पाठकगुरुजींची स्कुटर
पाठकगुरुजींची एक स्कुटर होती, त्याच्या काही आठवणी आज सांगतो. विशेष मोठा लेख होणार नाही. पण ती एक आठवण आहे आणि सांगणे गरजेचे वाटते. काही गोष्टी मला गुरुजींनी सांगितल्या होत्या व काही गोष्टींची मी अधिकची माहिती घेतली.
त्यावेळी गुरुजी व त्यांची मुले म्हणजे राजूदादा, संजय, अजय व मुलगी जया हे वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनी, बांद्रा (पू), मुंबई येथे B-43/8 या ठिकाणी राहायचे. गुरुजींचा भाऊ, ज्याला सर्वजण प्रभुकाका म्हणतात, हा नवी मुंबई मध्ये नोकरीस असल्यामुळे सोबतच राहायचा. गुरुजी सकाळी दूध केंद्र चालवायचे मग तिथून घरी येऊन व्यंकटेश देशपांडे, मकरंद सोसायटी दादर या हायकोर्ट वकिलांकडे १ तास टायपिंग करायचे. मग तिथून ऑफिसला जायचे. दुधकेंद्र चालवून त्यांना जे पैसे मिळायचे त्यात ते दूध विकत घ्यायचे. कारण त्यांचे कुटुंब मोठे आणि येणारे जाणारे खूप, त्यामुळे चहा सतत बनत असे. दूध केंद्र, वकिलांकडे टायपिंग आणि नोकरी, अशा तीन मार्गाने त्यांना (अल्प)उत्पन्न मिळत होते. कष्ट करून त्यांनी विनातक्रार संसार चालवला हे विशेष. अर्थात याचे ९९% श्रेय त्यांची पत्नी म्हणजे माई याना आहे आणि बरेचसे श्रेय त्यांच्या अपत्यांना आहे. पहाटे लवकर उठून ही उशिरा झोपणे हे त्यांच्यासाठी नित्यनेमाने होते. याशिवाय त्यांची वैयक्तिक उपासना चालायची, त्यासाठी पण वेळ लागायचा. एकंदरीत त्यांच्या दत्ताने त्यांना काही कमी पडू दिले नाही आणि जास्ती तर अजिबातच दिले नाही.
सर्व मुले देखील गरिबीतच वाढली व वेळोवेळी नातेवाईकांपासून किंवा बरोबरच्यापासून त्यांचा अपमान झाला असेलच. शिवाय मुलांच्या इच्छा आकांक्षांची पूर्तता झाली नसेलच. आणि हे सर्व गुरुजींना ठाऊक होतेच. आता मात्र त्यांची सर्व मुले, स्वकष्टाने, मेहनत करून आणि आई वडिलांच्या पुण्याईने चांगली settle आणि समाधानी आहेत. सर्वांची स्वतःची घरे आहेत. घरात सुबत्ता आहे.
Ok, तर आपण स्कुटरकडे वळूयात. गुरुजींना ऑफिस, वकीलाकडे टायपिंग आणि घर या ठिकाणी जाण्यासाठी वेळ वाचावा म्हणून स्कुटर घ्यावी असे कोणीतरी सुचवले, कारण त्यामुळे वेळ व पैसे वाचणार होते. स्कुटरची किंमत त्यावेळी रु. ५२००/- होती व स्कुटर घेण्यासाठी २/३ वर्षाचे वेटिंग असायचे. त्यात पोलिसांचा स्पेशल कोटा असायचा. त्यांत २-३ महिन्यात स्कुटर मिळत असे. पाठक गुरुजी पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांना लगेचच स्कुटर मिळणार होती. अर्थात नेहेमीप्रमाणे गुरुजींनी पैशाची जमवाजमव करुनही ५२०० रुपये काही जमेनात. मग त्यांचे भाऊ मधुकाकानी त्यांना पैसे दिले. अश्या रीतीने १९७७-७८ ला पिस्ता रंगाची बजाज वेस्पा १५० CC स्कुटर गुरुजींच्या घरी आली. व माईने तिची विधिवत पूजा केली. काही काळाने मधुकाकाने पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला व मग एकदा तो स्कुटर घेऊन गेला.(खरे म्हणजे या दोन भावांमध्ये काय बोलणे झाले ते मला माहित नाही ,त्यामुळे हे का झाले हे मी नक्की सांगू शकत नाही) मुले खूप नाराज झाली. मग माईची बहीण प्रभा मावशी हिला कळले मग तिने पैसे दिले आणि स्कुटर परत गुरुजींकडे आली. मग थोड्या महिन्यांनी गुरुजींनी तिच्या पैशाची परतफेड केली.
त्याकाळी दारात स्कुटर असणे म्हणजे मोठी गोष्ट होती. त्यांच्या बिल्डिंग खाली मुलांनी स्कुटर ठेवण्यासाठी एक छोटेसे गॅरेज बनवून घेतले. सर्व मुले गुरुजींबरोबर स्कुटरवर बसायची. माई मात्र जास्त जायची नाही. क्वचित प्रसंगी गुरुजी, माई आणि सर्व मुले स्कुटरवर एकत्र गेली असतील. सर्वात जास्त गुरुजींचा धाकटा मुलगा अजय हा स्कुटरवरून गुरुजी बरोबर फिरायचा. गुरुजी पेडर रोडला एका गुरुजींकडे जायचे, तिथे मात्र ते किंवा ते आणि माई स्कुटरवरून जायच्या हे मला त्यांनी सांगितल्याचे आठवते.
आता गुरुजी स्कुटर चालवणार म्हणजे सर्व नियम पाळूनच चालवणार हे काही सांगायला नको. शिवाय ते स्वतः पोलीस खात्यामध्ये म्हणजे काही विचारूच नका. कडक शिस्त हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. स्कुटरचा स्पीड कधी ४० च्या वर जायचा नाही. त्यावेळी रस्त्यावर ट्राफिक कमी होते. स्कुटर पुसायला चावी संजयच्या हातात मिळाली की मग तो कलानगर पर्यंत खूप वेगाने जाऊन जायचा. पाठक कुटुंबियांच्या वतीने सर्व नियम गुरुजी पाळत असल्यामुळे संजय व अजय हे धाडसी आणि उपद्व्यापी होते. मोठा राजू मात्र नियमात राहून असायचा. यावर अधिक काही लिहित नाही. नाहीतर सर्व पाठक भावंडं एक होतील आणि माझ्यावर आक्रमण होईल.
गुरुजींचे जीवन हे धावपळीचे होते आणि त्यांचे काम हे टाइम टेबल प्रमाणे चालायचे. सकाळी दूध सेन्टर , नंतर वकिलांकडे टायपिंग नंतर ऑफिस व मग घरी. त्यांचा येण्या जाण्याची वेळ फिक्स असायची. एकदा ऑफिसमधून स्कुटरवरून परत येत असताना संध्याकाळी किंग्स सर्कलला अरोरा सिनेमा जवळ त्यांच्या स्कुटर ला एका ट्रकने मागून ठोकले. अंदाजे रात्रीचे ८ वाजले असावेत. गुरुजी पडले आणि स्कुटरचे चाक त्यांच्या पायावर. त्यात त्यांच्या पायाचे हाड मोडले व बराच रक्तस्त्राव झाला. बाकी ठिकाणीही लागलेच. माणूस कितीही मोठा किंवा छोटा असो एकदा रस्त्यावर पडला की मग तो सामान्य होतो. आणि कोणीतरी मदत केली तरच काही खरे. म्हणूनच बहुधा "रस्त्यावर आलो" म्हण प्रचलित असावी. लोक लगेच धावली, एक ट्राफिक पोलीस आला. गुरुजींनी त्याला आपली ओळख सांगितली आणि ते बेशुद्ध झाले. पोलीस खात्याचा माणूस आहे हे समजल्यावर त्या पोलीसाने स्वतः त्यांना ताबडतोब सायन हॉस्पिटलला हलवले. त्यांची स्कुटर पोलीस स्टेशनला नेली. ट्रक ड्राइवरला पकडले.

इकडे मात्र गुरुजी अजून आले नाहीत म्हणून घरातले सर्वजण चिंतेत होते. प्रभुकाकाने त्याच गव्हर्नमेंट कॉलोनी मध्ये राहणाऱ्या गुरुजींच्या सहकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा कळाले की ते ऑफिस मधून वेळेवर निघाले होते. मग ते गेले कुठे ? काहीच कळेना. रात्री अंदाजे ११ वाजता स्थानिक पोलीस स्टेशनचा एक पोलीस घरी आला त्याला वायरलेस वरून निरोप मिळाला व त्याने सांगितले कि पाठक साहेबाना सायन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आहे आणि त्यांचा अपघात झाला आहे. सगळे जण जवळपास रडायलाच लागले. प्रभुकाकाने धीर दिला. मग मुलांना घरीच ठेवून माई आणि प्रभुकाका टॅक्सीने सायन हॉस्पिटलला गेले. तिथे गुरुजींच्या पायाला प्लास्टर , शरीरावर जखमा आणि त्यांना रक्त चढवत होते. तेव्हा ते शुद्धीवर होते. इथे घरी मात्र सर्व मुले खूपच घाबरली होती. त्यांना कळायला काहीच मार्ग नाही. पहाटे माई आणि प्रभुकाका परत घरी आले कारण दूध सेन्टर तर चालू करायला पाहिजे , तेव्हा मात्र मुलांचा जीव भांड्यात पडला. जवळ जवळ ३ आठवडे ते सायन हॉस्पिटल मध्ये होते. घरी आल्यावर ते परत जोमाने कामाला लागले.
ट्रक ड्राइवर स्वतःची चूक मानायला तयार नव्हता , मग त्याच्यावर कोर्टात केस झाली आणि ७/८ वर्षांनी त्याचा निकाल लागून गुरुजींना नुकसान भरपाई मिळाली.
गुरुजींचा मोठा मुलगा राजू नाशिकला नोकरीनिमित्त शिफ्ट झाला व तो कामाला सायकलने जायचा. ते ठिकाण लांब होते. मग गुरुजींनी राजूला स्कुटर दिली. व स्कुटर नाशिक ला शिफ्ट झाली. राजू पण गुरुजी प्रमाणे नियमात राहून चालवायचा. पण गुरुजी एकदाच पडले आणि राजू मात्र दरवर्षी स्कुटरवरून घसरायचा, पडायचा किंवा काहीतरी होऊन त्याचा अपघात व्हायचा. हा वार्षिक कार्यक्रम राजूदादाने बरीच वर्ष चालवला. नेहमी बोलायचा, अरे माझी काहीच चूक नाही. मग राजू पडला की मग माई आणि गुरुजी नाशिकला राजूदादाकडे राहायला जायचे. राजूला दोन मुले ओंकार आणि गायत्री. आणि हो दोन्ही नातवंड गुरुजी माई ची खूप लाडाची होती. मध्यंतरी २/३ वर्षे सलग ते नाशिकलाच राहायला होते. राजूदादाची बायको सुचेतावहिनी या ग्लॅक्सो कंपनी मध्ये कामाला होत्या. सकाळी जाताना त्या स्वयंपाक करून जायच्या. माई आणि गुरुजींची चांगली काळजी घ्यायच्या. आम्ही देखील त्यांना भेटायला नाशिकला जात असू. आमचे मनापासून स्वागत करायच्या. कालांतराने ती स्कुटर विकली.
अजयने स्कुटर खूप चालवली, संजयने पण चालवली पण कधीच अपघात केले नाहीत. आज खूप शोधाशोध करुनपण त्या स्कुटरचे फोटो मिळाले नाहीत. पण एक छान आठवण लिहून काढली. मलाच मज्जा आली. तुम्हाला पण नक्कीच हि आठवण आवडली असेल.
विशाल फुलपगार

![]() |
| पाठक गुरुजी , तीनही मुले आणि सुनांबरोबर त्रंबकेश्वर येथे नारायण नागबलीसाठी गेले असताना एक दुर्मिळ फोटो |
![]() |
| नाशिक राजू दादाच्या घरी गुरुजी व माई , ओमकार व गायत्री या लाडक्या नातवंडांबरोबर सोबत सून सुचेतावहिनी |
अजयने स्कुटर खूप चालवली, संजयने पण चालवली पण कधीच अपघात केले नाहीत. आज खूप शोधाशोध करुनपण त्या स्कुटरचे फोटो मिळाले नाहीत. पण एक छान आठवण लिहून काढली. मलाच मज्जा आली. तुम्हाला पण नक्कीच हि आठवण आवडली असेल.
विशाल फुलपगार
दत्तलीन श्री. पाठक गुरुजी यांच्या जीवनावरील "जगन्मित्र" या पुस्तकाचे विमोचन स्वातंत्रवीर सावरकर स्मारक , दादर , मुंबई येथे २५ डिसेंबर २०१२ ला मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तो कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा.
https://www.youtube.com/watch?v=V32T5DWEor8&list=PLsAsEAuSOBwdOoqO44f_ZFkqLrO7aPsva&index=2&t=7904s

हो खूपच आवडली आणि वाचतानाही मजा आली..
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteछान
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान लिहिल्यात आठवणी
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान लिहिलंय.साधं,सरळ आणि स्पष्ट!
ReplyDeleteधन्यवाद
Delete