Sunday, June 14, 2020

पाठकगुरुजी - व्यक्तिविशेष

१४ जुन २०२०

दत्तलिन श्री. जगन्नाथ चिंतामण पाठक (पाठकगुरुजी / अण्णा) (३ नोव्हेंबर १९२८ ते २० ऑगस्ट २०१४) यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. मला त्यांच्याबरोबर वावरण्याची संधी (१९९६ ते २० ऑगस्ट २०१४) मिळाली आणि त्या कालावधीत माझ्या दृष्टीने त्यांचे भौतिक व अध्यात्मिक जीवन व त्यातील काही गोष्टी शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न करतो. 


आधीची दोन मुले अल्पावधीतच देवाघरी गेली म्हणून पाठकगुरुजींच्या आईने एरंडोल च्या कागदीपुरा येथील दत्तमहाराजांकडे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला व जळगाव जिल्ह्यातील कासोदा या गावी पाठकगुरुजींचा जन्म झाला (3 नोव्हेंबर 1928) सर्वसाधारण मुलाप्रमाणे पाठकगुरुजी लहानपणी (लहानपणी काय शेवटपर्यंत) वैयक्तिक जीवनात मस्तीखोर आणि खोडकर होते. त्यांच्या बालपणीचे काही किस्से त्यांच्यावरील "जगन्मित्र " या पुस्तकात आले आहेत , त्यामुळे त्याचा उल्लेख टाळतो . गुरुजींना मी जेव्हा पहिल्यांदा बघितले तेव्हाच ते खूप हॅंडसम होते , मग बालपणी / तरुणपणी ते किती हॅंडसम असतील ?. मी त्यांना विचारायचो कि तुम्ही तुमच्या तरुणपणी मुलींना कसे इंप्रेस करायचा? म्हणजे त्यावेळी तरुण मुले कशी वागायची ? त्यांनी सांगितले आमच्या वेळी सर्वाना समान आणि सन्मानाची वागणूक होती. गावात सर्वजण एकमेकांना चांगलेच ओळखत त्यामुळे संपूर्ण गाव हे कुटुंबासारखेच होते. शिवाय आई वडिलांचा , वडीलधारी व्यक्तींचा खूप धाक होता. त्यामुळे मुलींना इंप्रेस करणे हा कधी विचारच यायचा नाही आणि असा ऑपशन पण नव्हता. परंतु मुले खूप व्यायाम करायची व शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुले हातावर शिर्षासन पद्धतीने चालायची. 

गुरुजींचे वडील त्यावेळी सर्वाधिक दंड बैठक मारायचे व मारुतीची एक छोटी मूर्ती त्यांना बक्षिसे म्हणून मिळाली होती. त्यानंतर गुरुजींच्या पिढीत गुरुजी , मला वाटते ५०० दंड व ५०० बैठक एका दमात मारायचे व बक्षिसे त्यांना मिळायचे. शेवटपर्यंत नियमित व्यायाम , योगासने , प्राणायाम गुरुजी करत असत. त्यामुळे त्यांचे शरीर पिळदार व स्टॅमिना प्रचंड होता. त्यांचे रिफ्लेक्स खूपच quick होते. ते कधीच थकायचे किंवा कंटाळायचे नाही. नजर व स्मरणशक्ती शेवटपर्यंत अतिशय तीक्ष्ण होती. त्यांच्या माहीम मुक्तिधाम सोसायटी मध्ये त्यांचे घर ५व्या मजल्यावर होते. व दिवसातून अनेकदा ते ५ मजले न थांबता , न थकता आणि न कंटाळता चढ उतरायचे  . त्यांची चालण्याची पद्धत अत्यंत जलद होती. पोलीस खात्यात नोकरीत असताना ते गिरनार ला गेले असताना तिथेच त्यांनी पादत्राणे घालायचे सोडले आणि अखेरपर्यंत ते अनवाणीच वावरले. फक्त भारतभर नव्हे तर दुबई , इंग्लंड , अमेरिका या देशातंपण ते अनवाणीच फिरले परंतु याचा त्यांनी गाजावाजा केला नाही.
गुरुजी अमेरिकेत
अमेरिकेत पूजा सांगताना गुरुजी 
अनवाणी चालूनदेखील त्यांच्या गतीने चालायला आपली दमछाक व्हायची. जेवण लिमिटेड होते व ते जगण्यासाठी खायचे, आपण खाण्यासाठी जगतो. ते फक्त २ तास रात्री झोपायचे आणि पहाटे २. ३० ला उठून बसायचे कारण गाणगापूरला त्यावेळी आरती होते. शेवटची अनेक वर्ष ते दिवसातून एकदाच जेवायचे. एवढे असूनसुद्धा त्यांच्यात ताकद / शक्ती खूप होती. एकंदरीत त्यांनी शरीराची उत्तम निगा राखली होती. त्यांना विशेष आजार नव्हता , थोडा दम्याचा त्रास होता. आणि अर्थात नॉर्मल सर्दी ,खोकला ,ताप असायचा पण गंभीर काहीच नाही. He was healthy person. आजारपण आणि हॉस्पिटलबरोबर T २० मॅच ते शेवटचे ८ महिन्यातच खेळले. 

व्यायाम , योगासन , सात्विक आहार , उपासनेतील  सातत्य, शुद्ध व स्वच्छ विचारसरणी , दत्त महाराजांवर अपार श्रद्धा , वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील स्वच्छ चारित्र्य त्याचबरोबर जन्मतः गोरा रंग , पाणीदार डोळे ,अंदाजे ५ फूट १० इंच उंची , व्यायामाने कमावलेले शरीर ते खूपच हँडसम दिसायचे. कोणत्याही बाबतीत व्यवहार स्वच्छ असल्यामुळे ते कधीच कोणापुढेही मिंधे झाले नाहीत तसेच त्यांनी कोणापुढेही कधीही हात पसरला नाही. त्यांना पेन्शन होती त्यामुळे त्यांचा कोणावर भार नव्हता. 

पोलीस खात्यातून ते DIG ऑफिस ला क्लास १ अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्याकाळी मुंबई पोलीस इन्स्पेक्टरच्या बदल्या त्यांच्या कडे होत्या परंतु कामातील सचोटीमुळे त्यांनाही पगाराव्यतिरिक्त कोणताही पैसे घेतला नाही. बदलीसाठी त्यांना अनेक इन्स्पेक्टर आमिष दाखवायचे पण ते कधीच भुलले नाहीत. वाईट मार्गाने पैसे कमावण्यापेक्षा सन्मार्गाने पोलीस खात्याचा पगार घेणे त्यांनी पसंद केले व त्याबाबतीत ते प्रसिद्धही होते.

गुरुजी नोकरीत असताना त्यांच्या कार्यालयात 
साहजिकच ऑफिसमधील सहकारी विशेषकरून महिला सहकारी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी यायच्या परंतु त्यांनी स्वतःचे चारित्र्य कायम जपले. सर्वानाच ते वडिलांसारखे वाटत व तसाच सल्ला / उपासना ते येणाऱ्या प्रत्येकाला देत. आयुष्यभर ते निष्कलंक जीवन जगले. अनेकांचे त्यांच्याशी मतभेद असतील किंवा या माणसाकडे कसा कायम लोकांचा गराडा असतो. याची असूया अनेकांना असेल पण त्यांच्या चारित्र्यावर कधीच कोणीही संशय घेतला नाही. गुरुजींना विचारले तर ते खरे बोलायचे त्यामुळे त्यांना सर्व जण दचकून असायचे (घाबरायचे हा शब्द योग्य राहील )

कडक शिस्त व वेळेचा सदुपयोग हा त्यांच्या जीवनसरणीचा अविभाज्य भाग होता. स्वच्छता / टापटीपपणा तसेच त्यांनी कोणाला लेखी सूचना दिल्या तर त्या self explanatory असायच्या . 

गुरुजींच्या सूचना  

गुरुजींचे अक्षर 
पैशाचा हिशोब ते पै आणि पै द्यायचे. आर्थिक व्यवहार त्यांचा स्वच्छ व पारदर्शक होता. पोलीस खात्यात असल्यामुळे शिव्या देणे हा एक अविभाज्य अंगअसतोच , ते कधी कधी भोस... च्या असे म्हणत पण नंतर त्यांनी ते बंद केले. 

ब्राम्हण असूनही किंवा पूजा अर्चा / भिक्षुकी करूनही त्यांची संचय करण्याची वृत्ती नव्हती. गुरुवारी माहीमच्या घरी त्यांच्याकडे दरबार असायचा आन दत्त महाराजांसाठी अनेकजण पेढे , मिठाई , नारळ , हार वगैरे घेऊन यायचे व ते तिथल्यातिथे वाटले जायचे. घरात अन्न धान्य साठा मात्र चांगला असायचा. त्यांच्या घरून कोणी कधी रिकाम्या हाताने किंवा उपाशी गेले असे मला आठवत नाही. अर्थात याचे श्रेय त्यांची पत्नी माई याना जाते. माणसांचा कायम राबता असायचा. भृगु संहितेचा आधार घेऊन गुरुजी पत्रिका बघून उपासना सांगायचे पण ज्योतिष हा त्यांचा विषय नव्हता. कधीतरी प्रश्न कुंडली मांडायचे. दत्त महाराज , नवनाथ , देवी उपासना ते उपाय म्हणून देत.

गुरुजींनी मांडलेली पत्रिका




जप कसा करावा याबाबत स्पष्ट सूचना गुरुजींच्या हस्ताक्षरात 

अमेरिकेतील एका मुलींसाठी जप केला आणि चमत्कार झाला



त्यांनी कधी कोणाकडून पैसे मागितले नाहीत व तशी अपेक्षाही केली नाही आणि घेतलेही नाहीत. गाणगापूरला आश्रम बांधण्यासाठी त्यांनी ट्रस्ट स्थापन केला होता त्यासाठी ते देणगी घ्यायचे व ताबडतोब रिसीट द्यायचे. लोकसंग्रह त्यांना आवडायचा किंबहुना तीच त्यांची ताकद होती. त्यांनी कधीच कोणालाही दुखावले नाही. हि बाब आम्ही अजून शिकलो नाही. 

माझे पत्र वाचून गुरुजींनी लाल पेन ने माझे सुंदर वर्णन केले आहे. 
त्यांची compatibilty खूप छान होती त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांशी त्यांचे पटायचे व त्या पद्धतीने ते गप्पा मारायचे. विनाकारण ते कोणाला सल्ला द्यायचे नाहीत. माहित नसलेल्या विषयाची ते माहिती घ्यायचे. असंख्य गुरुचरित्र पारायणे , २ गायत्री मंत्राचे अनुष्ठान , असंख्य जप , वेगवेगळ्या खडतर उपासना त्यांनी केल्या परंतु त्याची वाच्यता किंवा मार्केटिंग त्यांनी कधीच केले नाही. कारण सूर्य हा तेजस्वी असतो त्याला स्वतःची ओळख सांगायला लागत नाही. आपले मात्र तसे नाही. प्रचंड उपासना , अनुभव ,समाजात मान त्यांना होता. पण ते चांगले वक्ते मात्र नव्हते. कधी जास्त बोलायचे नाहीत. भाषण करणे हा त्यांचा पिंड नव्हता, अर्थात सूर्याप्रमाणे ते उभे राहिले कि प्रकाश पडायचाच. अत्यंत साधेपणाने बोलूनदेखील ते आपल्यावर भुरळ घालायचे. त्यांच्या बोलण्यात स्वच्छपणा होता. डोक्यातून न बोलतात ते डायरेक्ट हृदयातून बोलायचे त्यामुळे ते आपल्या थेट हृदयात पोहोचायचेच.
गुरुजी भाषण करताना 

धुळे येथे गुरुजींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार झाला ९ जुलै २००८
जीवन गौरव पुरस्कार 
धुळे येथे आम्हीपण गेलो होतो 


जातीवादाला त्यांच्याकडे थारा नव्हता. माणूस वर्नाने नाही तर कर्माने ब्राम्हण असतो हे त्यांचे ठाम मत. त्यामुळे सर्वधर्मीय लोक त्यांच्याकडे प्रेमाने , आपुलकीने यायचे. सर्वाना सामान वागणूक होती. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. त्यामुळे कोणाशी काय आणि कधी बोललो हे त्याना चांगलेच आठवायचे. तसेच ते कधी तणावात आलेले मी पहिले नाही. 

दत्तमहाराज हे त्यांचे आराध्य दैवत , याचा जप ते कायम करायचे व लोकांना पण जप / नामःस्मरण करायला सांगायचे. असंख्य गुरुचरित्र पारायणे त्यांनी केली होती. अनमोल प्रकाशनाचे गुरुचरित्र त्यांना आवडायचे व ते नित्य वापरायचे. त्यांच्याकडे गुरुचरित्र पोथी आली व त्यांनी ती वाचली कि एखाद्या मास्तराप्रमाणे त्यातील व्याकरण , शुद्धलेखन चुका ते दुरुस्त करायचे. एवढे त्यांना गुरुचरित्र पाठ होते. 


ओवी २१ मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे 

ओवी ५७ मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे  
ओवी ७५ मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे 

ओवी ५८मध्ये गुरुजींनी दुरुस्ती केली आहे 

गायत्री मंत्राचे २७ लक्ष चे एक असे दोन पुनश्चरण त्यांनी केले आणि तिसरे चालू आहे. संकल्पित असेल तर ते जप संख्या लिहून ठेवायचे आणि मोजायचे. मला तर त्यांनी सांगितले कि तू जप मोजत जाऊ नकोस , तूला कोणाला दाखवायचा आहे ? ज्याचा जप करतोस तो पक्का हिशोब ठेवतो. अर्थात काही विशिष्ठ कारणाने त्यांनी जप आणि संकल्पित जपसंख्या सांगितली असेल तर आठवडा / पंधरा दिवसाला कधी किती जप केला , किती बाकी आहे याचा हिशोब त्यांना द्यायला लागायचा. याबाबत ते फारच पर्टिक्युलर  होते.  एरवी ते कितीही मित्रत्वाने वागत असले तरी उपासनेच्या बाबतीत खूप कडक होते त्यात नो मैत्री. अर्थात त्यांनी सांगितलं आणि मी केला नाही असे कधीच घडले नाही. परंतु एकंदरीत त्यांचे बारीक लक्ष असायचे. कधीतरी अचानक फोन करून ते मंत्र म्हणायाला सांगायचे ,जप संख्या विचारायचे. त्यावेळेला अटक करायला आलेल्या पोलिसासारखे ते बोलायचे. समाधान झाले कि मग हसायचे आणि म्हणायचे मी तुझी तयारी बघत होतो. त्यामुळे त्यांचा फोन आला कि मी थोडा विचार करूनच फोन उचलायचो , आणि त्यावेळेला मनात विचार असायचे कि आत्ता हे काय विचारणार ?

दत्तचरणी प्रचंड  श्रद्धा / निष्ठा असूनदेखील त्यांनी कधीच अंधविश्वास केला नाही. कर्म करण्यावर त्यांचा भर असायचा. त्यांचे निर्णय हे प्रॅक्टिकल व ताबडतोब असायचे. त्यांचा सल्ला हा neutral असायचा. मोठे मोठे राजकारणी ,अधिकारी त्यांच्याकडे यायचे पण त्याचा त्यांनी कधी फायदा घेतला नाही. I dont have Godfather but God is my father म्हणून मला काही चिंता नाही असे ते म्हणायचे. 

गुरुजी गुरुपौर्णिमा , दत्तजयंती घरी साजरी करायचे . पण भक्तसंप्रदाय वाढल्यावर त्यांनी दादरला हॉल मध्ये साजरी करणे चालू केले. यात त्यांचे नियोजन , वेळेचा काटेकोरपणा जबरदस्तच होता. आता तो कोणालाही शक्य नाही. बारीक सारीक गोष्टीतील विचार ते नियोजन करताना करायचे. मी त्यांना नेहमी म्हणायचो कि तुम्ही एक चांगले event manager आहेत. खुपश्या गोष्टी करून देखील त्यांचा मानपान नसायचा. मानपान , अहंकार , मोठेपणा त्यांच्या जवळपासही नसायचा. जे काही आहे ते दत्तमहाराजांचे आहे अशी त्यांची कायम भावना असायची.

गुरुजी आणि त्यांची बहीण 

२०१२ सालची गुरुजींनी दादरला शेवटची गुरुपौर्णिमा साजरी केली 
२०१२ गुरुपौर्णिमा दादर येथे हॉल मध्ये 
ते कधीच कर्तेपणा  घ्यायचे नाहीत. प्रत्येक गोष्टींमध्ये involve पण असायचे  आणि याच वेळेला ते detach पण असायचे. एकाच वेळेला attach आणि detach असणे हि अध्यात्मातील एक मोठी पायरी त्यांनी स्वकष्टाने  आणि स्वआचरणाने प्राप्त केली होती. म्हणजे ते आपल्यात असायचे पण आणि नसायचे पण (difficult to explain ). 



श्री. विजय पाटील यांच्याबरोबर गुरुजी 

श्रीगुरुचरित्र या ग्रंथावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. गुरुचरित्र पारायण करण्याची उपासना / उपाय ते अनेकांना सांगत. गाणगापूरला गुरुचरित्र परायणाची सोया व्हावी म्हणून त्यांनी तिथे आश्रम बांधला ज्यात आज अनेक जण जातात , राहतात आणि पारायण करतात. 

गुरुजींनी बांधलेला जय गुरुदेव आश्रम गाणगापूर 

गाणगापुरात देखील एक सचोटीचे गुरुजी म्हनून त्यांची ओळख व ख्याती अजूनही आहे. श्रीगुरुचरित्र पारायण हे पुढील पिढीला सर्व नियमात राहून या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात करता येणार नाही हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्याला नियमांची सवलत होती. अर्थात ब्रम्हचर्य , अपेयपान , व्हेज जेवण यात तडजोड नव्हती. परंतु बाकी सर्व फ्लेक्सिबिलिटी होती. महत्वाचे म्हणजे श्रीगुरुचरित्र पारायण स्त्रियांनी करू नये अशी सर्वसाधारण प्रथा आहे पण गुरुजींकडे मात्र स्त्रिया सात दिवसांचे श्रीगुरुचरित्र पारायण नियमात राहून करत. माझ्या परिचयाच्या एका गुजराती स्त्री ने पारायण केले होते. व अशी अनेक उदाहणे मी पहिली होती. कोण काय बोललो तर मी जबाबदारी घेतो असे ते म्हणायचे आणि त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते. आणि निश्चितच त्यांच्याशी कोणी या विषयावर कधी वाद घातला नाही. थोडक्यात म्हणजे श्रीगुरुचरित्र पारायण यावर ते एक ऑथॉरिटी होते. 

देव हा सर्वाना सहज accesible व्हावा असा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. दत्तभक्ती प्रचारार्थ आणि प्रसारार्थ त्यांनी आयुष्य वेचले. आयष्याभर श्रीगुरुचरित्र पारायणाची माहिती त्यांनी सर्वाना सांगितली. अनेकांनी पारायणे गुरुजींमुळेच केली. अजुन्हि अनेकजण हि सेवा करत असतील. हे सर्व करताना त्यांनी कधीच कर्तेपणा स्वतःकडे घेतला नाही. दत्त महाराजांना ते सर्व श्रेय देत. "परमपूज्य पाठकगुरुजी यांनी त्यांच्या आयुष्यात हि दत्तमहाराजांची पालखी काढली आहे. त्यात अनेकजण सहभागी झाले. काहींनी पालखी उचलण्यात सहभाग घेतला , काहींनी पालखीला हात लावला. अनेकजण पालखीबरोबर चालले , असंख्यांनी दर्शन केले , अनेकांनी नमस्कार केला. हि संधी दिल्याबद्दल आपण सगळेच पाठकगुरुजींचे कायम ऋणी आहोत. गुरुजींच्याच शब्दात  सांगायचे तर हा जगन्नाथाचा रथ सर्वानी मिळून ओढला."     

बाहेर जाताना ते खांद्याला एक चामड्याची बॅग लावायचे . त्यात त्यांच्या वापरातील वस्तू असायच्या, राजा खैनी तंबाखू ते खायचे ती कायम सोबत असायची , पैसे असायचे  , यात प्रत्येक प्रकारची नोट असायची. वायफळ खर्च ते कधीच करत नसत. अनेक मंदिरात त्यांच्या ओळखी असायच्या पण ते नेहमीच रांगेतून दर्शन घ्यायचे. कधी कोणी ओळखले तर मात्र गुरुजी आले , गुरुजी आले असे म्हणत लोकांची धावपळ व्हायची व त्यांना आत नेले जाई. मानपान केला जाई. एका अत्यंत सामान्य व्यक्तीसारखी राहणीमान त्यांनी शेवटपर्यंत ठेवले. अर्थात सूर्याला स्वतःची ओळख कधीच सांगावी लागत नाही. तो स्वयंप्रकाशी असतो.

आश्रमातील बेसिन धुताना गुरुजींचा गुपचूप काढलेला फोटो

 एवढ्या असामान्य माणसाने पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी आपली सर्व संपत्ती , जबाबदाऱ्या वाटून टाकल्या होत्या. फक्त त्यांचेपेन्शन बँक अकाउंट चालू होते. त्यावंतिरिक्त काहीही नाही. आश्रमाचे कामकाज सोपवले होते. आपण सर्वजण प्रवासी आहोत आपलं प्रवास संपला कि आपल्याला सर्व मोह माया सोडून जायचेच आहे ते त्यांनी आधीच सोडले होते. आणि प्रवास संपताच सहजपणे ते पुढे निघून गेले. एकंदरीत गुरुजींचे जीवन म्हणजे एका सामान्य माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची , अपरिमित कष्टाची , अखंड दत्तसेवेची , अढळ विश्वासाची अविश्वसनीय कहाणी आहे. 

अनेक सत्पुरुषाबद्दल आपण वाचतॊ ऐकतो. तेव्हा आपल्याला असे वाटते कि आपण याना पाहिले असते / भेटलो असतो तर ? पण मी खात्रीने / अभिमानाने सांगतो कि एका अश्या अनामिक सत्पुरुषबरोबर आम्ही वावरलो/ बागडलो. अर्थात त्या कालखंडात ते आमचे सहप्रवासी असल्यामुळे त्यांचे एवढे मोठे व्यक्तिमत्व मला पूर्ण कळाले नाही.२० ऑगस्ट २०१४ ला ते पुढच्या प्रवासाला गेले आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टींचे वेगवेगळे / खोल अर्थ आत्ता उलगडू लागलेत. म्हणूनच हे लिहिण्याचा प्रयत्न. 

कालांतराने मला वाचन करता यावे म्हणौन हे लिहून काढले आहे. आता ते सोनेरी दिवस आठवले तरी मन रोमांचित होते. गुरुजी आज आपल्यात नाहीत हे सत्य मी स्वकारले आहे पण माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे हे निश्चितच आणि त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि यातून तुम्हाला जर गुरुजी कळले तर तुम्हीपण निश्चितच भाग्यवान आहात .  

गुरुजींवर  मी एक कविता लिहिली होती त्याने या लेखाची समाप्ती करूया. 

मला समजलेले गुरुजी 

 

गुरुजी म्हणजे प्रेमळ माउली । गुरुजी म्हणजे दत्ताची सावली ।

गुरुजी म्हणजे जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचा ध्यास  गुरुजी म्हणजे जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचा श्वास 

गुरुजी म्हणजे निष्काम कर्मयोग  गुरुजी म्हणजे सहज भक्तियोग 

गुरुजी म्हणजे अखंड नामस्मरण  गुरुजी म्हणजे सतत श्रीगुरुचरित्र पारायण 

गुरुजी म्हणजे जय गुरुदेव  गुरुजी म्हणजे "महाराज सांभाळतील

गुरुजी म्हणजे स्वच्छता आणि टापटीपपणा  गुरुजी म्हणजे वक्तशीरपणा 

गुरुजी म्हणजे आपले श्रद्धास्थान  गुरुजी म्हणजे आपले आशास्थान 

गुरुजी म्हणजे आपली समस्यांची तक्रारपेटी  गुरुजी म्हणजे आपल्या समस्यांचे निवारण 

गुरुजी म्हणजे जगन्नाथ चिंतामण  गुरुजी म्हणजे प्रतिभा जगन्नाथ 

गुरुजी म्हणजे आपली ८४ पायऱ्या  गुरुजी म्हणजे आपले मुक्तिधाम 

गुरुजी म्हणजे पाचलेगावकर महाराजांकंदील बालपण  गुरुजी म्हणजे दंडवतेबाबांचे शिष्यपण 

गुरुजी म्हणजे उत्कृष्ट पौरोहित्य  गुरुजी म्हणजे उपासनेत सातत्य 

गुरुजी म्हणजे गायत्री पुनश्चरण  गुरुजी म्हणजे दत्तयागाचे आयोजन 

गुरुजी म्हणजे निरंतर उत्साह  गुरुजी म्हणजे उपासनेवर श्रद्धा 

गुरुजी म्हणजे फल प्राप्तीसाठी सबुरी  गुरुजी म्हणजे "श्रीराम " आणि  "शुभं भवातु "

गुरुजी म्हणजे अनवाणी देशभरामन  गुरुजी म्हणजे अनवाणी परदेशगमन 

गुरुजी म्हणजे पारदर्शक हिशोब  गुरुजी म्हणजे पारदर्शक आणि निष्कलंक चारित्र्य 

गुरुजी म्हणजे दिवसातले २२ तास काम  गुरुजी म्हणजे आयुष्यभर कायम कष्ट 

गुरुजी म्हणजे कडक मास्तरांचा राग ।गुरुजी म्हणजे आईचा वात्सल्यपूर्ण धाक 

गुरुजी म्हणजे उत्कृष्ट "Event manager " गुरुजी म्हणजे सर्वमान्य " Arbitorator " 

गुरुजी म्हणजे योगासने , जोर अशी बलोपासना  गुरुजी म्हणजे अनंत दत्त उपासना  

गुरुजी म्हणजे सामान्य राहणी उच्च विचारसरणी   गुरुजी म्हणजे शून्य अहंकार  

गुरुजी म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त   गुरुजी कायम प्रसन्नचित्त  

गुरुजी म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आणि भक्कम आधार  


 [हि कविता ताम्रपत्रावर लिहुन पाठकगुरुजींना "जगन्मित्र " या पुस्तकाच्या प्रकाशन दिनी दि. २५ डिसेंबर २०१२ ला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. सध्या हे ताम्रपात्र आपल्या गाणगापूर आश्रमात आहे. ]

विशाल फुलपगार


दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा. 










4 comments:

  1. भाऊ लेख वाचून जुन्या सर्व आठवणी जाग्या जाहल्या , तुझ्या स्मरणशक्तीची दाद दिली पाहिजे. खूपच छान लिहले आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. स्मरण शक्ति चांगली आहे , त्यापेक्षाही ज्याचे स्मरण केले आहे तो जास्तच चांगला आहे

      Delete
  2. अचपळ मन माझे..नावरे आवरीता|
    तुजविण शीण होतो धावरे धाव आता|
    तू नमूद केल्याप्रमाणे गुरुजींचा आणि तुझा १८ एक वर्षांचा ऋणानुबंध.. तुझ्यात वैचारिक,आध्यात्मिक अनेक जाणिवा समृद्ध होतांना अनुभवता येतं.. त्यांच्या अनेक आठवणी 'मर्मबंधातली ठेव' आपुलकीने जपून ठेवणं ही फार मोठी आदरांजली आहे..नमन 🙏

    - हीना सराफ

    ReplyDelete