आम्हाला विशेष आवडत नाही. कॉंटिनेंटल फूड तर आम्ही खातच नाही. आणि महत्वाचे म्हणजे सौ. शलाका अप्रतिम जेवण बनवते. अदिती पण तिला मदत करायची पण क्रेडिट शलाकालाच. त्यामुळे ती संधी आम्ही कधीच सोडली नाही. त्यात पैसे वाचवणे हा उद्देश नव्ह्ता. असो संध्याकाळी ४ वाजता आम्ही कॅनडामधून निघालो. निलेशने नॉनस्टॉप गाडी चालवली व मग निलेशच्या घरी पोहोचलो. निलेशचे ड्रायविंग स्टॅमिना जबरदस्त आहे. निलेशकडे दोन गाड्या आहेत . आम्ही Honda CRV ने फिरायचो. 
निलेशच्या गाडीत प्रवास करताना 
इथे लोक स्वतःच्या गाडीने फिरतात. रस्त्यावर चालणारी माणसे कमीच आणि असली तर ती हमखास इंडियन्स.  C. J. BARRYMORE येथील अमुसेमेन्ट पार्क मध्ये गेलो. तिथे मिनी गोल्फ, कार्ट रेसिंग वगैरे खेळलो खूप मज्जा. रोजचा दिवस म्हणजे आनंदउत्सव.

आर्यन आम्हाला खूप स्टोरी सांगायचा आणि निलेश त्याला खूप हॅन्डल द्यायचा खूप मज्जा यायची. एव्हाना अथर्वला आमच्या सतत काही कारण असो व नसो तरी हसण्याची सवय झाली होती आणि तो पण आमच्या टीममध्ये आला. प्रवासात गाडीत बसून आर्यन कंटाळला कि तो निलेश ला सतत म्हणायचं काका मी बोर झालो. असे तीन चार वेळा म्हटलं कि निलेश त्याला म्हणायचं बघ तुझ्या बोर  ने एक गोणी भरली आत्ता मी नवीन गोणी घेतो. या जोक रोज व्हायचा आणि आम्ही सगळे खो खो हसायचो. यात वाचणाऱ्याला बोर होईल पण मैत्री अशीच असते. डेट्रॉईट मधील सर्वात मोठा मॉल ग्रेट लेक मॉल मध्ये आर्यन लेगोलँड मध्ये गेला. तसेच निलेशने त्याला NIKE चे शूज घेऊन दिले. त्यामुळे आर्यन खुश होता. एकदा आम्ही डेट्रोईटच्या कम्युनिटी सेन्टर मध्ये गेलो तिथे टेबल टेनिस, स्नूकर खेळलो. 




ट्रॉय कम्युनिटी सेन्टर मध्ये 

निघायच्या दोन दिवस आधी निलेश ने त्याच्या मित्रांना फॅमिलीसकट घरी जेवायला बोलावले याला potluck म्हणतात. म्हणजे सर्व जण एकेक पदार्थ घरून बनवून येतो आणि सगळे जण एकाच्या घरी जमून खातात व टाइमपास करतात. त्यादिवशी ६-७ फॅमिली निलेशकडे आली. आमचे त्यांच्याशी ओळख करून दिली. खूप गप्पा मारल्या. याना इथे extended family म्हणतात. भारतासारखे इथे नातेवाईक वगैरे नसतात त्यामुळे सर्व भारतीय एकमेकांना धरून राहतात. जवळ जवळ संपूर्ण दिवस हे चालले. karaoke वर गाणी म्हटली. मी पण रिस्क नसल्यामुळे गायलो. खूप धमाल झाली. 

निलेशचे मित्र आम्हाला भेटायला आले. 

जाण्याच्या आदल्या संध्याकाळी आम्ही पॅकिंग करत असताना अचानक माझा मित्र रामकृष्ण भट ने फोन केला व तो मला घ्यायला निलेशच्या घरी आला. मग त्याच्या घरी गेलो. ते जवळच अर्ध्या तासावर होते. त्याला देखील १९९४ नंतर पहिल्यांदाच भेटलो. त्याची आम्ही कॉलेजमध्ये खूप खेचायचो. त्या आठवणी त्याच्या बायको पोरांना सांगितल्या ते पण खो खो हसत होते. रामकृष्णला कदाचित मला बोलावल्याचा पश्चात्ताप झाला असेल.  

रामकृष्ण भट निलेशच्या घरून  मला घ्यायला आला 
रामकृष्ण भट , १९९४ नंतर प्रथमच भेटलो 

 डेट्रॉईट वरून शिकागोला जाण्याचा दिवस उजाडला. सकाळी १०.४५ ची ट्रेन डेट्रॉईट स्टेशन वरून होती. व शिकागोला ती ४ च्या सुमारास पोहोचणार होती. डॉ. स्वप्ना आम्हाला घ्यायला येणार होती. स्वप्ना आणि अदिती यानी KEM मधून MBBS केले , तेव्हापासूनची त्या खास मैत्रिणी. निलेश मला स्टेशनवर सोडायला आला आणि एक गम्मत झाली. निलेश आमच्याबरोबर बॅग घेऊन ट्रेनमध्ये चढला व बॅग ठेवून तो उतरणार इतक्यात दरवाजे बंद झाले आणि ट्रेन चालू झाली.
डेट्रॉईट रेल्वे स्टेशनवर निलेश सोबत 

निलेश चुकून ट्रेनमध्येच राहिला आणि एक स्टेशन त्याने प्रवास केला 

शिकागो स्टेशनवर ट्रेन ने उतरलो 

धावत आम्ही दोघे दरवाजापाशी आलो पण ट्रेन चालू झाली होती. आत्ता पंचाईत कारण निलेशची गाडी पार्किंगमध्ये आणि ट्रेन पुढच्या स्टेशनला थांबणार , निलेशकडे तिकीट नाही. आम्ही ताबडतोब हा प्रकार TC ला सांगितलं आणि किती दंड ते विचारले. TC स्वतःच म्हटलं कि हे चुकीने झाले आहे. दंड नाही. पुढच्या स्टेशन ला उतरा. मग निलेश ने त्याच्या एका मित्राला त्या स्टेशन ला बोलावले आणि पुढच्या स्टेशन ला निलेश उतरला. दरम्यान आम्हाला हसायला अजून एक विषय मिळाला. शलाकाने नेहमीप्रमाणे जेवण डब्यामध्ये दिले होते. ते आम्ही संपवले. 
परतीच्या प्रवासात मला सर्व काही आठवत होते.निलेश शलाकाने आमची अत्यंत काळजी घेतली. कोणत्याही बाबतीत तक्रार नाही. अतिथी देवो भव हे आम्हाला सतत जाणवले. आम्ही १२ दिवस राहिलो त्या दिवसात त्या दोघांनीही सुट्टी घेतली होती. एकंदरीत प्रत्येक दिवसाचे उत्तम नियोजन केले होते. रोजचा दिवस हि एक नवीन जागा किंवा नवीन exitement  असायची. जेवण , नास्ता तर काय विचारूच नका एवढ अप्रतिम. शिकागोला आमची थोडी अडचण झाली तेव्हा निलेश ने लगेचच आमची डेट्रॉईट ला येण्याची ट्रेन तिकीट , घरातून शिकागो स्टेशन ला पोहोचायला गाडी केली. काही ठिकाणी आम्ही जायचो तिथे शलाका आधीच गूगल वर एक चांगले भारतीय हॉटेल सांगायची. घरात फ्रुटस तसेच खायला खूप काही असायचे. एवढ्या प्रवासात निलेशने मला कधीच खर्च करू दिला नाही. १२ दिवस दोघे आमच्या साठी खूप राबले. शलाका बरोबर माझे कधी जास्त बोलणे झाले नव्हते पण आत्ता चांगली मैत्री झाली. अथर्व हा निलेशपेक्षा खूप जास्त हुशार आहे  मित्र मिळणे भाग्याची गोष्ट आहे. चांगले मित्र मिळणे हे तर सौभाग्य आणि मैत्री टिकणे हे तर सर्वांच्या पलीकडे. त्यामुळे निलेश ला नो सॉरी नो थँक यू.
साधारण ५ तासांनी आम्ही शिकागो स्टेशन ला पोहोचलो . डॉ. स्वप्ना आम्हाला घ्यायला आली होती.   सासूचे निधन झाल्यामुळे तिला आम्हाला वेळ देता आला नाही याचे तिला खूप वाईट वाटले पण पर्याय नव्हता. शिकागोला आम्ही शिकागो फ्लायर मध्ये बसलो. ट्रम्प टॉवर बघितला शिकागो फिरलो. तिथली प्रसिद्ध शिकागो पॉपकॉर्न खाल्ले. स्वप्नाच्या प्रशस्त घरी पोहोचलो. निलेशसारखेच तिचे घर होते.


शिकागोमध्ये मिशिगन लेक वर स्वप्ना सोबत 

संमित , स्वप्ना चा नवरा याने आमचे खूप स्वागत केले. रात्री उशिरा माझा संजेश चौधरी हा मित्र आला. त्याच्याशी गप्पा मारल्या , खूप आनंद झाला.
संजेश चौधरी माझा कॉलेजचा जवळचा मित्र चिकागोमध्ये भेटायला आला 

उद्या म्हणजे २१ मी ला संध्याकाळी आम्हाला निघायचे होते. उद्या सकाळी स्वप्नाच्या सासूचे १२ दिवस विधीपूजा होती. त्यात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. स्वप्नाचे आई वडील , सासरे यांची भेट झाली. कॅरॉलदेखील तिथे आली होती. स्वप्ना - समित म्हणजे एक्दम कूल दाम्पत्य. खूप गप्पा गोष्टी झाल्या. स्वप्नाचे घर म्हणजे कायम लोकांची ये जा असते. सर्वाना त्यांनी प्रेमाने बांधून ठेवले आहे. मला तर हि जोडी खूप आवडली. 
दुपारी १२. ३० चे विमान reschedule  होऊन संध्याकाळी ५ वाजताची शिकागो - दिल्ली- मुंबई असे विमान होते. reschedule झाल्यामुळे दिल्ली ला रात्री ११ वाजत पोहोचनार आणि दिल्ली मुंबई विमान चुकणार हे स्पष्ट होते. आम्हाला २. ३० ला स्वप्ना आणि समित आम्हाला सोडायला शिकागो एअरपोर्ट ला आले.
सौ . स्वप्ना दवे व समित दवे आम्हाला सोडायला शिकागो एरपोर्टवर 


परत विमान फुल्ल होते. बोर्डिंग कार्ड घेण्यासाठी मोठी रांग होती. आम्हाला गप्पा मारता याव्यात म्हणून मी रांगेमध्ये शेवटी उभा राहिलो. अर्थात याचा खूप फायदा झाला. विमान ओव्हरबुक होते. त्यामुळे आम्हा तिघांना बिजनेस क्लास मध्ये अपग्रेड करण्यात आले. खूप आनंद झाला. दोघांची गळाभेट घेऊन आम्ही निघालो. असा प्रकारे खूप सुंदर आठवणी घेऊन आम्ही निघालो आणि बिजनेस क्लास मिळाल्यामुळे शेवट चांगला झाला. मी व अदितीने मुंबई ते सिंगापूर प्रवास बिजनेस क्लास ने केला आहे. डोमेस्टिक तर अनेकदा गेलोय. पण एवढा लांब प्रवास पहिल्यांदाच. त्यात आर्यन ची बिजनेस क्लास ची पहिलीच वेळ त्यामुळे तो खूप आनंदी झाला. spacious fully reclining seats , उत्तम जेवण , अंगावर ब्लॅंकेट तसेच कमी गर्दीची टॉयलेट्स यामुळे खूपच सुखात आलो. एरवी मी विमानात कधीच झोपत नाही पण यंदा ३ तास सलग झोपलो. १५ तास सलग प्रवासानंतर दिल्ली ला विमान रात्री ११ नंतर पोहोचले.  त्यानंतर मुंबई चे विमान नव्हते मग AIR INDIA ने आम्हाला हॉटेलमध्ये ठेवले व मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या विमानाने आम्ही मुंबई ला पोहोचलो. 


असा आमचा अमेरिका दौरा निलेश व शलाका गीते व माझ्या बायकोमुळे शक्य झाला व अविस्मरणीय झाला. यात आम्ही अमेरिका व कॅनडा हे दोन देश बघितले. तर शिकागो , वॉशिग्टन , मिशिगन , पेनिनसिल्वेनिया , ओहिओ हे ५ स्टेट १४ दिवसात फिरलो.

3 comments:

  1. तुम्ही प्रवासवर्णन खूप उत्तम प्रकारे लिहिता..सगळे प्रसंग आणि ठिकाणे अगदी डोळ्यासमोर तरळतात..👍👌

    ReplyDelete