Sunday, June 13, 2021

ऍड. जयदेवराव गायकवाड B. A., L. L. M.

ऍड. जयदेवराव गायकवाड B. A., L. L. M.   



माझ्या आजीचे सक्खे भाऊ शिशुपाल गुरुजी व त्यांचे जावई म्हणजे ऍड. जयदेव गायकवाड. मी त्याना लहानपणापासून मामा म्हणतो. 

आमचे खार येथील घर / बंगला म्हणजे सामाजिक चळवळीचे ठिकाण होते. माझे आजोबा लक्ष्मणराव फुलपगार (गुरुजी ) हे स्थानिक भागात व सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांचे जवळचे मित्र किंवा सहकारी म्हणजे शिशुपाल गुरुजी आणि माळवे गुरुजी. त्यामुळे या दोघांचेही आमच्या घरी नेहमीच येणे जाणे असायचे. त्याव्यतिरिक्त अनेकजण त्यांचे प्रश्न घेऊन किंवा चर्चेसाठी / मार्गदर्शनासाठी व इतर अनेक गोष्टींसाठी आमच्याकडे यायचे त्यामुळे घर कायम गजबजलेले असायचे. 

लहानपणापासूनच आमच्या घरात जयदेवराव गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख होत असे. दोन्ही कुटुंबामध्ये उत्तम संबंध आहेत. मामांचा राजकारणातील सहभाग , दलितांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी केलेली आंदोलने , त्यांनी लढवलेल्या निवडणूका व त्यांच्या एकंदरीत सामाजिक दृष्टिकोनाबद्दल माझ्या आजोबाना विशेष कौतुक होतेच. दलित पॅन्थर , भारतीय रिपब्लिकन पार्टी यांच्या स्थापनेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका, नामदेव ढसाळसाहेब तर त्यांचे सक्खे मावसभाऊ , त्यामुळे एक लढवय्या माणूस म्हणून त्यांची ओळख होती. साधारणपणे १९९० का ९२ ला काही कार्यक्रमानिमित्त त्यांनी आम्हाला त्यांच्या पुणे येथील घरी बोलावले. साल नक्की आठवत नाही परंतु काहीतरी कौटुंबिक कार्यक्रम होता हे मात्र नक्की. अशा प्रकारे फुलपगार कुटुंबियांना त्यांच्याकडे राहायला जायचा योग आला. 

दलित चळवळीतील नेत्यांबद्दल त्यावेळेला माझे काही विशेष चांगले मत नव्हते. कालांतराने ते मत पूर्णपणे बदलले आणि यात गायकवाड साहेबांचाच हात आहे. 

आम्ही ७-८ फुलपगार कुटुंबीय मुंबईहून ट्रेन ने पुण्याला पोहोचलो. आमच्याकडे त्यांचा लेखी पत्ता नव्हता. अर्थात माझे वडील आणि काका ना ते कुठे राहतात हे माहित होते. पुणे स्टेशन ला उतरून किव्हा पुण्यात कोणत्याही रिक्षावाल्याला सांगितले कि गायकवाड साहेबांच्या घरी जायचे आहे कि तो त्यांच्या घरी सोडतो असे आम्ही ऐकून होतो.  आणि खरेच २-३ रिक्षाने आम्ही त्यांच्या गोखलेनगराच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलो. साहेबांचे पाहुणे म्हणून त्या सर्वानी आम्हाला नमस्कार केला. 

अजून मला स्पष्ट आठवतेय कि मी रिक्षातुन उतरलो आणि बिल्डिंग कडे पाहिले तर दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या नावाची पाटी होती. "ऍड. जयदेवराव गायकवाड B. A., L. L. M.". 

माझे पहिलेच इम्प्रेशन जबरदस्त झाले. म्हणजे ते master in law आहेत , उच्चशिक्षित आहेत. माझे आजोबा आणि आजी दोघेही मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते त्यामुळे शिक्षणाचे महत्व माझ्या मनावर लहानपणापासूनच बिंबवले होते. दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या घरी गेलो. मामा आणि मंदामामी ने हसतमुखाने आमचे स्वागत केले. घर छोटे होते आणि घरात खूपच पुस्तके होते. म्हणजे लायब्ररी व घर एकाच ठिकाणी असेल तर जसे दिसेल तसे. मी देखील खूप वाचन करतो , त्यामुळे मला साहजिकच हे घर खूप आवडले. 

मामा एका सामान्य व्यक्तीप्रमाणे घरी होते. नेतेपणाचा कुठलाही बडेजाव त्यांच्याकडे नव्हता. खरे म्हणजे ते नेते आहेत असे मलातरी तेव्हा माहित नव्हते पण ते खूप प्रसिद्ध आहेत हे मात्र माहित होते. घरी सतत कार्यकर्ते येत जात होते आणि विशेष म्हणजे सगळे गरीब कार्यकर्ते असायचे. मामी सर्वाना चहापाणी देण्यात आणि विचारपूस करण्यात व्यस्त असायची. खरे म्हणजे त्यांच्या यशात ९०% वाटा मंदामामी चा आहे. कारण सर्व लोकांना तिने सांभाळले. 

आमची बाजूच्या खोलीत राहायची व्यवस्था केली होती. माझी औपचारिक ओळख झाली तेव्हा त्यांनी मला विचारले कि तुम्ही काय करता ? वास्तविक मी खूपच लहान पण त्यांनी माझी अत्यंत आदराने आणि सन्मानपूर्वक चौकशी केली.  घरी आलेल्या प्रत्येकाचीच ते अत्यंत सन्मानाने चौकशी करत. यामुळे त्यांच्या विषयी आदरभाव साहजिकच वाढला आणि तो अजूनही प्रत्येक भेटीमध्ये वाढतोच आहे.  

त्या दोन तीन दिवसाच्या वास्तव्यात मामा ना खूप observe केले. आणि त्यांचा मी फॅन झालो हे मात्र खरे. नंतर आमचे संबंध वाढत गेले आणि अनेकवेळा पुण्याला जाणे होत राहिले. 

सांगण्यासारखे बरेच काही आहे, परंतु आत्ता त्यांच्या आमदारकीच्या काळातील दोन वर्षे त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली त्याबद्दल सांगतो. 

दलित पॅन्थर , भारतीय रिपब्लिकन पार्टी या संगठनांच्या स्थापनेत आणि एकंदरीत दलित चळवळीचे ते founder आणि सक्रिय नेते आहेत. एक वैचारिक नेता म्हणून ते महाराष्ट्रभर न्यात आहेतच. परंतु त्याच्या सामाजिक चळवळीला एक कौटुंबिक वारसा देखील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुंबई मध्ये ११ नोव्हेंबर १९१७ साली पहिला सत्कार झाला, त्यावेळी बाबासाहेबांचा सत्कार करण्याचा ठराव त्यांचे वडील मारोतराव गायकवाड यांनी मांडला होता. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. परंतु त्यांनी या संदर्भाचे कधी राजकीय भांडवल केले नाही. अनेकांना तर हे माहितदेखील नाही. स्वतःच्या मेरीटवर  महाराष्ट्रामध्ये स्वतःचे नाव केले आहे. "शिका , संघटित व्हा , संघर्ष  करा " हि बाबासाहेबांची विचारसरणी त्यांनी अंगिकारली. 

कुठलेही पाठबळ नसताना , पैसे नसताना देखील निव्वळ कार्यकर्ता ,कार्य आणि कष्ट या जोरावर त्यांनी लोकसभा , विधानसभा निवडणूक लढवल्या आणि खूप मते मिळवली. राजकारणामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. एवढ्या मोठ्या सामाजिक जीवनात त्यांच्याबद्दल वाईट बोलणारा कोणी सापडणार नाही. राजकीय मतभेद असले तरी त्यांचे वैयक्तिक संबंध सर्वांशीच कायम चांगले राहिलेत. द्वेष , मत्सर यापासून ते कायमच खूप दूर राहिलेत. 

पंढरपूर लोकसभा निवडणूक ते भारिप कडून लढले आणि त्यात त्यांना दिड लाखावर मत मिळाली. काहीच बॅकिंग नसताना एवढी मत मिळवणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे, मी त्यांना या निवडणुकी बद्दल विचारले असता ते म्हणाले कि अरे मी दुसऱ्या क्रमांकावर होतो. मी निवडणूक हरलो असे म्हटले नाहीत. यावरून त्यांची पॉसिटीव्ह विचारसरणी दिसून येते. 

उच्च प्रतिभा आणि कॅपॅबिलिटी असूनदेखील त्यांना आमदारकी किव्हा खासदारकी मिळू शकली नाही. कालांतराने त्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी तेव्हा सत्तेत होती पण त्यांना सत्तेचे पद मिळू शकले नाही. असे का झाले याचे उत्तर माझ्याकडे नाही. विधानपरिषद किव्हा राज्यसभा मिळेल असे वाटले,  पण दर वेळेला हि संधी हुकायची. मी अनेकदा त्यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले कि राजकारणात सर्वकाही अचानकच होते आणि पवार साहेबांवर माझा विश्वास आहे. अर्थात नाउमेद ना होता त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षविस्तारात महाराष्ट्रभर दौरे केले आणि संगठन उभे केले. मिळालेल्या वेळेत लिखाण , वाचन चालू होतेच . २-३ पुस्तकेदेखील त्यांनी प्रकाशित केली. 

अचानक साधारणपणे २०१२ ला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले. सर्वानाच याचा खूप आनंद झाला. आपला एक माणूस आमदार झाला याचा आनंद तर होताच परंतु कष्टकऱ्यांचे , दलितांचे, सामान्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी हक्काचा आमदार झाला तसेच जयदेवराव सारख्या संघर्षशील कार्यकर्त्याला विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली याचा जास्त आनंद होता. 

वास्तविक त्यांची क्षमता पाहता त्यांची राज्यसभेवर नियुक्ती होणे जास्त सयुक्तिक होते. कारण देशभरातील दलित समाजाच्या प्रश्नच अभ्यास त्यांचा आहेच. त्याव्यतिरिक्त देशातील दीन ,दुर्बल ,शोषित दलित घटकांना एकत्र आणून , संघटित करून ती ताकद शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आणण्याची त्यांची कॅपॅबिलिटी आहेच. पण असे अजूनपर्यंत तरी झाले नाही. 

असो २०१२-२०१८ पर्यंत त्यांची आमदारकी होती. साधारणपणे २०१६ ला मी त्यांना विनंती केली कि मला विधानभवनात कामकाज बघण्याची / समजण्याची इच्छा आहे. ते मला म्हटले कि तू अधिवेशन काळात आणि मी मुंबईमध्ये आलो कि येत जा. 

या दरम्यान माझे त्यांच्या इन्टेरॅक्शन खूपच वाढले. विधानभवनाच्या प्रत्येक अधिवेशनात मी त्यांचा बरोबर असे. मुख्यमंत्री , मंत्री , विरोधी पक्षनेता याना जवळून बघण्याची ऐकण्याची संधी मिळाली. त्यावेळेला राष्ट्रवादी विरोधी पक्षात होती त्यामुळे घोषणाबाजी, आंदोलन , सभात्याग बघायला मिळाले आणि त्यांचे महत्व कळले. 

विधानपरिषदेत ते नेहमी वेळेवर उपस्थित राहत आणि कामकाज संपल्यावरच निघत. चर्चेमधे सहभागी होणे. त्यांनी मांडलेले प्रश्न , त्याचा पाठपुरावा हे सर्व मी पाहिले. इतर सदस्याप्रमाणे त्यांच्या भाषणात ऍक्टिंग नसायची. पण ज्याला कोणाला अभ्यासपूर्ण भाषण ऐकायचे असेल त्याचसाठी हि पर्वणीच. सत्ताधारी पक्षाला ते अनेकदा कोंडीत पकडत. त्यामुळे आपोआपच त्यांची प्रतिमा एक अभ्यासू आमदार म्हणून प्रसिद्ध झाली. चर्चा करताना ते मूळ विषयापासून दूर न जाता स्वतःची बाजू ठामपणे मांडायचे आणि यात ते लाजवाब आहेतच. भारतीय राज्यघटना यावर त्यांचा अनेक आमदार सल्ला घेत असत.  रिकाम्या वेळेत ते विधानभवनात लायब्ररी मध्ये जाऊन वाचन करायचे. एवढ्या समृद्ध लायब्ररी  मध्ये ते दिवसातून किमान एकदा जात असत. आणि पुस्तके सोबत असली कि ते लहान मुलाप्रमाणे आनंदित असतात. 

त्यांच्या बॅगेत कायम पुस्तके असतात. पुस्तक वाचणे , त्याचे टिपण काढणे , लेखकाला काय सांगायचे आहे याचा विचार करणे. समाजात कुठे अन्याय झाला असेल तर ताबडतोब त्याची माहिती घेऊन विधानपरिषदेत ते विषय मांडणे. यात ते नेहमीच व्यस्त असायचे. सर्वपक्षीय आमदार / मंत्री यांच्याशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध. परंतु त्याचा त्यांनी कधी फायदा / गैरफायदा घेतला नाही. चळवळीतून कार्य केल्यामुळे ते कधीच भांडवलशाही विचारसरणीचे नाहीत. 

विधानभवनात सर्वच अधिकारी / कर्मचारी वर्गात ते अत्यंत लोकप्रिय. कधीच कोणाला त्रास दिला नाही. विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये तर ते खूपच प्रसिद्ध. त्यामुळे विधानभवनात / मंत्रालयात शिरल्यावर आत जाईपर्यंत त्यांना सर्व जण सलाम ठोकत व ते देखील सर्वांची विचारपूस करीत. त्यांच्याकडे महाराष्ट्र भरातून अनेक जण काही समस्या / काम घेऊन येत. हे सर्व सामाजिक काम असत.  पैसे मिळतील असे कुठलेही काम नसत. पण त्यांना यात खूप आनंद. आमदार म्हणून पगार झाला कि ते ATM मधून पैसे काढत आणि खर्च करीत. त्यांना मनोरा - आमदार निवास येथे D २५ हि खोली होती. तिथे अनेकजण येत आणि जेवण नास्ता केल्याशिवाय ते कोणालाही परत पाठवत नसत. मला ते सांगायचे कि त्यांच्या तरुणपणी ते जेव्हा मुंबईत यायचे तेव्हा कोणाच्या तरी ओळखीने आमदार निवासात राहायचे, कधीतरी आमदार निवासाच्या passage मध्ये झोपायचे कारण खिशात पैसे नसायचे. याची जाणीव त्यांनी कायमच ठेवली. तरुणपणी केलेल्या संघर्षकाळात भूक काय असते ते त्यांना लक्षात ठेवले. 

स्वतःचे शारिरीक , मानसिक स्वास्थ्य त्यांनी जपले . व्यायाम , योगासने, पोहणे, walking  ते नियमित करतात. त्यामुळे ते अतिशय healthy आहेत. कोणत्याही गोष्टीत ते खूप exited होत नाहीत किंवा नाराज होत नाहीत, तसेच कोणाबद्दलही असूया बाळगत नाहीत. त्यामुळे त्यांना रक्तदाब , मधुमेह असा कोणताही आजार नाही.  He is a balnced personality. 

त्यांची कॉम्पॅटिबिलिटी चांगली आहे त्यामुळे ते सर्वाबरोबर छान गप्पा मारतात व सगळ्यांशी त्यांचे चांगलेच पटते व सर्व वयोगटातील लोकांना ते आवडतात. आमदारकी मिळूनही त्यांच्या वागणुकीत काहीच फरक पडला नाही. कार्यकर्त्यांमध्ये वावरणे , त्यांच्याबरोबर रस्त्यावर उभे राहून चहा पिणे त्यांना आवडते. He is a peoples man. म्हणून त्यांना नेत्यांमध्ये , नातेवाईकांमध्ये मान आहे.  Respect is commanded and not demanded. या उक्तीप्रमाणे मानसन्मान गायकवाडसाहेबांकडे स्वाभाविकपणे चालून येतो. 

आणि एक महत्वाची बाब म्हणजे बाबासाहेबानी लिहिलेली पुस्तके , त्यांचे लिखाण , विचार , एक एक वाक्य यावर ते खूप चिंतन , मनन आणि चर्चा करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आयडॉल. बाबासाहेबांच्या लिखाणावर , भाषणावर , वाक्यांवर,  ते त्यांनी का म्हटले असेल यावर ते खूपच विचार करतात. आजच्या काळात शरद पवार साहेबांवर त्यांचा अढळ विश्वास आहे. 

स्वतः लेखक असल्यामुळे त्यांना जगभरातील लेखकांची पुस्तके वाचण्याची आवड. जगभरातील  social, movements तेथील सामाजिक प्रश्न , त्या त्या देशातील परिस्थितीनुसार त्यांनी काय व कसे प्रयत्न केलेत व सामाजिक प्रश्न कसे सोडलेत अथवा सोडवण्याचा प्रयत्न केला याबाबत ची उत्सुकता ते पुस्तके वाचून सोडवतात. 

मुंबई मधील बहुतेक बुकस्टोर्स आम्ही पालथी घातलीत.  मला आठवते कि काला घोडा , फोर्ट येथे किताबखाना असे बुकस्टोर आहे असे त्यांना कोणीतरी सांगितले. नेमके त्यादिवशी अधिवेशन संध्याकाळी ७ वाजता संपले. मी आणि त्यांचा सेक्रेटरी केतन गायकवाड सकाळी ९. ३० पासून विधानभवनात होतो. त्यामुळे दमलो होतो. पण त्यांनी आम्हाला किताबखाना ला नेले. माझा तर चेहेराच पडला,  कारण मला आत्ता घरी जायला रात्रीचे ११ तरी वाजणारच. असो, आम्ही किताबखाना येथे गेलो. मामा बराचवेळ तिथे पुस्तके बघत होते. मलादेखील वाचनाची आवड असल्यामुळे मी देखील अनेक पुस्तके बघितली. आणि त्यांनी शेवटी २-३ पुस्तके विकत घेतली. Foreign author foreign books. सामाजिक चळवळीत काम करायचे असेल तर जगभरातील सामाजिक समस्या आणि त्याचे तत्कालीन निराकारण कसे केले याचा अभ्यास  अत्यंत आवश्यक आहे असे ते म्हणाले. 

मी त्यांना नेहमी म्हणायचो कि हल्ली हल्लीच राजकारणात आलेल्या लोकांकडे एवढा पैसे असतात. आणि तुम्ही इतकी वर्षे राजकारणात आहात , तुमच्याकडे पैसे तर सोडा पण मुंबई मध्ये घर पण नाही. ते नेहमीच सांगतात कि मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कार्यकर्ते , लोकसंग्रह इतका आहे कि त्यातच माझी श्रीमंती आहे. अर्थात मला काही हे पटले नाही. पण लोकशाहीमध्ये असे म्हटले जाते कि जर एकत्र काम करायचे असेल तर You should agree to disagree. 

गायकवाड साहेबांसारख्या प्रतिभावंत , अनुभवसंपन्न, वैचारिकदृष्ट्या समृद्ध , साहित्यिक , भारतीय राज्यघटनेचा अभ्यास असणाऱ्या तसेच जनसामन्याबद्दल तळमळ असणाऱ्या नेत्याचा खरे म्हणजे राष्ट्रीय राजकारणामध्ये माननीय पवार साहेबानी उपयोग करून घ्यायला पाहिजे होतोय पण अजूनपर्यंत तरी तसे काही  झाले नाही. कदाचित पुढे होईल. 

साहेब तर म्हणतात कि राजकारणामध्ये काहीच gradual नसते, सर्व काही अचानकच होते. त्यामुळे त्यांची भूमिका याबाबतीत संयमी आणि संतुलित आहे. 

काही जणांचा माझ्या आयुष्यावर खूप positive इम्पॅक्ट आहे आणि यात जयदेवराव  गायकवाड यांचे नवी खूपच वरती आणि प्रिय आहे.

आज हा विषय लिहायला काही कारण किंवा ocassion नाही पण आपल्या माणसाबद्दल लिहिण्यासाठी Everyday is good occassion. 

शुभेच्छा 


विशाल फुलपगार   

१३ जून २०२१ , मुंबई 


14 comments:

  1. विशाल, परफेक्ट आहे.
    आज साहेबांच्या, बद्दल फार खाजगी माहिती मिळाली
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. भाऊ मज्जा आली, विधानसभेचे अनुभव पण लिहुन tak

    ReplyDelete
  3. मला आठवतय एकदा आपण त्यांना भेटायला पुण्याला गेलो होतो आणि नाना पाटील प्रतिसरकार हयांचा उलेख केलयानंतर त्यानी आणि त्यांचया एका जवलचया कार्य करत्याने खूप आठवनि संगीतलया होत्या

    ReplyDelete
    Replies
    1. हो रे. He is encyclopedia of information

      Delete
  4. थँक यु विशाल दादा . अगदी यथार्थ वर्णन केलेस तू पपांचे . असेच आहेत आमचे पप्पा.

    ReplyDelete
  5. अत्यंत सुंदर आणि नेमके वर्णन केले आहे पप्पांचे.खूप बारीक तपशील आणि खूप सुंदर अभ्यासपूर्ण लेख.खूप छान विशाल दादा ..

    ReplyDelete
  6. नमस्कार...
    विशाल बऱ्याच दिवसांनी एक नवीन लेख घेऊन तुझा ब्लॉग झळकला अँड. जयदेवराव गायकवाड साहेबांचे व्यक्तिमत्व तू छान मांडले आहेस. असे नि:स्वार्थी आणि समाजाचं भान असणारे गुणी राजकीय नेतृत्व इतरांना अवगत होणे खूप गरजेचे आहे. तुझ्या ब्लॉगच्या निमित्ताने बहुजन समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वाची आज आम्हाला ओळख झाली. तुझ्या उच्चशिक्षित कुटुंबाचं राजनैतिक आणि आंबेडकरवादी विचाराशी असलेल नाळ अजूनही टिकून आहे. आजच्या काळात आंबेडकरवादी विचारांचा पगडा असलेली तरुणाई ही फक्त स्वयंघोषित नेत्यांच्या आमिषाला बळी पडून भरकटत चाललेली आपण पाहतोय. बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांच्या तत्त्वापासून दुरावली गेलेली पिढी दिशाहीन झाल्याचे जाणवतय. बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा असलेली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दलित शोषित आणि बहुजनांच्या हितासाठी विचार करणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक आहेत त्यातलेच एक नाव अँड जयदेवराव गायकवाड साहेब.,
    आंबेडकरवादी विचारांचे आणि बाबासाहेबांच्या तत्त्वांशी प्रामाणिकपणे त्यांनी राजकारण केले. राजकारणात खरंतर मी जास्त रस घेत नाही. पण राजकारणात साम- दाम- दंड- भेद त्याचा अवलंब केला जातो. सत्तेसाठी, खुर्चीसाठीचा साप मुंगुस चा खेळ पाहिला की आपण आपली किती पातळी सोडून वागत आहोत, आपली नैतिकता कुठे घेऊन चाललो आहोत, हेही कळेनासे होते पण गायकवाड साहेबांनी निस्वार्थपणे बहुजनांच्या न्यायहक्कासाठी केलेली कामे निश्चितच कौतुकास्पद आहेत.
    पंढरपूर मतदार संघातील जागा मोठ्या मताधिक्याने येऊन सुद्धा त्यांची लोकसभेची संधी हुकली पण त्यानं त्यांची हार झाली, असे म्हणता येणार नाही. लाखों लोकांनी त्यांना आपला नेता म्हणून त्यांची निवड केली हा त्यांचा फार मोठा सन्मान आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.
    राजकारणात राहून अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सौदर्याचे आणि आपुलकीचे संबंध असूनही त्यांनी आपल्या सिद्धांताशी कधीही फारकत केली नाही हे फार महत्त्वाचे आहेत. तुझ्या मामासारखा म्हणजेच गायकवाड साहेबांसारखा तू ही उच्चशिक्षित आहेस मग मामांकडून राजकारणाचे धडे घेऊन तुझ्यासारख्या तरुणाने राजकारणात उडी घेण्यास काय हरकत आहे? तसेही आजच्या राजकीय क्षेत्रातून बर्‍यापैकी नावारुपास आलेला आहेस. तिथेही तुझें नाणे खणखणीत वाजेल अशी नक्कीच आशा वाटते.
    विशाल छान लेख लिहिला आहेस मित्रा. माणुसकी जपणार संवेदनशील व्यक्तिमत्व साहित्यिक, लेखक आणि निस्वार्थी राजकारणी म्हणून माजी आमदार अॅड जयदेवराव गायकवाड साहेबांचा मनापासून आदर करावासा वाटतो. आंबेडकर चळवळीत आणि आजच्या राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुणांना गायकवाड साहेब एक आदर्श उदाहरण असू शकतात. विशाल या निमित्ताने तुझ्या आठवणीतला अजून एका प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिलीस तुझे मनःपूर्वक धन्यवाद आणि मा. अॅड जयदेवराव गायकवाड साहेबांना निरोगी आणि उदंड आयुष्य करिता मनःपूर्वक शुभेच्छा....
    तुझा मित्र संतोष देसाई

    ReplyDelete
    Replies
    1. वा मित्रा. खूप छान अभिप्राय दिलास. नेहेमीप्रमाणे बारकाईने वाचन केल्याबद्दल धन्यवाद

      Delete
    2. देसाई मित्रा तुझा अभिप्राय बघून तू किती मनःपूर्वक तो लेख वाचला आहेस ते समजते. तुझी मित्राला प्रोत्साहित करण्याची हातोटी बघून आनंद झाला, तूझा अभिप्राय सुद्धा अभ्यासपूर्ण आहे हे तो वाचून कळतोय तू एक छुप्पा लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार आहेस हे फारच कमी लोकांना माहित आहे. तू सुद्धा तुझ्या भविष्यात एक उत्तम लेखक व्हावा अशी इच्छा आहे.

      Delete
    3. हा हा.. संजय भाऊ तुझा आणि विशाल तुमच्या सारख्या गुणी मित्रांचा हात सदैव पाठीशी असू द्या.. धन्यवाद

      Delete
  7. Excellent. खूप छान लिहिले आहे. अगदी मनापासून लिहिले आहे. मुर्ती लहान किर्ती महान

    ReplyDelete